1. मोहटा देवस्थान ट्रस्ट शासकीय अनुदान घेत असल्याने या देवस्थानला माहिती अधिकार लागू होतो,असा महत्त्वपूर्ण निर्वाळा जिल्हा न्यायालयातील अपिलीय अधिकारी तथा जिल्हा न्यायाधीश एस.व्ही. माने यांनी दिला आहे.
 2. जिल्हा न्यायाधीशांनी अध्यक्ष म्हणून या देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली, ही माहिती मागणारा अर्ज देवस्थानकडे वर्ग करण्याचा आदेशही माहिती अधिकार्याला देण्यात आला आहे.
   
 3. जिल्हा न्यायाधीश हे जगदंबा देवी ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष असतात.अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीशांनी सन २०१५,  ०१६ २०१ या कार्यकाळात देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली.
 4. तसेच गत ११ जानेवारीला देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीला विद्यमान अध्यक्ष सुवर्णा केवले  या उपस्थित होत्या का? याबाबतची माहिती जि  ल्हा   न्यायाल याकडे माहिती अधिकारात मागण्यात आली होती. 


 1. मुंबईत “जिओ पारशी जाहिरात टप्पा-2” चे उद्घाटन केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते करण्यात आले.
 2. अल्पसंख्याक मंत्रालयाने ‘जिओ पारशी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वैद्यकीय मदत आणि सल्लामसलत यांच्या माध्यमातून पारशी समाजाच्या लोकसंख्या वाढीवर भर दिला जात आहे. २०१३  साली योजनेच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली होती.या अंतर्गत १०१  पारसी बालकांचा जन्म झाला.


 1. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने प्रलंबित भारत-रशिया प्रकल्पासंबंधी कराराला त्यांची मंजूरी दिली आहे, ज्याअंतर्गत दोन्ही देश संयुक्तपणे "पाचव्या पिढीचे” लढाऊ विमान (FGFA) विकसित करतील. या मंजुरीनंतर दोन्ही बाजू संशोधन व विकास करार करतील. ज्याअंतर्गत दोघेही प्रकल्पावर एकूण $ ६.१ अब्ज (प्रत्येकी $3.05 अब्ज) खर्च करण्यास बाध्य असतील.
 2. सुखोईने विमानासाठी ‘प्रोस्पेक्टिव्ह एयरबोर्न कॉम्प्लेक्स ऑफ फ्रंटलाइन एव्हिएशन (PAK-FA)’ हे फ्लाइंग प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. यामध्ये ‘इझ्डेलिये 30’ नावाचे AL-41FI इंजिन बसविलेले आहे. हे इंजिन वर्तमान सुखोई-30 MKI च्या AL-31 इंजिनची प्रगत आवृत्ती आहे.
 3. 2007 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने रशियाच्या सुखोई डिझाईन ब्युरो सोबत FGFA करार झाला.


 1. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) च्या चेन्नईमधील प्रयोगशाळेने “मंत्रा MUNTRAMission  UNmanned  TRAcked)” या नावाचा भारताचा पहिला मानव-रहित रणगाडा तयार केला आहे.
 2. मंत्रा-S हा मानव-रहित टेहळणीसाठी, मं त्रा- M हा सुरुंग शोधण्यासाठी आणि मं  त्रा - N हा रणगाडा आण्विक किरणे वा जैविक शस्त्रांचा धोका असलेल्या क्षेत्रात तैनात करण्यासाठी तयार केले गेले आहे. यामध्ये टेहळणी रडार, लेझर रेंज कॅमेरा बसविलेला आहे. ही उपकरणे 15 किलोमीटर क्षेत्रात टेहळणी करू शकतात.


Top