
963 11-Mar-2019, Mon
- भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (FICCI) आणि KPMG या सल्लागार संस्थेच्या 'इंडिया अँड ASEAN: को-क्रिएटिंग द फ्यूचर' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारत आणि ASEAN समुहाचे सदस्य असलेल्या 10 अर्थव्यवस्था ई-वाणिज्य आणि डिजिटल व्यापार क्षेत्रात जगातल्या सर्वात वेगाने वाढ होणार्या अर्थव्यवस्थांपैकी आहेत.
- अहवालानुसार जागतिक ई-वाणिज्य विक्री 2014 सालाच्या USD 1.3 लक्ष कोटी एवढ्या रकमेवरून 2021 सालापर्यंत USD 4.5 लक्ष कोटी (ट्रिलियन) पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
- अन्य ठळक बाबी:-
- 2025 सालापर्यंत भारतीय ई-वाणिज्य बाजारपेठ USD 165.5 अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर ASEAN समूहासाठी हा अंदाज USD 90 अब्जपर्यंत आहे.
- चीनचे जागतिक ई-वाणिज्य क्षेत्रावर प्रभुत्व आहे. 2025 सालापर्यंत चीनची ई-वाणिज्य बाजारपेठ USD 672 अब्जपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
- वैश्विक सीमापार ई-वाणिज्य संबंधित उलाढाल 2020 सालापर्यंत USD 1 लक्ष कोटीपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे.
- आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN):-
- आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN) हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे.
- याची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी दिनांक 8 ऑगस्ट 1967 रोजी केली आणि याचे मुख्यालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे.
- ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.