1. भारतीय बॅडमिंटनपटू किडांबी श्रीकांथने पॅरिसमध्ये खेळल्या गेलेल्या 'फ्रेंच ओपन सुपर सीरीज २०१७' स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.
  2. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीकांथने जापानच्या केंता निशिमोतो याचा पराभव केला.
  3. हा चालू हंगामातील श्रीकांथचा चौथा किताब आहे.
  4. फ्रेंच ओपन ही एक वार्षिक बॅडमिंटन स्पर्धा असून ती १९०९ सालापासून फ्रान्स बॅडमिंटन फेडरेशनकडून आयोजित केली जात आहे.


  1. आइसलँडचे वर्तमान पंतप्रधान बर्जनी बेनेडिक्सन यांच्या इंडिपेंडेंट पक्षाने देशात झालेल्या आकस्मिक निवडणूकीत पुन्हा एकदा विजय प्राप्त केला आहे.
  2. इंडिपेंडेंट पक्षाने संसदेच्या ६३ जागांपैकी १६ जागांवर विजय मिळवला. मात्र नवीन सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना युतीच्या माध्यमातून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
  3. एकूण आठ पक्षांनी संसदेत जागा जिंकलेल्या आहेत, त्यात लेफ्ट-ग्रीन मूव्हमेंट (११), सोशल डेमोक्रेटिक अलायन्स (७), पायरेट्स (६) या पक्षांचा समावेश आहे.
  4. आइसलँड हे एक नॉर्डिक बेट राष्ट्र आहे. या देशाची राजधानी रिक्जेविक शहर आणि चलन आइसलँडिक क्रोना हे आहे.


Top