chalu ghadamodi, current affairs

1. संयुक्त राष्ट्रांनी 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला. संयुक्त राष्ट्राने नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे हा दिवस मांडला होता
2. युवा कौशल्य विकासाच्या महत्त्वबद्दल जागरुकता वाढवण्याचा दिवस आहे. दिवसासाठी 2019 ची
थीम म्हणजे जीवन आणि कामाबद्दल शिकणे. आजीवन शिक्षण घेण्याकरिता आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे ही या दिवशी संयुक्त राष्ट्राची आहे.
3. जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 16% तरुण आहेत म्हणजेच 1.2 अब्ज, 15 ते 24 वर्षे वयोगटातील आहेत. शाश्वत, समावेशी आणि स्थिर समाज प्राप्त करण्यासाठी आणि कायमस्वरूपी विकासासाठी आव्हाने आणि धोके टाळण्यासाठी, युवकांचे सक्रिय सहभाग आवश्यक आहे, ज्यात हवामानातील बदल, बेरोजगारी, गरीबी, लैंगिक असमानता, संघर्ष आणि स्थलांतर यांचा प्रभाव समाविष्ट आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. येत्या काळात नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 2 हजार रूपयांचे टेंडर जारी केले आहे. तसेच मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात येत असलेल्या
स्कॉर्पिअन क्षेणीच्या सहा पाणबुड्यांमध्ये हे टॉरपॅडो मिसाईल तैनात करण्यात येणार आहेत.

2. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी 10 दिवसांपूर्वीच एक टेंडर जारी करण्यात आले आहे. स्कॉर्पिअन क्षेणीच्या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकमध्ये सुरू असून त्यांना कलवरी क्लास हे नाव देण्यात आले आहे.

3. तसेच या क्षेणीमधील पहिली पाणबुडी यापूर्वीच नौदलात दाखल करण्यात आली आहे. तसेच सध्या ती पाणबुडी ऑपरेशनल मोडमध्ये आहे. सध्या परदेशी विक्रेत्यांकडून नौदलाची मागणी पूर्ण करण्यात येणार असली, तरी त्यानंतरची मागणी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.

4. तर डीआरडीओ पाणबुड्यांसाठी तसेच लढाऊ युद्धनौकांसाठी हेवीवेट टॉरपॅडो मिसाईलचा वापर करण्याच्या तयारीत आहे. फ्रान्स, स्वीडन, रशिया आणि जर्मनीच्या जागतिक उत्पादकांना हेवीवॅट टॉरपॅडोसाठी टेंडर जारी करण्यात आले आहे.

5. यापूर्वी इटालियन फर्म ‘ब्लॅक शार्क टॉरपॅडो’ या कंपनीची यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु हेलिकॉप्टर घोटाळ्यातील नमेक्केनिका समुहाच्या गुंतवणुकीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.


chalu ghadamodi, current affairs

1. सन 622 मध्ये प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.

2. अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी 16 जुलै 1945 मध्ये केली.

3. सन 1965 मध्ये ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.

4. गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय 16 जुलै 1998 रोजी घेण्यात आला.


chalu ghadamodi, current affairs

1. तांत्रिक अडचणीमुळे 'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. आज १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते. 

2.भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाली असली तरी भारतीय नागरिक इस्रोसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

3. चांद्रयान-२ एकूण १२ भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे. वजन ३.८ टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन. चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहीम झालेली नाही


chalu ghadamodi, current affairs

1. १६६२: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.

2. १५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन.

3. २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

4. १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

5. १९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन.


chalu ghadamodi, current affairs

1. दिवसेंदिवस ट्विटर हा सर्वात महत्त्वाचा भाग होत आहे.ट्विटरने त्याच्या व्यासपीठावरील भाषा समाविष्ट करण्यासाठी द्वेषपूर्ण वर्तनाविरूद्ध त्याचे नियम विस्तृत केले जे इतरांना धर्माच्या आधारावर अपमानित करते.
2. ट्विटरचा मुख्य हेतू म्हणजे प्राथमिक फोकस ऑफलाइन हानीच्या जोखमींना संबोधित करणे होय आणि संशोधनातून असे दिसून येते की भाषेला अपमानित करणे ही जोखीम वाढवते.
3. धर्मांवर आधारित द्वेषयुक्त सामग्रीवर बंदी घालण्यासाठी ट्विटरने विविध समुदायां आणि संस्कृतींकडून अभिप्राय मागितला.परंतु बर्याच लोकांनी ट्विटरच्या नियमांचे प्रामाणिक आणि सातत्याने अंमलबजावणी करण्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली.
4. उत्तरदायित्वांनी कंपनीला धोरण उल्लंघनाची व्याख्या करताना आणि नियमांच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसंगत असल्याचे स्पष्ट करण्यास सांगितले


chalu ghadamodi, current affairs

1. जागतिक बॅंक ग्रुपने घोषित केले की, भारताच्या अंशुला कांत 12 जुलैला यांची पुढील एमडी आणि सीएफओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
2. अंशुला कांत ही बँकेची
पहिली महिला सीएफओ आहे. वित्तीय आणि जोखीम व्यवस्थापनासाठी ती जबाबदार असेल. आर्थिक संसाधनांची भरपाई करण्यासाठी ती बँकच्या सीईओ क्रिस्टलिना जॉर्जिवाबरोबर काम करतील.
3. वित्त, बँकिंग आणि तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण वापरामध्ये अंशुला 35 वर्षांहून अधिक कौशल्याचा अनुभव आहे. त्यांनी पूर्वी
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएफओ म्हणून काम केले होते. लेडी श्रीराम कॉलेजमधील अर्थशास्त्र विषयातील पदवी आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. १८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म.
2. १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन
3. १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
4. १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी
डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
5. २०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची
तार सेवा बंद झाली


chalu ghadamodi, current affairs

1. १६६०: पावनखिंडीतील लढाई.

2. १८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म.

3. १६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

4. १९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

5. १९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.


chalu ghadamodi, current affairs

1. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला देशातीलच नव्हे तर आशिया, आफ्रिका आणि इतर खंडात लसींचा तसेच विविध प्रकारच्या औषधांचा पुरवठा करणारी एक प्रमुख संस्था बनविले जाईल. यासाठी संस्थेला सर्व प्रकारची प्रशासकीय आणि आर्थिक मदत केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

2. श्री. रावल यांनी परळ येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला भेट देऊन महामंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाने विविध ९ प्रकारच्या औषधगोळ्या तयार करण्याचा हाती घेतलेला प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे, असे मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.

3.‘हाफकिन’ ही भारतासह आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांना पोलिओ लसींचा पुरवठा करणारी प्रमुख संस्था आहे. 


Top