Chief election commissioner Sunil Arora took charge as chairman of Association of World Election Bodies (AWEB)

 • भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ह्यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) या आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्षपद स्वीकारले.

 

 • सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी AWEBचे अध्यक्षपद रोमानियाकडून भारताकडे सोपविण्यात आले आहे.2017 साली झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला होता.

 

 • रोमानियाचे प्रतिनिधी आयन मिनकू रेड्यूलेस्कू ह्यांनी AWEBचा ध्वज सुनील अरोरा ह्यांना सोपवला आणि आता हा ध्वज सन 2021 पर्यंत भारताकडे राहणार.

​​​​​​​

 • अरोरा यांनी अशी घोषणा केली की दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवी दिल्लीतल्या ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेन्ट (IIIDEM) या संस्थेमध्ये एक AWEB केंद्र सुरू केले जाणार आहे.


Dr Pramod Kumar Mishra, has been appointed as Principal Secretary to the Prime Minister of India.

 

 • ओडिशामध्ये जन्मलेल्या नोकरशहा पीके मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन प्रधान सचिव म्हणून पदभार स्वीकारला. 

 

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी नुकतेच पदाचा राजीनामा केल्यानंतर हे घडले. यापूर्वी पीके मिश्रा हे पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव होते आणि प्रधान सचिव म्हणून त्यांची नेमणूक केली जात आहे.

 

 • मिश्रा हे १९७२ च्या बॅचचे गुजरात कॅडरचे आयएएस होते. यापूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींसोबत काम केले होते. 

 

 • अर्थशास्त्र विषयात पदवीधर , पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी घेतली आहे .

 

 • कृषी व सहकार विभागात सचिव आणि राज्य विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत.

​​​​​​​

 • पीके मिश्रा यांच्या कृषी मंत्रालयाच्या कार्यकाळात अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचले आणि कृषी जीडीपीमध्ये भरीव वाढ झाली.


Former chief secretary UPS Madan will be the new state election commissioner (SEC)

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 
यू. पी. एस. मदान :

राज्याचे मुख्य सचिव राहिलेले हे 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते.

राज्याच्या मुख्यसचिवासह त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे.

त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे.

मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते.


Lt. Gen. Mukund Naravane takes charge as Vice Chief of the Army Staff

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.

विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर वरिष्ठ कमांडंट या नात्याने पदाच्या शर्यतीत नरवणे आघाडीवर असणार आहेत.

तसेच लेफ्टनंट जनरल डी.अंबू शनिवारी लष्कर उपप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

तर लष्कराच्या पूर्वेकडील कमांडचे प्रमुख म्हणून मनोज नरवणे चार हजार किलोमीटरच्या भारत-चीन सीमेवर तैनात होते.

37 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कमांडचे नेतृत्व केले आहे. जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील दहशतवादी कारवायांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आहे.


Chandrima Shah became the first woman president of Indian National Science Academy

प्रख्यात जीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
● 2020 ते 2022 पर्यंत त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
● याआधी त्या दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थाच्या संचालिका होत्या.

भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी :
● या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, त्यावेळी ही संस्था
"नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया" या नावाने ओळखली जात होती. 1970 पासून ही संस्था भारतीय 'राष्ट्रीय विज्ञान अकादमी' नावाने ओळखली जाते.
● ही विज्ञानातील सर्व शाखांमधील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे.
उद्देश :
देशात विज्ञानाचा प्रसार करणे
मुख्यालय : नवी दिल्ली
● यापूर्वीचे अध्यक्ष : अजय सूद
● वर्तमान अध्यक्षा : चंद्रिमा शहा


Amrita Fadnavis honored as World Peace Ambassador

 1. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना नुकतंच जागतिक शांतीदूत म्हणून सन्मानित करण्यात आलं.
 2. World Peacekeepers Movement चे संस्थापक डॉ. सर ह्यूज (Dr. Sir Hughes) यांच्यां हस्ते अमृता यांना हा सन्मान देण्यात आला. अमृता या मुख्यंत्र्यांच्या पत्नी असल्या तरीही सोशल वर्कर अशी त्यांची स्वतःची वेगळी ओळख देखील आहे.
 3. अमृता फडणवीस मागच्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय आहेत.
 4. त्या सध्या जलसंधारण उपक्रमांवर काम करत आहेत. सर डॉ. ह्यूज यांनी जागतिक शांतीराजदूत म्हणून अमृता यांचा सत्कार केला आहे.
 5. The World Peacekeepers Movement (TWPM) ही एक ऑनलाइन चळवळ आहे. फेसबुकच्या माध्यमातून यात जगभरातील 2 लाखांहून जास्त सामाजिक कार्यकर्ते जोडले गेले आहेत.
 6. ही चळवळ कृतज्ञता, क्षमा, प्रेम, नम्रता, देणे, धैर्य आणि सत्य अशा 7 शांती मूल्यांवर आधारित आहे.
 7. अमृता फडणवीस यांना त्यांच्या सामिजिक कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला.
 8. सामाजिक कार्य, मानवतेची सेवा आणि समाजात शांतता राखण्यासाठी केले गेलेले प्रयत्न याच्या आधारावर अमृता यांना जागतिक शांतीदूत म्हणून सन्मानित करण्यात आलं.
 9. त्यांना एक फ्रेम, सन्मानपत्र, एक पीस हॅपर आणि चांदीचा नाणे देण्यात आलं.


chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी विवेक कुमार याना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विवेक कुमार यांना या नवीन नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) ने मंजूरी दिली आणि अध्यक्ष व कार्मिक विभागाने (डीओपीटी) जारी केली.
2. ते
2004 बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. ते सध्या पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) संचालक म्हणून कार्यरत आहेत. 2014 मध्ये पीएमओ म्हणून ते उप सचिव म्हणून नियुक्त झाले.
3. पीएमचे खाजगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती प्रभारित झाल्यापासून प्रभावी होईल. त्यांचे नवीन कार्यकाल सह-टर्मिनस आधारावर किंवा पुढील ऑर्डर पर्यंत, जे आधी असेल ते होईल.
4.
विवेक कुमार हे संजीव सिंगला यांची जागा घेणार आहेत, ज्यांना आता इस्रायलमध्ये भारताचा राजदूत म्हणून नेमण्यात येईल. सिंगला 1997 च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत.


chalu ghadamodi, current affairs

1. केंद्र सरकारने लष्करात नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापदी नियुक्ती झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहेत.

2. तर सध्या पूर्व कमांडचे प्रमुख असलेले नरवणे लेफ्टनंट जनरल देवराज अंबूयांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. अंबू हे 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत.

3. तसेच नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. रावत हे 31 जानेवारीला निवृत्त होत आहेत

4. लेफ्टनंट जनरल नरवणे हे जून 1980 रोजी ते लष्कराच्या 7व्या शीख बटालियनमध्ये रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये काम केले आहे.


Benjamin Netanyahu will be the longest serving Prime Minister in Israel's history

 1. इस्त्राएलच्या राष्ट्रीय निवडणुकीत बेंजामिन नेतान्याहू यांनी विजय मिळवला आहे.
 2. नेतान्याहू ह्यांची जर पंतप्रधान पदासाठी निवड झाली तर इस्त्राएलचे पंतप्रधानपद भूषवण्याची त्यांची ही विक्रमी पाचवी वेळ असेल.
 3. ते इस्त्राएलच्या 71 वर्षांच्या इतिहासातले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरु शकतात.
 4. इस्राएल हा नैऋत्य आशियामधील एक देश आहे.
 5. त्याला आग्नेय भूमध्य सागराची पूर्व किनारपट्टी लाभलेली आहे.
 6. जेरूसलेम ही देशाची (स्व-घोषित मात्र विवादीत) राजधानी आहे आणि इस्राएली न्यू शेकेल हे राष्ट्रीय चलन आहे.


Justice Pradeep Nandrajog: New Chief Justice of the Bombay High Court

 1. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी 7 एप्रिल 2019 रोजी पदाची शपथ दिली.
 2. न्यायमूर्ती नंदराजोग हे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत होते. तसेच, 2017 साली राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. 
 3. भारतीय उच्च न्यायालय:-
  1. भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
  2. सध्या देशात 25 उच्च न्यायालये (नव्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयामुळे) कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत.
  3. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत.
  4. उच्च न्यायालयात एक मुख्य न्याय‍धीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेल्या संख्येनुसार इतर न्याय‍धीश असतात.
  5. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायाधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.


Top