This year's Pulitzer Prize announced

 1. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या दी न्यूयॉर्क टाइम्स व दी वॉल स्ट्रीट जर्नल यांनी पुलित्झर पुरस्कार पटकावले आहेत.

 2. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ट्रम्प कुटुंबीयांनी त्यांच्या संपत्तीबाबत केलेले दावे खोटे असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने दाखवून दिले होते. त्यात ट्रम्प यांच्या उद्योगांचे विस्तारलेले साम्राज्य व त्यांनी केलेली करचुकवेगिरी यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.

 3. ट्रम्प यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन महिलांना पैसे देऊन त्यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत वाच्यता न करण्यास सांगितले होते. त्याबाबतच्या बातमीसाठी दी वॉल स्ट्रीट जर्नलला राष्ट्रीय वार्ताकनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 4. दी साउथ फ्लोरिडा सन सेटिंनलला लोकसेवा प्रवर्गात हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी मारजोरी स्टोनमल डग्लस हायस्कूलमधील फेब्रुवारी 2018 मधील हत्याकांड व त्यात शाळा व कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे अपयश यावर प्रकाश टाकला होता.


India's 'Namami Gange' initiative got 'Public Water Agency of the Year' book

 1. दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी लंडन (ब्रिटन) या शहरात झालेल्या ‘जागतिक जल शिखर परिषद 2019’ येथे जागतिक जल पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.
 2. ‘ग्लोबल वॉटर इंटेलिजेंस’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने भारताच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) (ऊर्फ ‘नमामि गंगे’) या पुढाकाराला 'पब्लिक वॉटर एजन्सी ऑफ द इयर' हा किताब देण्यात आला आहे.
 3. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय जल उद्योगातल्या उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी तसेच पाणी, सांडपाणी व खार्‍या पाण्याचे रूपांतरण अशा क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारांना पुरस्कृत करण्यासाठी दिला गेला.
 4. अभियानाविषयी:-
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये ‘नमामि गंगे’ अभियानाची सुरुवात केली.
  2. हे अभियान राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) द्वारा चालवले जात आहे. 
  3. अभियानात नदीच्या साफसफाईसाठी एकूण 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना पूर्ण केले जाणार आहे.
  4. यात नदीचा विकास, सांडपाण्याचा निचरा तसेच घाट आणि श्मशान जागांचे निर्माण अशी कार्ये चालवली जात आहेत. 


Narendra Modi got the highest civilian award of Russia

 1. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीयांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे, असे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले.

 2. रशियाने नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ सेंट अ‍ॅण्ड्रू दी अपोस्टल‘ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. परदेशातील राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांनाच हा पुरस्कार देण्यात येतो.

 3. मोदी यांना यूएईने 4 एप्रिल रोजी सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. त्यापूर्वी दक्षिण कोरिया, सौदी अरब आणि यूएनने मोदींना पुरस्कार देऊन गौरविले आहे.

 4. भारत आणि रशियातील भागीदारी त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील जनतेतील मैत्रीपूर्ण संबंध याबाबत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे रशियाने म्हटले आहे.


About 100 people were given 'Maharshi Badrayan Vyas Samman'

 1. शास्त्रीय भाषांच्या क्षेत्रात विद्वानांनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते सुमारे 100 जणांचा 'महर्षी बद्रायन व्यास सन्मान' देऊन गौरव करण्यात आला आहे.
 2. दिल्लीत दिनांक 4 मार्च 2019 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.
 3. त्यात प्रा. मौलाना सैयद असद रझा हुसैनी ह्यांना अरबी भाषेच्या प्रचारासाठी आणि उच्च शिक्षणाच्या प्रचाराच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला गेला.
 4. पुरस्काराबद्दल:-
  1. ‘महर्षी बद्रायन व्यास सन्मान’ हा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे, जो संस्कृत, फारसी, अरबी, पाली, प्राकृत, शास्त्रीय उडिया, शास्त्रीय कन्नड, शास्त्रीय तेलुगू आणि शास्त्रीय मल्याळम या भाषांच्या क्षेत्रात लोकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्याकरिता दिला जातो.
  2. भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार दिला जातो.
  3. सन 2002 मध्ये हा पुरस्कार सादर केला गेला. या पुरस्कारासाठी 30 ते 45 वर्षे वयोगटातल्या तरुण विद्वानांची निवड केली जाते.
  4. राष्ट्रपती कडून दिल्या जाणार्‍या या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि 1 लक्ष रुपये रोख असे आहे.


UAE has honored Narendra Modi with the prestigious Medal Medal

 1. संयुक्त अरब अमीरात (UAE) ने 4 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठित जयद पदक देऊन सन्मानित केले आणि दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले.
 2. संयुक्त अरब अमीरातचे अध्यक्ष शेख खलीफा बिन जायद अल नह्यान यांनी राजे, राष्ट्रपती व राज्यांच्या प्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च सजावट पुरस्कार प्रदान केला.
 3. भारत-संयुक्त अरब अमीरात:-
  1. यूएईचा भारतातील तेल आयातीपैकी 8 टक्के वाटा आहे आणि तो भारताला क्रूड ऑइलचा पुरवठा करणारा पाचवा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे.
  2. देश आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन (ISA) चा एक भाग आहे, ज्याचे मुख्यालय भारतातील गुडगाव येथे आहे.
  3. 2017 मध्ये भारत-संयुक्त अरब अमीरातचा व्यापार 50 अब्ज डॉलर्सचा होता.
  4. यामुळे भारताने संयुक्त अरब अमीरातचा दुसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार बनला होता तर यूएई हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार (चीन व अमेरिका) आहे.
  5. याव्यतिरिक्त, UAE 2016-17 या वर्षासाठी 31 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे व्यवसाय देणारा दुसरा सर्वात मोठा निर्यात देश आहे.


LALIT ACADEMY AWARDS

 1. ललित कला अकादमीच्या 60व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील 15 कलावंतांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, सचिन चौधरी, डगलस जॉन, जीतेंद्र सुतार यांचा समावेश आहे.

 2. या पुरस्कारांचे वितरण मुंबईत होणार आहे. ललित कला अकादमी हे प्रतिभावंत कलाकार व कलांचा गौरव करणारे व त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारे व्यासपीठही आहे.

 3. कला मेळ्यातील प्रदर्शनासाठी कलाकृतींची निवड करणाऱ्या समितीत, तज्ज्ञ, समीक्षक व ज्येष्ठ कलावंतांचा समावेश होता.

 4. तसेच भगवान चव्हाण, जयप्रकाश जगताप, जयंत गजेरा, किशोर ठाकूर, मदन लाल, मनीषा राजू व ओपी खरे यांनी कलाकृतींची निवड केली आहे.


Ministry of Commerce's 'Womania on GeM' initiative

 1. भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस’ (GeM) कडून महिला उद्योजक आणि महिलांच्या स्वयंसेवी गटांना GeM या ऑनलाइन मंचावर विविध उत्पादने विकण्यास प्रोत्साहन देण्याकरिता ‘वुमॅनिया ऑन GeM’ नावाचा नवा कार्यक्रम चालवला जात आहे.
 2. हा उपक्रम महिला उद्योजकांना आणि महिलांच्या स्वयंसेवी गटांना हस्तशिल्प आणि हातमाग, तागाची उत्पादने, गृह व कार्यालयाचे सुशोभीकरण अश्या विविध उत्पादनांची थेट विक्री करण्यास सक्षम करतो.
 3. गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM):-
  1. हा वाणिज्य मंत्रालयाचा एक ऑनलाइन मंच आहे, जेथे सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्था आणि इतर विभागांकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते.
  2. सन 2016 पासून वस्तू व सेवांची भारत सरकारच्या सार्वजनिक खरेदी प्रक्रिया मंत्रालयाच्या ई-मार्केट व्यासपीठाद्वारे (GeM) व्यवस्थापित केली जात आहे.
  3. CII प्रादेशिक कार्यालयांमध्ये GeM संसाधन केंद्रे स्थापन केली गेली आहेत.


gallentry Award distributed by the President

 1. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 14 मार्चला झालेल्या संरक्षण प्रतिष्ठापणा समारंभात शौर्य पुरस्‍कार तसेच विशिष्‍ट सेवा सन्मानांचे वाटप केले.
 2. किर्ती चक्र – सेपोय व्रहमा पाल सिंग (मरणोत्तर), राजेंद्र कुमार नैन (मरणोत्तर), तुषार गौबा
 3. शौर्य चक्र – रविंद्र बबन धनावडे (मरणोत्तर) आणि अन्य 14 जणांना
 4. परम विशिष्ट सेवा पदक – 15 जणांना
 5. अतिविशिष्ट सेवा पदक – 25 जणांना
 6. उत्तम युद्ध सेवा पदक – लेफ्टनंट जनरल सरनजीत सिंग
 7. पुरस्काराविषयी:-
  1. किर्ती चक्र आणि शौर्य चक्र (1952 सालापासून) हे लष्कराच्या कर्मचार्‍यांना शांती काळात दाखविलेल्या शौर्यासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पदक आहेत.
  2. महावीर चक्र नंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीत मोडणारे सन्मान आहेत.
  3. अशोक चक्र (1952 सालापासून) हा देशातील सर्वोच्च शांतता वेळीचा शौर्य पुरस्कार असून शौर्याचे प्रदर्शन दाखविणार्‍या सैनिकाला या शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाते.
  4. विशिष्ट सेवा पदक भारत सरकारतर्फे सशस्त्र दलांच्या सर्व रॅंकच्या कर्मचार्‍यांना ‘विशिष्ट आदेशावरून दिलेल्या असाधारण सेवेसाठी" दिला जाणारा सन्मान आहे.
  5. याची स्थापना दिनांक 26 जानेवारी 1960 रोजी केली गेली.
  6. त्यात उत्तम युद्ध सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि परम विशिष्ट सेवा पदक यांचा समावेश आहे.


ACKO General Insurance Company received the Golden Peacock Innovative Product Award

 1. 2016 साली स्थापना झालेल्या ‘ACKO जनरल इंशुरन्स’ या भारताच्या प्रथम डिजिटल विमा कंपनीला ‘गोल्डन पीकॉक इनोवेटिव्ह प्रॉडक्ट पुरस्कार-2019’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
 2. हा पुरस्कार कंपनीच्या "ओला राइड इंशुरन्स" या मायक्रो इन्शुरन्स उत्पादनासाठी दिला गेला आहे.
 3. अलीकडेच दुबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात या पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
 4. पुरस्काराविषयी:-
  1. 1991 साली ‘कॉर्पोरेट नेतृत्व आणि उत्कृष्टता’ यासाठी दिल्या जाणार्‍या ‘गोल्डन पीकॉक अवॉर्ड’ या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
  2. भारताच्या ‘इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
  3. स्थानिक आणि जागतिक पातळीवरील व्यवसायाच्या उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून आज या पुरस्काराला ओळखले जाते.
  4. त्याअंतर्गत दिला जाणारा ‘गोल्डन पीकॉक इनोवेटिव्ह प्रॉडक्ट/सर्व्हिस अवॉर्ड’ हा विद्यमान बाजारपेठेच्या मागण्यांनुसार उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी संस्थात्मक नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेला आहे.


In Coimbatore, IAF gave two 'President's Colors' to the two parties

 1. दिनांक 4 मार्च 2019 रोजी कोयंबटूरजवळ सुलूर तळावर एका कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय हवाई दलाच्या (IAF) दोन तुकडींना ‘प्रेसिडेंट्स कलर’ प्रदान करून गौरवांकीत केले आहे.
 2. सुलूर सुविधेत काम करणारे ‘5-बेस रिपेयर डेपो’ आणि हैदराबादच्या हकीमपेठ जवळील प्रशिक्षण केंद्र या दोन तुकडींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
 3. राष्ट्रपती मानक/रंग (presidential standard/President’s Colour) किंवा राष्ट्रपती ध्वज हा एक सन्मान आहे, जो राज्यप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष यांचे प्रतीक किंवा राजेशाही मानक म्हणून अनेक देशांमध्ये वापरला जातो.
 4. संरक्षण दलाला मिळणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.
 5. भारतात 26 जानेवारी 1950 पासून हा सन्मान भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून प्रदान केला जात आहे.
 6. या मानकावर चार (2 निळे व 2 लाल) भागामध्ये सोनेरी बाह्यरेखांनी काढलेली राष्ट्रीय प्रतीके कोरलेली आहेत – सिंह, हत्ती (5 व्या शतकाच्या अजिंठा लेणीमधील आदिमानवांची चित्रकला), तराजू (17 व्या शतकातील लाल किल्लामधील), कमळ पुष्पाची फुलदाणी.


Top