Central budget series Part-3: Economic Survey 2017-18

 1. केंद्रीय वित्‍त व कॉरपोरेट व्यवहार मंत्री अरुण जेटली यांनी 29 जानेवारी 2018 रोजी संसदेपुढे आर्थिक सर्वेक्षण 2017-18 सादर केले.
आर्थिक सर्वेक्षण 2017-18
 1. ठळक बाबी:-
 2. वित्‍त वर्ष 2017-18 मध्ये सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) वाढून 6.75% आणि वर्ष 2018-19 मध्ये 7.0-7.5% इतका असणार. त्यामुळे भारत जगातली वेगाने वाढणारी प्रमुख  अर्थव्‍यवस्‍था म्हणून पुन्हा एकदा उदयास येणार.
 3. स्‍थायी प्राथमिक किंमतीवर सकल मूल्यवर्धन (GVA) मध्ये वर्ष 2016-17 मधील 6.6% च्या तुलनेत वर्ष 2017-18 मध्ये 6.1% दराने वाढ होण्याचा अंदाज आहे. याप्रकारे वर्ष 2017-18 मध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे 2.1%, 4.4% आणि 8.3% दराने वाढ होण्याचा अंदाज आहे.
 4. दोन वर्ष नकारात्‍मक स्‍तरावर असूनही, वर्ष 2016-17 दरम्यान निर्यातीमध्ये वाढ सकारात्‍मक स्‍तरावर आली होती आणि वर्ष 2017-18 मध्ये यामध्ये वेगाने वाढ अपेक्षित केले गेले. मात्र, आयातीमध्ये किंचित वाढ दिसूनही वस्तू आणि सेवा यांच्या शुद्ध निर्यातीमध्ये वर्ष 2017-18 मध्ये घट होण्याचा अंदाज आहे.
 5. मागील तीन वर्षांमध्ये सरासरी विकास दर जागतिक विकास दराच्या तुलनेत जवळपास 4% अधिक आहे आणि उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्‍यवस्थांच्या तुलनेत जवळपास 3% अधिक आहे.
 6. वित्त वर्ष 2014-15 ते वित्त वर्ष 2017-18 या कालावधीसाठी GDP विकास दर सरासरी 7.3% राहिला आहे, जो जगातील प्रमुख अर्थव्‍यवस्थांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
 7. वित्त वर्ष 2017-18 दरम्यान देशामध्ये महागाई दर मध्यम आहे. ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) वर आधारित महागाई दर 3.3% होता, जो मागील सह वर्षांमध्ये सर्वाधिक कमी आहे.
 8. औद्योगिक उत्‍पादन निर्देशांक (IIP), जो की 2011-12 च्या आधारभूत वर्षासोबत एक घनफळ प्रकारचा निर्देशांक आहे, वित्त वर्ष 2017-18 दरम्यान एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान औद्योगिक उत्‍पादनात 3.2% ची वाढ दर्शवली गेली. IIP ने 10.2% च्या विनिर्माण वृद्धीसह 8.4% चा 25 महिन्यांचा उच्‍च वृद्धीदर नोंदवला.
 9. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम, रिफाइनरी उत्‍पादने, खाते, पोलाद, सीमेंट आणि वीज या आठ प्रमुख उद्योगांमध्ये एप्रिल 17 - नोव्हेंबर 17 दरम्यान 3.9% एकत्र वृद्धी नोंदवली गेली.
 10. वर्ष 2017-18 मध्ये एकूण थेट विदेशी गुंतवणूक (FDI) आवकमध्ये 8% वृद्धी झाली, जे वर्ष 2016-17 मधील $55.56 अब्जच्या तुलनेत वर्ष 2016-17 दरम्यान $60.08 अब्ज झाले. वर्ष 2017-18 (एप्रिल-सप्टेंबर) दरम्यान एकूण FDI आवक $33.75 अब्ज झाली.
 11. रेल्वेच्या बाबतीत, वर्ष 2017-18 (सप्टेंबर 2017 पर्यंत) दरम्यान भारतीय रेल्वेने 558.10 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली, जी तुलनेने मागील वर्षी समान कालावधीत 531.23 दशलक्ष टन एवढी होती. वर्तमानात 425 किलोमीटर लांबीची मेट्रो रेल प्रणाली कार्यरत आहे आणि विविध क्षेत्रात 684 किलोमीटर मेट्रो रेल रुळाचे काम चालू आहे. सागरमाला योजनेंतर्गत 2.17 लाख कोटी रुपये खर्चाची 289 प्रकल्प बांधकामाच्या विविध टप्प्यांवर आहेत.
 12. दूरसंचार क्षेत्रात ‘भारत नेट’ आणि ‘डिजिटल इंडिया’ यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सप्टेंबर 2017 पर्यंत एकूण मोबाइल जोडणी संख्या 1207.04 दशलक्ष होती. त्यामध्ये 501.99 दशलक्ष ग्रामीण क्षेत्रात आणि 705.05 दशलक्ष शहरी क्षेत्रात आहेत.
 13. हवाई वाहतूक क्षेत्रात, वर्ष 2017-18 मध्ये देशांतर्गत हवाई प्रवाश्यांची संख्या 57.5 दशलक्ष होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 16% अधिक आहे.
 14. ऊर्जा क्षेत्रात, भारताची ऊर्जा क्षमता 3,30,860.6 MW झालेली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये एक नवी योजना सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) चा शुभारंभ केला गेला. या योजनेसाठी 16,320 कोटी रुपयांचा निधी निश्चित केला गेला आहे.
 15. वर्ष 2009-14 या कालावधीत वार्षिक वैज्ञानिक प्रकाशनाचा वृद्धीदर जवळपास 14% होता. SCOPUS माहितीच्या अनुसार, यामध्ये वर्ष 2009-14 या कालावधीत जागतिक प्रकाशनांमध्ये भारताची भागीदारी 3.1% वरुन 4.4% झाली. WIPO अनुसार, भारत जगातला 7 वा मोठा पेटेंट फाइलिंग ऑफिस आहे. वर्ष 2015 मध्ये भारतात 45,658 पेटेंट नोंदवले गेलेत.
 16. वस्तू व सेवा कर (GST) च्या बाबतीत, अप्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येत 50% नी वाढ झाली, भारतातील औपचारिक क्षेत्रात वाढ झाली, स्वेच्छा नोंदणीमध्ये मोठी वाढ झाली, निर्यात संबंधी प्रदर्शन आणि राज्यांमधील जीवनमान यांच्यात मजबूत समन्वयित संबंध आढळून आले. वर्ष 2017-18 मध्ये सामाजिक सेवांवर खर्च 6.6% आहे. चालू खात्यातील तूट GDP च्या 1.5-2% अपेक्षित आहे.


Postman / MTS unveiled new costumes

 1. पोस्टमन (पुरुष व महिला दोन्ही) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) यांच्यासाठी असलेल्या पोशाखाची पुनर्रचना करण्यात आली आहे. 
 2. नवा पोशाख राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान (NIFT, दिल्ली) यांच्या सल्लामसलतीने तयार करण्यात आला.
 3. नव्या पोशाखासाठी त्यांना दरवर्षी 5000 रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) देशभरात पोशाख पुरविणार. 
 4. देशात 90,000 पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) कार्यरत आहेत.  
 5. टपाल विभाग (DoP) हे ‘भारतीय टपाल’ म्हणून भारत सरकारद्वारे संचालित एक टपाल प्रणाली आहे.
 6. टपाल विभाग भारत सरकारच्या संचार मंत्रालयाचा भाग आहे. देशात 1,55,015 टपाल कार्यालयांचे जाळे आहे आणि हे जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले टपाल जाळे आहे.
 7. याची स्थापना 1 एप्रिल 1854 रोजी ब्रिटिश राजवटीत झाली 1870 साली याचे पहिले अधीक्षक नियुक्त करण्यात आले आणि अलाहाबादमध्ये येथे नियुक्ती झाली.
 8. 1876 साली ब्रिटीश भारत हे जनरल पोस्टल युनियनचे प्रथम गैर-स्थापित सदस्य झाले.
 9. आशियातील पहिले चिपकवले जाणारे टपाल तिकीट जुलै 1852 मध्ये भारताच्या सिंधे जिल्ह्यात बार्टले फ्रेरे (भागाचे मुख्य आयुक्त) यांनी प्रस्तुत केले.


In the scorpion category 'INS Karanj' launches

 1. स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘आयएनएस करंज’चे ३१ जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉक येथून जलावतरण करण्यात आले.
 2. ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत स्कॉर्पियन वर्गातील ६ पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरू आहे. या ६ पाणबुड्या २०२०पर्यंत नौदलात सामील करण्याचे उद्दीष्ट आहे.
 3. यापूर्वी याच श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी आणि खांदेरी या पाणबुड्यांचे जलावतरण पार पडले होते.
 4. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या आयएनएस करंजमुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार आहे.
 5. नौदलाचे चीफ अॅडमिरल : सुनील लांबा
करंज पाणबुडीची वैशिष्ट्ये
 1. फ्रान्सच्या मदतीने ‘मेक इंन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली करंज ही पूर्णपेण स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे.
 2. या पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, उंची १२.३ मीटर आहे. तिचे वजन १५६५ टनआहे.
 3. टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते. या पाणबुडीतून जमीनीवरही मारा करता येतो.
 4. युद्धाच्या वेळी अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते. ती कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत नाही.
 5. या पाणबुडीचा वापर प्रत्येत प्रकारच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामातही केला जाऊ शकतो.
 6. शत्रूला नेमके शोधून लक्ष्य करणे आणि पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमताही या पाणबुडीत आहे.
 7. जास्तीत जास्त काळ पाण्याखाली राहता यावे यासाठी पाणबुडीत ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था आहे.


Top