Rajinikanth's announcement to enter politics

 1. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.
 2. रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची त्यांनी चेन्नईतल्या श्री राघवेंद्र कल्याण मंडपममध्ये घोषणा केली आहे.
 3. रजनीकांत यांचा राजकीय पक्ष हा भाजपला पाठिंबा देऊन एनडीएमध्ये सहभागी होईल, अशीही अटकळ बांधली जात आहे.
 4. चित्रपटसृष्टीनंतर रजनीकांत यांनी आता राजकारणात प्रवेश केला आहे.
 5. मी माझा भाऊ रजनीकांत याचं राजकारणात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन करतो, असं अभिनेते कमल हासन म्हणाले आहेत.
 6. गेल्या काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे सूतोवाच केले होते.
 7. माझ्या राजकारण प्रवेशाबाबत चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. योग्य वेळ आल्यास निर्णय जाहीर करू, असंही रजनीकांत काही दिवसांपूर्वी बोलले होते.
 8. युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते, असे सूचित करत, आपण राजकारणात उडी घेणार की नाही याचा निर्णय 31 डिसेंबर रोजी जाहीर करू, असे तमीळ सुपरस्टार रजनीकांत यांनी सांगितले होते.
 9. नाताळानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या चाहत्यांच्या मेळाव्यात रजनीकांत म्हणाले होते की, राजकारणातील अडचणी मला माहीत आहेत.
 10. मला त्यांची कल्पना नसती तर मी राजकारणात यापूर्वीच उडी घेतली असती. युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते.
 11. युद्ध जिंकण्यासाठी केवळ शक्ती नव्हे, तर युक्तीही लागते. याआधी आपण सन 1996मध्ये द्रमुकला मते देऊन जयललिता यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले होते.
 12. त्याचा संदर्भ देत रजनीकांत म्हणाले, खरेतर मी त्याच वेळी राजकारणात उतरलो होतो. त्यामुळे राजकारण मला नवीन नाही.


Vidarbha's four cities top in cleanliness app! Nashik tops the list

 1. स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यामध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल ठरली आहेत.
 2. राज्यातील ४३ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले असून, नाशिकने उद्दिष्टापेक्षा दीडपट संख्येने स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.
 3. स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यामध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल ठरली आहेत.
 4. राज्यातील ४३ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले असून, नाशिकने उद्दिष्टापेक्षा दीडपट संख्येने स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.
 5. एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणा-या पहिल्या २० शहरांमध्ये विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, अचलपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत प्रत्येक शहराला एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे उद्दीष्ठ देण्यात आले होते.
 2. ‘एमओएचयूए’ हा अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर नागरिकांनी स्वच्छताविषयक तक्रारी नोंदवाव्यात,  संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याची त्वरित दखल घ्यावी आणि शहर स्वच्छ ठेवावे, अशी त्यामागील भूमिका होती.
 3. जानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये होवू घातलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात त्यासाठी ४०० गुण ठेवण्यात आलेत.
 4. दोन टक्के नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड केल्यास १५० गुण, तक्रारींचा निपटारासाठी १५० गुण व राज्याच्या तुलनेत त्या शहराची रँकिंग किती, यासाठी १०० गुण ठेवण्यात आले.
 5. त्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली. तत्पूर्वी, राज्यातील ४३ शहरांपैकी २० शहरांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडिंगचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
 6. नाशिक शहराने ४६,९०६ अ‍ॅप डाऊनलोड करून उद्दिष्टाच्या तुलनेत ३.१६ टक्के आघाडी घेतल्याने या शहराने स्वच्छता अ‍ॅपमध्ये पहिले रँकिंग मिळविले आहे.
 7. या २० आघाडीच्या शहरांमध्ये दुसºया क्रमांकावर चंद्रपूर, १० व्या क्रमांकावर अचलपूर, १४ व्या क्रमांकावर अमरावती, १९ व्या क्रमांकावर वर्धा शहर आले आहे.
 8. ३१ डिसेंबरपर्यंत या शहरांना त्यांच्या मानांकनात सुधारणा करण्याची संधी आहे.
 9. उद्दिष्ट पूर्ण करणारी २० शहरे
 10. नाशिक, चंद्रपूर, धुळे, इचलकरंजी, वसई, नवी मुंबई, मिरा भार्इंदर, सातारा, बदलापूर, अचलपूर, परभणी, मालेगाव, सोलापूर, अमरावती, अंबरनाथ, जळगाव, उदगीर, सांगली-मिरज-कुपवाड, वर्धा, बार्शी.


$ 40 million loan agreement with World Bank for 'Uttar Pradesh PPTD' project

 1. ‘उत्तर प्रदेश प्रो-पूअर टुरिजम डेव्हलपमेंट’ प्रकल्पासाठी भारताने जागतिक बँकेसोबत $40 दशलक्षचा (सुमारे 260 कोटी रुपये) कर्ज करार केला आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?

पार्श्वभूमी:-

 1. उत्तरप्रदेशातील स्थानिक समुदायांसाठी पर्यटना संबंधित लाभांमध्ये वाढा करण्याच्या उद्देशाने पर्यटन सुविधांच्या विकासासाठी सादर करण्यात आलेल्या UPPPTD प्रकल्पासाठी 5 वर्षांमध्ये एकूण जवळपास $57.14 दशलक्षचा खर्च अपेक्षित आहे.
 2. त्यापैकी $40 दशलक्ष जागतिक बँकेकडून तर उर्वरित राज्याच्या अर्थसंकल्पातून खर्च वितरित होणार आहे.
 3. जागतिक बँक ही भांडवल लागणार्‍या कार्यक्रमांसाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे.
 4. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association-IDA): अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.
 5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.
 6. जागतिक बँकेचे मुख्यालय अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे.


On January 10, it will launch 31 satellites in one single campaign

 1. ISRO ने येत्या 10 जानेवारीला एकावेळी 31 उपग्रह अंतराळात प्रक्षेप‌ित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार केली आहे.
 2. यावेळी परराष्ट्रांच्या 30 उपग्रहांसह भारताच्या ‘कार्टोसॅट-2’ मालिकेमधील एका पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
 3. ऑगस्ट महिन्यातल्या IRNSS-1H उपग्रहाच्या अयशस्वी प्रक्षेपणानंतर हे पहिलेच PSLV अभियान आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?

पार्श्वभूमी:-

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे.
 2. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
 3. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.
 4. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.
 5. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला.
 6. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला.
 7. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रायान-1’ मोहीम यशस्वी झाली.
 8. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


Best Soccer Player - Cristiano Ronaldo

 1. पोर्तुगाल व रिअल माद्रिद क्लबचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खात्यात आणखी एक पुरस्कार जमा झाला आहे.
 2. रोनाल्डोला ‘ग्लोब सॉकर सर्वोत्तम खेळाडू’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
 3. रोनाल्डोने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला.
 4. रोनाल्डोने २०११, २०१४ आणि २०१६ साली युरोपियन असोसिएशन फुटबॉल एजंट्स आणि युरोपियन क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा हा पुरस्कार जिंकला होता.
 5. रोनाल्डोने या पुरस्कार सोहळ्यात दूर चित्र संवादामार्फत (व्हिडीओ कॉन्फरन्स) उपस्थिती लावली.
 6. त्याला इटलीचे अ‍ॅलेझांड्रो डेल पिएरो यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
 7. या वेळी रोनाल्डोने आणखी वैयक्तिक जेतेपद पटकावण्याचा निर्धार बोलून दाखवला. ‘माझ्या पुरस्कार संग्रहालयात आणखी जागा शिल्लक आहे. माझ्यासाठी हा आनंददायी क्षण आहे.
 8. रिअल माद्रिद, प्रशिक्षक आणि संघसहकाऱ्यांचे आभार,’ अशी प्रतिक्रिया रोनाल्डोने दिली. 
 9. यंदाच्या सर्वोत्तम क्लबचा पुरस्कार --रिअल माद्रिद
 10.  सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार -- झिनेदिन झिदान 


Top