MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मल्याळी काव्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध कवी अक्किथम यांची २०१९ या वर्षांसाठीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ५५व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली.

2. ज्ञानपीठ निवड मंडळाने शुक्रवारी ही घोषणा केली. अक्किथम अत्युथन नंबूथिरी असे त्यांचे पूर्ण नाव असून ते अक्किथम या नावाने सुपरिचित आहेत. कवितेबरोबरच त्यांनी नाटय़, टीकात्मक निबंध, बालसाहित्य, लघुकथा आदी साहत्यिाच्या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला आहे.

3. अक्किथम यांची ५५ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ४५ कवितासंग्रह आहेत, त्यामध्ये खंडकाव्य, कथाकाव्य, चरित्रकाव्य आणि गाणी यांचा समावेश आहे. वीरवदम, बळिदर्शनम, निमिषा क्षेत्रम, अमृत खतिका, अक्किथम कवितका, अंतिमहाकालम ही त्यांची गाजलेली निर्मिती आहे.

4. अक्किथम यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (१९७३), केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (१९७२ आणि १९८८), मातृभूमी पुरस्कार, वायलर पुरस्कार आणि कबीर सन्मानानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्याचा देशी आणि परदेशी भाषांत अनुवाद करण्यात आला आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सिंगापूरच्या हवाई दलाने भारतासमवेत प्रशिक्षण सरावासाठी प्रगत एफ १६ लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाची सहा सुखोई लढाऊ विमाने या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.

2. पश्चिम बंगालमधील कलाईकुडा हवाई दल केंद्रावर संयुक्त लष्करी सराव करण्यात येणार असून रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्सभारतीय हवाईदल यांचा त्यात समावेश आहे.

3. १२ डिसेंबपर्यंत हा सराव चालणार आहे. संयुक्त लष्करी कवायतींचे हे दहावे वर्ष असून यात हवाई सागरी प्रशिक्षणाचा समावेश आहे. भारतीय नौदलाची यंत्रणा यात वापरली जाणार आहे, असे सिंगापूरच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्सने सहा एफ १६ सी/डी लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाने सहा एसयू ३० एमके आय लढाऊ विमाने तैनात केली आहेत.

4. पहिला संयुक्त सराव हा २००८ मध्ये झाला होता. नंतर सरावाचे कार्यक्रम वाढत गेले. भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडचे एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी सांगितले की, या सरावातून दोन्ही देशांची हवाई दले व्यावसायिक कौशल्ये मिळवू शकतील. दोन्ही देशात संयुक्त सरावासाठी पहिल्यांदा २००७ मध्ये करार करण्यात आला नंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला ४५ कोटी डॉलर्सच कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केला. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कर्जाद्वारे आर्थिक मदतीचा हा निर्णय घेतला आहे.

2. ४५ कोटी डॉलर्समध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्सचा समावेश आहे. गोताबाया राजपक्षे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये समाधानकारक चर्चा झाली. राजपक्षे भारत दौऱ्यावर आले आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा राजपक्षे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.

3. श्रीलंकेतील तामिळ जनतेच्या विषयासह सुरक्षा, व्यापार आणि मच्छीमारांच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. विकासाच्या मार्गावर श्रीलंकेला पूर्ण सहकार्य करण्याचे मोदींनी आश्वासन दिले आहे. श्रीलंकेतील विविध विकास प्रकल्पांसाठी ४० कोटी डॉलर्स तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्स देण्यात येणार आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. रिलायन्स इंडस्ट्रीच्या मार्केट कॅपनं १० लाख कोटी रूपयांचा टप्पा पार केला. गेल्या ३० वर्षांमध्ये कंपनीच्या बाजार मूल्यात ६० हजार टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रिलायन्स तेल आणि गॅस सेक्टरमधील दिग्गज कंपनी म्हणून पुढे आली आहे. त्यानंतर आता डिजिटल आणि रिटेल क्षेत्रातही कंपनी पुढे आली आहे. त्यांच्या कंपनीने इतका मोठा पल्ला गाठला आहे की ती आता १५० देशांच्या जीडीपीपेक्षागी मोठी झाली आहे.

2. २०१९ च्या आर्थिक वर्षाच्या तिमाहित रिलायन्सनं १० हजार कोटी रूपयांचा नफा कमावला होता. २ जानेवारी १९९१ ते २९ नोव्हेंबर २०१९ दरम्यान रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये ६०० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे एल अँड टी, अशोक लेलँड, टाटा स्टील, सिअॅट यांसारख्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १५ ते २०५ टक्क्यांची वाढ झआली आहे.

3. आर्थिक वर्ष २००९ मध्ये कंपनीवर कंसॉलिडेटेड डेट ७२ हजार २५६ रूपयांचे होते. ३१ मार्च २०१९ पर्यंत ते वाढून २.८७ लाख कोटी रूपये इतके झाले आहे. कंपनीनं हे कर्ज करण्याचं आश्वासनही दिलं आहे. २०२१ पर्यंत कंपनी कर्जमुक्त होईल, असा दावाही करण्यात आला आहे. तसंच आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीतही ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. १८७२: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.

2. १९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.

3. १९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.

4. १७६१: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा जन्म.

5.१८५८: भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म. 

6. २०१२: भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परदेशी खेळाडूचे वर्चस्व पाहण्यास मिळाले.

2. पुरुष गटात इथिओपियाचा सोलोमन हा विजेता ठरला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे आयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

3. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे 5 वाजता कै. बाबुराव सणस मैदानापासून ढोल ताशाच्या गजरात सुरुवात झाली.

4. देश, विदेशातील खेळाडूंसह शहरातील अनेक भागातील खेळाडू रस्त्यावर धावताना पाहण्यास मिळाले. याचसोबत स्पर्धेत विविध क्षेत्रातील मंडळीनीही हजेरी लावली. 42 किलोमीटर पुरुष, 21 किलो मीटर पुरुष आणि महिला, 10 किलोमीटर पुरुष आणि महिला, पाच किलोमीटर मुले आणि मुली आणि चॅरिटी रन साडेतीन किलोमीटरमध्ये ही स्पर्धा पार पडली.


Top

Whoops, looks like something went wrong.