NITI आयोगाचा ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ अहवाल प्रसिद्ध

 1. बदलत्या भारताचे राष्ट्रीय संस्थान (NITI) आयोगाने ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 2. हा अहवाल भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 3500 कारखान्यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. हे सर्वेक्षण IDFC इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने केले गेले आहे.
 3. व्यवसाय नियमांचे मूल्यांकन करणे आणि संपूर्ण भारतात उद्योगांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार करणे या उद्देशाने हे सर्वेक्षण केले गेले आहे.

मुख्य निष्कर्ष:-

 1. आर्थिक कामगिरी व सुधारणा :-  डूइंग बिजनेस निर्देशकांच्या विविध श्रेणीवर आर्थिक क्रियाकलाप आणि उच्च कार्यक्षमता यांचा उच्च स्तर अधिक परस्परसंबंधित आहे.
 2. सेवा-सुविधा :- उच्च-वृद्धीदर असलेल्या राज्यांमध्ये उपक्रमांना मोठ्या किंवा किचकट अडथळ्यांना लक्षणीयपणे कमी सामोरे जावे लागले आहे. यामध्ये (i) जमीन/बांधकाम संबंधी मंजुरी, (ii) पर्यावरण मंजुरी आणि (iii) पाणी आणि स्वच्छता संबंधी उपलब्धता अश्या सुविधांचा समावेश आहे.
 3. वीज पुरवठा :- कमी-वृद्धीदर असलेल्या राज्यांच्या तुलनेत उच्च-वृद्धीदर असलेल्या राज्यांमध्ये कंपन्यांनी एका महिन्यामध्ये साधारणपणे 25% इतकी कमी विजेची कमतरता नोंदवलेली आहे.
 4. कालांतराने सुधारणा :- नवीन आणि लहान कंपन्यांना अधिक अनुकूल व्यवसाय वातावरण मिळाले आहे. त्यांना जुन्या कंपन्यांपेक्षा मंजुरी मिळविण्यास कमी वेळ लागला.
 5. व्यवसाय सोयीस्कर करण्यासाठी राज्यांना त्यांच्याकडून घेतल्या जाणार्‍या पावलांविषयी जागृती वाढविण्याची आवश्यकता आहे. असे आढळून आले आहे की, राज्यांनी स्थापित केलेल्या एकल खिडकी प्रणालीविषयी उद्योगांमध्ये कमी जागरूकता आहे.
 6. 2014 सालानंतर स्टार्टअपच्या समावेशासह नवीन कंपन्या स्थापित करण्यात आल्या.
 7. नव्याने स्थापित कंपन्यांच्या मते, बहुतेक नियामक प्रक्रिया हे त्यांच्या व्यवसायात फारसा अडथळा करीत नसतात.
 8. सरासरी फक्त 20% स्टार्ट-अप कंपन्यांनी राज्यांनी स्थापित केलेल्या एकल खिडकी प्रणालीचा वापर केला आहे. तज्ज्ञांमध्ये सुद्धा फक्त 41% लोकांना याविषयी माहिती आहे.
 9. कामगाराभिमुख क्षेत्रांमध्ये भांडवली गुंतवणूकीच्या प्रत्येक युनिटमध्ये अधिक रोजगार निर्मिती झालेली आहे.
 10. कौशल्य प्राप्त कामगार मिळवणे हा एक मोठा व फारच गंभीर अडथळा असल्याची तक्रार 19% कंपन्यांनी केली आहे.
 11. कंत्राटी कामगार मिळवणे हा एक मोठा व फारच गंभीर अडथळा असल्याची तक्रार 33% कंपन्यांनी केली आहे.
 12. काम बंद आणि कंपन्या बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिवसांचे नुकसान झाले आहे.
 13. पर्यावरण मंजूरीसाठी आणि दीर्घकालीन वीज टंचाईसाठी उच्च सरासरी वेळ नोंदवला गेला आहे.
 14. 100+ कामगार असलेल्या कंपन्यांना 10 हून कमी कामगार असलेल्या कंपन्यांच्या तुलनेत मंजूरी मिळविण्यास अधिक काळ लागला. लहान कंपन्यांना कमी नियमनाविषयी अडथळे आलेले आहेत.


राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय साहस पुरस्कार 2017 चे वाटप

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2017’ प्रदान करण्यात आले आहेत.

पुरस्कार विजेत्यांचे नावे :- 

 1. प्रेमलता अग्रवाल (जमिनी),
 2. रोहन दत्तात्रेय मोरे (पाण्यातले),
 3. अशोक अबे (जीवनगौरव),
 4. वेद प्रकाश शर्मा (जीवनगौरव).
 5. याशिवाय, 2016-17 सालासाठी मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) चषक पंजाबी विद्यापीठ, पटियाला यांना देण्यात आला आहे.

1.क्रीडा प्रतिभा ओळखण्यासाठी

केंद्रीय विद्यालय संघटन (KVS),  

2.खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी

ओडिशा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (IDCO)

3.क्रीडाक्षेत्राच्या विकासाकरिता

गोल्फ फाउंडेशन आणि रिलायन्स फाउंडेशन

यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2017 दिला गेला आहे.

पुरस्काराविषयी :-

 1. जमीन, समुद्र आणि आकाशात साहसी कार्य करताना दाखवलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार भारत सरकारकडून दिला जातो.

पुरस्काराचे स्वरूप:-

 5 लाख रुपये रोख व प्रमाणपत्र


NITI आयोगाकडून ‘विमेन ट्रान्सफोर्मिंग इंडिया’ पुरस्कार जाहीर

बदलत्या भारताचे राष्ट्रीय संस्थान (NITI) आयोगाने ‘विमेन ट्रान्सफोर्मिंग इंडिया अवॉर्ड 2017’ पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत.  

विजेत्या:-

 1. लक्ष्मी अग्रवाल (15 वर्षीय, महिलांवरील अत्याचारविरोधी);
 2. सफीना हुसैन (‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेच्या संस्थापक);
 3. कमल कुंभार (मायक्रो-एंटरप्राइज नेटवर्क चालवले);
 4. सुबासिनी मिस्त्री;
 5. अरुनिमा सिन्हा (एवरेस्ट सर करणारी जगातली पहिली अपंग महिला);
 6. जामूना तूडू (वन्य समाजसेविका)

यांचा समावेश आहे.

उपविजेत्या:- 

 1. राजलक्ष्मी बोर्थाकुर,
 2. हर्षिनी कान्हेकर (भारतामधील पहिली महिला अग्निशामक),
 3. सुनीता कांबळे,
 4. किरण कनोजिया,
 5. शिमा मोडक,
 6. कनिका टेकरीवाल

यांचा समावेश आहे.

पुरस्काराविषयी:-

 1. देशाच्या विकासात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘विमेन ट्रान्सफोर्मिंग इंडिया’ पुरस्कार MyGov आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या भागीदारीने NITI आयोगाकडून दिले जात आहेत.
 2. 2016 सालापासून हा पुरस्कार दिला जात आहे.


IIT गुवाहाटी संशोधकांनी 'प्रत्यारोपणासाठी स्वादुपिंड' विकसित केले

 1. भारतीय तंत्रज्ञान संस्थान (IIT), गुवाहाटी येथील संशोधकांनी अलीकडेच त्रि-आयामी सिल्क स्कॅफोल्डमध्ये वाढवलेले प्रत्यारोपणासाठी तयार जैविक-कृत्रिम स्वादुपिंडाचे मॉडेल विकसित केले आहे.
 2. सिल्क स्कॅफोल्डद्वारा विकसित स्वादुपिंड जर मानवी शरीराकडून जुळवून घेतल्यास त्याचा वापर टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

सिल्क स्कॅफोल्डची प्रमुख वैशिष्ट्ये:-

 1. सिल्क स्कॅफोल्ड हे 6 मिलिमीटर व्यास आणि 2 मिलिमीटर जाडीचे आहे.
 2. हे सच्छिद्र आहे, जे सिल्क प्रोटीनमध्ये विरघळवून मिळविलेल्या ठराविक आकाराच्या सॉल्ट ग्रेन्सच्या वापरातून बनविलेले आहे.
 3. त्यावरील छिद्र 400-500 माइक्रॉमीटर आकाराचे आहे, ज्यातून ग्लुकोज आणि ऑक्सिजन आत येऊ शकते आणि बीटा पेशींकडून इंसुलिन रक्तात सोडल्या जाऊ शकते.
 4. 8-10 आठवडे वय असलेल्या उंदरापासून इंसुलिन तयार करणार्‍या बीटा पेशी यात जोडल्या गेल्या आहेत.
 5. स्कॅफोल्डवर सेमी-परमीएबल पडद्याचे आवरण घातले आहे,
 6. ज्यामुळे इंसुलिन  रक्त प्रवाहात सोडल्या जाऊ शकते परंतु इम्यून पेशी आवरणाच्या आत येऊ शकत नाही आणि इसलेट पेशी नष्ट करतात.

प्रयोगाचे परिणाम:-

 1. बीटा पेशी काही सेकंदांमध्येच विविध ग्लुकोजच्या पातळीवर प्रतिसादाच्या स्वरुपात पुरेश्या प्रमाणात इंसुलिनची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.
 2. जरी पेशी पुनर्जन्म घेऊ शकत नसतील आणि नष्ट होत असतील तरीही इम्प्लांट कॅप्सूलमध्ये नव्या बीटा पेशी टाकल्या जाऊ शकतात जेणेकरून इंसुलिन तयार होत राहणार.
 3. "स्वादुपिंड" मध्ये नैसर्गिकरित्या इंसुलिनची निर्मिती करणार्‍या पेशी असतात.
 4. संशोधकांनी जनावरांवर चाचण्या पार पाडण्याची योजना आखली आहे. त्यांनी आधीपासूनच मधुमेह असलेले उंदीर तयार केले आहेत आणि लवकरच त्यांच्यात सिल्क स्कॅफोल्डचे प्रत्यारोपण केले जाणार आहे.
 5. मानवामध्ये पोटातील चरबी थरांत स्कॅफोल्ड बसवले जाऊ शकते. अभ्यासाचे निष्कर्ष "ACS बायोमटेरियल्स सायन्स अँड इंजिनियरिंग" यात प्रकाशित झाले आहेत.


Top