Shanti Swaroop Bhatnagar Award Announced 2018

 1. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिल्या जाणार्या प्रतिष्ठित सन 2018 साठी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
 2. वैज्ञानिक आणि औद्योगिक विकास परिषदेच्या (सीएसआयआर) स्थापनादिनी दरवर्षी भटनागर पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.
 3. पाच लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 4. मूलभूत संशोधनात विशेष कामगिरी करणाऱ्या चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना केंद्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
 5. विजेते खालीलप्रमाणे:-
  1. जैविकशास्त्र:-
   1. गणेश नागाराजू (IISc बेंगलुरु)
   2. थॉमस पुकाडाईल (IISER, पुणे)
  2. रसा यनशास्त्र:-
   1. राहुल बनर्जी
   2. स्वाधीन कुमार मंडल (IISER कोलकाता)
  3. पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र:-
   1. डॉ. मादिनेनी वेंकट रत्नम (NARL तिरुपती)
   2. पार्थसारथी चक्रवर्ती (CSIRNIO गोवा)
  4. अभियांत्रिकी विज्ञान:-
   1. अमित अग्रवाल
   2. अश्विन अनिल गमस्ते (IITB)
  5. गणितीशास्त्र:-
   1. अमित कुमार (IIT दिल्ली)
   2. नितीन सक्सेना (IIT कानपूर)
  6. वैद्यकीयशास्त्र:-
   1. डॉ. गणेशन वेंकटसुब्रमण्यम (NIMHANS बेंगळूरू)
  7. भौति कशास्त्र:- 
   1. डॉ. अदिती सेन डे (हरीश चंद्र संशोधन संस्था, इलाहाबाद)
   2. डॉ. अंबरिश घोष (IISc बेंगळूरु) 


Start up India tour in Maharashtra from October 3

 1. ३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात स्टार्ट अप इंडिया यात्रा सुरु होणार असून केंद्रीय वाणिज्य, उद्योग व हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात याचा प्रारंभ होणार आहे.
 2. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कामगार आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
 3. गुजरात, उत्तर प्रदेश, ओदिशा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश आणि तेलंगण इथे यशस्वी ठरलेली स्टार्ट अप इंडिया यात्रा आता महाराष्ट्रात दाखल होत आहे.
 4. नवकल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींसाठी आणि स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनीयुक्त अशी स्टार्ट अप इंडिया यात्रा व्हॅन राज्यभरात फिरणार आहे.
 5. ही व्हॅन १६ जिल्ह्यातून २३ थांबे आणि १४ बूट कॅम्प घेत३ नोव्हेंबर रोजी नागपूरला पोहचेल, जेथे या यात्रेचा समारोप होणार आहे.
 6. बूट कॅम्पमध्ये स्टार्ट अप इंडिया आणि महाराष्ट्र स्टार्ट अप धोरण यावर सादरीकरण होणार आहे.
 7. या यात्रेत सहभागी होण्यासाठी www.startupindia.gov.inवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
 8. उद्योजकता कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि नव उद्योजकांच्या कल्पनांना मूर्त स्वरुप देत, त्यांचा स्टार्ट अप विकसित करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने स्टार्ट अप इंडिया उपक्रमाअंतर्गत स्टार्ट अप इंडिया यात्रा सुरु करण्यात आली आहे.


Prime Minister Modi's Champions of Earth Prize Gaurav Gaurav

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ या पुरस्काराने गौरव केला आहे.
 2. ‘पॉलिटिकल लीडरशीप’ या विभागात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून, त्यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 3. आंतरराष्ट्रीय स्तरावर सौरऊर्जा (इंटरनॅशनल सोलर अलायंस) व पर्यावरणाबाबत जागृती केल्याबद्दल या दोन्ही नेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 4. मोदींना २०२२पर्यंत देशात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्धाराबद्दल तर इमॅन्युअल मॅक्रोन यांना पर्यावरणसंबंधी वैश्विक करार करण्यासाठी हा पुरस्कार दिला आहे.
 5. पर्यावरणसंदर्भात जागतिक स्तरावर प्रभावी नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०२२पर्यंत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचा दृढनिश्चय केला आहे.
 6. याशिवाय केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील गतीमानतेसाठी दूरदृष्टि दाखविल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्णपणे सौरउर्जेवर चालणारे विमानतळ आहे.
 7. चीनच्या जिनझियांग ग्रीन रुरल प्रोग्रामचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तुती करण्यात आली असून त्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 8. संयुक्त राष्ट्राने (यूएन) पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगातील ६ व्यक्ती वा संस्थांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
 9. चॅम्पियन ऑफ द अर्थ:-
  1. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने (यूएनईपी) २००५मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली.
  2. पर्यावरणसंदर्भात कार्याचे नेतृत्व करणाऱ्या खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील अथवा नागरी समाजातील व्यक्तींचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करणात आली.
  3. २०१७मध्ये या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला आणि यात ‘यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या पुरस्काराचा समावेश करण्यात आला.
  4. १८ ते ३० वयोगटातील सकारात्मक पर्यावरणीय वातावरण निर्मितीसाठी प्रतिभावान नवप्रवर्तनकांणा हा पुरस्कार दिला जातो.


Inauguration of 2 Seaside Tourism Tourism in Andhra Pradesh

 1. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी स्वदेश दर्शन योजनेंतर्गत आंध्रप्रदेशमधील दोन सागरकिनारा पर्यटन परीक्रमांचे (सर्किट) उद्घाटन केले.
 2. आंध्रप्रदेशच्या सागर किनाऱ्यालगतच्या भागातील पर्यटनाला प्रोत्साहन देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
 3. प्रथम सागरकिनारा परीक्रमा: यामध्ये नेल्लोर टँक, पुलिकत सरोवर, नेलापट्टू पक्षी अभ्यारण्य, उब्बाला, मेपडू, राम तीर्थम तसेच इसुकापल्ली इत्यादी प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभिकरण आणि विकास करण्यात येणार आहे.
 4. द्वितीय सागरकिनारा परीक्रमा: यामध्ये काकीनाडा बंदर, कोरिंगा वन्यजीव अभ्यारण्य, होप बेट इत्यादींचा विकास करण्यात येईल. याशिवाय अदूरू, पस्सारलापुडी आणि यनम याठिकाणी लाकडाच्या झोपड्या बांधण्यात येणार आहेत.
 5. स्वदेश दर्शन योजना:-
  1. देशात विषय (थीम) आधारित पर्यटन परिक्रमा (सर्किट) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन योजना’ ९ मार्च २०१५ रोजी सुरू करण्यात आली.
  2. या पर्यटन प्रकल्पांना एका एकात्मिक पद्धतीने उच्च पर्यटन मूल्य, स्पर्धात्मकता आणि स्थायित्व अश्या सिद्धांतांवर विकसित केले जाणार आहे.
  3. देशाच्या पर्यटनासाठी पायाभूत घटकांचा विकास करणे आणि देशातील पर्यटनाला चालना देणे, हे या योजनेचे मुख्य हेतू आहे.
  4. या योजनेंतर्गत विकासासाठी सुरुवातीला पुढील १३ पर्यटन परिक्रमा प्रकल्प निवडण्यात आले आहेत: बुद्धिस्ट परिक्रमा, ईशान्य भारत परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरणीय परिक्रमा, वन्यजीव परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, धार्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.
  5. ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. या प्रकल्पांसाठी राज्यांना त्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या अहवालानुसार निधी देण्यात येणार आहे.


Successful test of the astra ballistic missile

 1. भारतीय वायुसेनेने २६ सप्टेंबर २०१८ रोजी हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे सुखोई-३० या लढाऊ विमानातून यशस्वी परीक्षण केले.
 2. हे क्षेपणास्त्र दृष्टीपलीकडच्या लक्ष्याचा भेद घेण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र भारतातच निर्मित आणि विकसित करण्यात आले आहे.
 3. भारताच्या संर क्षण ताफ्यात क्षेपणास्त्राचा समावेश करण्यापूर्वीची ही अंतिम चाचणी असल्यामुळे, हे परीक्षण विशेष महत्वाचे होते.
 4. अस्त्र क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये:-
 5.  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले हे क्षेपणास्त्र दृष्टीपलीकडच्या लक्ष्याचा भेद घेण्यास सक्षम आहे.
 6. हे भारताने विकसित केलेले हवेत्रून हवेत मारा करणारे पहिलेच क्षेपणास्त्र आहे.
 7. हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र विमान चालकाला ८० किमी अंतरावरुन शत्रूच्या विमानाचा वेध घेण्याची व त्याला नष्ट करण्याची क्षमता देते.
 8. डीआरडीओने हे क्षेपणास्त्र मिराज २००० एच, मिग २९, सी हॉरियर, मिग २१, एचएएल तेजस आणि सुखोई एसयु ३० एमकेआय या सर्व विमानांमध्ये वापरण्यासाठी अनुकूलबनविले आहे.
 9. हे क्षेपणास्त्र घन इंधनाचा वापर करते. डीआरडीओ या क्षेपणास्त्रासाठी आकाश या क्षेपणास्त्राप्रमाणे प्रक्षेपण प्रक्रिया विकसित करू इच्छित आहे.


Top