Prime Minister's visit to East Asia and India's '' East-East '' policy

 1. आग्नेय आशियातल्या इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया या तीन देशांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. 29 मे 2018 रोजी प्रथम त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली.
 2. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधानांची इंडोनेशियाची ही पहिलीच भेट आहे. या भेटीत भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाला चालना मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 3. ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाबाबत:-
  1. भौगोलिकदृष्ट्या दूर असल्यामुळे ईशान्येमधील सर्व राज्ये भारताच्या मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित राहिली आहेत.
  2. चीन, म्यानमार, भूटान, बांग्लादेश आणि नेपाळ यांनी वेढलेल्या ईशान्य भारतीय राज्यांना जवळपास 5436 किलोमीटर एवढी आंतरराष्ट्रीय सीमा आहे.
  3. भारतासाठी म्यानमार हे आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार आहे, तर ईशान्येतील राज्ये म्यानमारला जोडणारा दुवा आहेत.
  4. त्यामुळेच ईशान्य भारत भू-राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.
  5. 1992 साली तत्कालीन भारतीय पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी ASIAN देशांशी संबंध दृढ करण्यासाठी ‘लुक ईस्ट’ धोरण आखले.
  6. ‘अॅक्ट ईस्ट’ हा त्याचाच पुढला टप्पा आहे. ‘लुक ईस्ट’पासून रुंदावत गेलेला हा ईशान्येकडील मार्ग आता पुढील वाटचालीसाठी सज्ज झाला आहे.
  7. ‘लुक ईस्ट’ धोरणाचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भारत ASIAN सोबतच विस्तारित आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांशी राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामरिक संबंध दृढ करणे.
  8. ईशान्येमध्ये दळणवळणाच्या साधनांचा विकास ही ‘अॅक्ट ईस्ट’च्या यशस्वीतेसाठी पूर्वअट आहे.
  9. जमीन सीमा करारामुळे भारत आणि बांग्लादेश एकमेकांच्या जवळ येण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली आणि हिंद महासागर क्षेत्रात सहकार्याचा करार भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
  10. उप-प्रादेशिक पातळीवर मालवाहतुकीला चालना देण्यासाठी बांग्लादेश, भूटान, भारत आणि नेपाळ यांनी मोटार वाहन परिवहन करार केला.
  11. याशिवाय भारताने म्यानमार व थायलंडसह त्रिपक्षीय महामार्गाची उभारणी सुरू केली आहे.
  12. तसेच कोलकाता बंदर सागरीमार्गे म्यानमारमधील सिटवे बंदराला जोडले जात आहे. या सर्व घडामोडींचा सकारात्मक परिणाम म्हणजे ईशान्य भारतामध्ये व्यापाराला प्रोत्साहन मिळेल.
  13. याप्रमाणेच या देशांसोबत दळणवळण व्यवस्था वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने भारताचे प्रयत्न सतत चालू आहेत, ज्यामुळे व्यापाराला चालना मिळणार आणि परिणामी रोजगारात वाढ होईल.


 The European Union enacted the law for foreign temporary workers

 1. युरोपीय संघाने परदेशी तात्पुरत्या कामगारांसंबंधी कायदा आणखी कडक केला आहे.
 2. नव्या कायद्यानुसार, कंपन्या जेव्हा कामगारांना दुसर्‍या एखाद्या युरोपीय देशामध्ये तात्पुरते नियुक्त करतात ,तेव्हा त्यांना स्थानिक मानदंडांचे पालन करणे अनिवार्य आहे.
 3. नव्या संशोधित नियमाद्वारे, एखाद्या पदावर नियुक्त कंत्राटी कामगाराला त्याच्याच पातळीवर काम करणार्‍या कायम कामगारांच्या इतकेच समान पातळीवर वेतन देऊ केले जाईल.
 4. युरोपीय संघ (EU) हा मुख्यतः युरोपमध्ये स्थित 28 सदस्य देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह आहे.
 5. हा समूह 1 नोव्हेंबर 1993 साली स्थापित करण्यात आला. सकल स्थानिक उत्पादन (GDP) याने युरोपीय संघ ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
 6. ब्रिटन EU मधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत आहे.
युरोपीय संघ
 1. युरोपियन महासंघ हा युरोप खंडातील २८ देशांचा संघ आहे.
 2. या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयु्क्तता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन युरो(€) अस्तित्वात आणणे हे आहे.
 3. युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभले आहे.
 4. संघाची एकूण लोकसंख्या ४९ कोटी ३० लाख आणि वार्षिक उत्पन्न (GDP) €१०५ ($१३७) निखर्व आहे. युरोपियन संघात खालील देश आहेत.
 5. युनायटेड किंग्डममध्ये २३ जून २०१६ रोजी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ब्रिटिश नागरिकांनी युरोपियन संघ सोडण्याच्या बाजूने कौल दिला.
 6. त्यामुळे २०१९ साली युनायटेड किंग्डम अधिकृतपणे युरोपियन संघातून बाहेर पडेल.

 


 Indian aircrafts are economical in the world

 1. किफायतशीर दरात आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा देणाऱ्या जगभरातील आघाडीच्या पाच कंपन्यांमध्ये इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या भारतीय कंपन्यांचा समावेश झाला आहे.
 2. ‘ग्लोबल फ्लाइट प्रायसिंग रिपोर्ट’च्या मते या यादीत एअर इंडिया एक्स्प्रेस दुसऱ्या तर, इंडिगो पाचव्या स्थानी आहे.
 3. याशिवाय या यादीमध्ये जेट एअरवेज (१२व्या) आणि एअर इंडिया (१३व्या) या दोन भारतीय कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
 4. हा अहवाल मेलबर्न येथील ‘रोम टू रियो’ या वेबसाइटने तयार केला आहे.
 5. यात प्रति किलोमीटर प्रवासाला येणाऱ्या खर्चाच्या आधारे जगभरातील २०० मोठ्या प्रवासी विमानकंपन्यांची तुलना करण्यात आली आहे.
 6. एअर एशिया एक्स्प्रेस या विमानकंपनीने यादीत प्रथम स्थान पटकावले आहे.
 7. या कंपनीचा प्रति किलोमीटरसाठी सरासरी प्रवासी खर्च ०.०८ डॉलर आहे.
 8. या अहवालानुसार जगभरातील सर्वात स्वस्त पाच प्रवासी विमान कंपन्यांमध्ये चार कंपन्या आशिया खंडातील आहेत.
 9. टॉप ५ कंपन्यांमध्ये इंडोनेशिया एअर एशिया आणि प्रायमेरा एअरलाइन्स या अन्य दोन कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
 10. या यादीतील टॉप १० मध्ये एकाही ब्रिटिश आणि अमेरिकन कंपनीचा समावेश झालेला नाही. 


Top