MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आठवडाभरापासून रखडलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर रविवारी जाहीर करण्यात आले.

2. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले गृहखाते राष्टवादी काँग्रेसकडे गेले असून, आता विदर्भातील राष्टवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे नवे गृहमंत्री असतील. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मंजुरीनंतर खातेवाटपाची अधिकृत घोषणा झाली.

3. खातेवाटपात राष्ट्रवादीकडे गृह, वित्त व नियोजन, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन यांसारखी महत्त्वाची खाती आली आहेत.

4. तर, काँग्रेसकडे महसूल व ऊर्जा या खात्यांह सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मदत पुनर्वसन, ओबीसी, क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धविकास, वस्रोद्योग आदी खाती आली.

5. ग्रामविकास अथवा कृषिखात्यासाठी काँग्रेसने जोर लावला होता. मात्र, ही दोन्ही खाती काँग्रेसला मिंळाली नाहीत.

6 . ग्रामविकास खाते राष्ट्रवादीकडे तर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आहे.

7. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय ही खाते स्वत:कडे ठेवली आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. राज्यातील कोणत्याही भागात साथरोगाचे रुग्ण आढळल्यास त्याची ‘रिअल टाईम’ माहिती आरोग्य विभागाला मिळणार आहे.

2. विविध आजारांच्या माहितीच्या आधारे साथरोगाच्या उद्रेकाचा इशारा देणारी ही संगणकीय प्रणाली राज्यात पुढील महिनाभरात कार्यान्वित होईल. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

3. एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठ (आयएचआयपी) अंतर्गत ही प्रणाली सुरू केली जाणार असून महाराष्ट्र देशातील नववे राज्य ठरले आहे.

4. तसेच केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे ‘आयएचआयपी’ हे व्यासपीठ विकसित केले आहे. देशात नोव्हेंबर 2018 पासून टप्याटप्याने काही राज्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सुरू करण्यासाठी काही दिवसांपासून तालुका, जिल्हापातळीवर कर्मचारी, अधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू होते.

5. संगणकीय प्रणाली तीन पातळ््यांवर काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची माहिती तेथील आरोग्य सेवकांकडून ‘एस’ फॉर्म (संशयित) मध्ये भरली जाईल. त्यांच्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुका पातळीवरील सरकारी रुग्णालये, आरोग्य
6. केंद्रांमधील रुग्णांची माहिती (पी फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुना तपासणीनंतरच्या निदानाची माहिती (एल फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. हे तिनही फॉर्म एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. गावपातळीवर भरलेली माहिती सर्व सरकारी रुग्णालये, प्रयोगशाळांना पाहता येऊ शकते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मुंबई विमानतळावरून सध्या सुरू असलेल्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ करून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याचा निर्धार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडतर्फे करण्यात आला आहे.

2. रशिया, चीनसह किमान 7 आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये मुंबईतून थेट विमानसेवा सुरू करण्याचे प्रशासनाचे 2020 साठीचे उद्दिष्ट आहे.

3. तर सध्या मुंबई विमानतळावरून 47 आंतरराष्ट्रीय ठिकाणी, तर 61 देशांतर्गत ठिकाणी विविध हवाई वाहतूक कंपन्यांद्वारे उड्डाणे केली जातात. यामध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे.

4. तसेच 2018-19 मध्ये मुंबई विमानतळावरून 4 कोटी 88 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर, विमानतळाची प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

5. फार्मास्युटिकल कंपनीच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी विमानतळावर गतवर्षी तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेली वाहतूक व्यवस्था पुरविण्यास प्रारंभ केला आहे. देशातील सर्वात मोठी, विमानतळावरील फार्मा मालवाहतूक हाताळण्याची क्षमता मुंबई विमानतळावर तयार करण्यात येत असून, या माध्यमातून 2020 मध्ये 4 लाख 50 हजार टन फार्मा साहित्याची ने-आण करण्याची क्षमता निर्माण करण्यात येईल.

6. मालवाहतूक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सुविधा पुरविण्यासाठी पेमेंट गेटवे, व्हेइकल स्लॉट मॅनेजमेंट, आॅनलाइन डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकमधील तुमकूर येथे दौरा करणार असून नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना भेट देणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार कोटी जमा केले जाणार आहेत. जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.

3. तसेच देशभरात अनेक ठिकाणी कापणीचा हंगाम सुरु होणार असून त्याआधी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याने फायदा होईल. आर्थिक वर्षातील हा तिसरा हफ्ता आहे. है पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करताना लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील अशी घोषणा केली होती.

5. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यावेळी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास दोन हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

 

1. भारतीय संसदेची नवीन इमारत अनेक अर्थांने खास असणार आहे. नवीन इमारतीचा आकार त्रिकोणी असणार आहे.

2. या इमारतीला तीन मोठे मिनार असणार आहेत. इतकचं नाही नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या इमारतीच्या तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.

3. तर याशिवाय पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बंधण्याचीही तयार करण्यात येत आहे.

4. तसेच याच वर्षी 13 सप्टेंबर रोजी शहरी विकास मंत्रालयलाने पंतप्रधानांच्या घरासंबंधीच्या या प्रकल्पाची घोषणा केली केली आहे. हे घर बांधण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून निविदाही मागवण्यात आल्या होत्या.

5. ऑक्टोबर महिन्यामध्ये गुजरातमधील एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमीटेडची निविदेला सरकारने पसंती दर्शवली.

6. सर्व कंपन्यांना मागे टाकत गुजरातमधील डॉ. बिमल पटेल यांच्या या कंपनीने हे कंत्राट मिळवले आहे.

7. 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे. या योजनेशी संबंधित एका सरकारी अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या दिल्लीतील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकला संग्रहालयामध्ये रुपांतरीत करण्याचा सरकारचा विचार आहे.


 MPSC chalu ghadamodi, current affairs

 • पाण्याखालून हल्ला करण्याची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय नौदलाची 24 पाणबुडया बांधणीची योजना आहे.
 • तर यात सहा अण्विक पाणबुडयांचा समावेश असेल. नौदलाने संसदीय समितीला ही माहिती दिली. सागरी क्षेत्रात पाकिस्तान आणि चीनचे आव्हान वाढत चालले आहे. नौदलाच्या ताफ्यात सध्या 15 पाणबुडया आणि दोन अण्विक पाणबुडया आहेत. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र या दोन अण्विक पाणबुडया सेवेमध्ये आहेत.
 • तसेच अरिहंत स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे तर, चक्र रशियाकडून भाडयावर घेतली आहे. बहुतांश पारंपारिक पाणबुडया 25 वर्ष जुन्या आहेत.
 • 13 पारंपारिक पाणबुडया 17 ते 31 वयोगटातील आहेत. प्रोजेक्ट 75 अंतर्गत सहा नवीन पाणबु़डया बांधण्याच्या योजनेवर नौदल काम करत आहे. हिंद महासागर हे भारतीय नौदलाचे कार्यक्षेत्र असून मागच्या काही वर्षात या भागात चिनी नौदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. भारतीय नौदलाने आधुनिकीकरणावर भर दिला आहे. अनेक नव्या युद्ध नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

 

 • भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देशातील सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आता 5Gच्या चाचण्या घेणार आहेत.
 • तर यापूर्वी 4G इंटरनेट सुविधेमुळे भारतातल्या इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आहे. यामुळे लोकांच्या हातातील जुन्या आणि मर्यादित सुविधा उपलब्ध असणारे मोबाईल फोन जाऊन त्याची जागा स्मार्टफोन्सनी घेतली.
 • यानंतर आता भारत इंटरनेटच्या दुनियेत आणखी मोठ्या बदलावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे.
 • सरकार टेलिकॉम क्षेत्रातील सर्व कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटणार आहे. त्यासाठी आम्ही 5G तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. यापुढे 5Gचं आता भविष्य आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणार आहोत. सर्व टेलिकॉम कंपन्या या तंत्रज्ञानाच्या चाचणीमध्ये सहभागी होऊ शकतात, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

 

 • ज्यांनी अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे.
 • तर सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या संपणार होती. मात्र आधार-पॅन लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. आत्तापर्यंत मुदतवाढ देण्याची ही आठवी वेळ आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एक निर्णय दिला होता. ज्यानुसार आधार कार्ड आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड हवं असल्यास बंधनकारक आहे. 1 जुलै 2017 पासून पॅन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

 • निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात 2019 मध्ये पुन्हा केरळच पहिल्या क्रमांकावर आले असून या शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ती योजनेत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची सामाजिक, आर्थिक, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरी तपासली जात असते.
 • तर एसडीजी इंडिया निर्देशांक 2019 अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यात उत्तर प्रदेश, ओदिशा, सिक्कीम या राज्यांनी बरीच प्रगती केल्याचे दिसून आले.
 • तसेच गुजरातमध्ये 2018 च्या क्रमवारी तुलनेत काही प्रगती झाली नाही. केरळने पहिला क्रमांक कायम राखला असून 70 गुण प्राप्त केले. चंडीगड केंद्रशासित प्रदेशात प्रथम क्रमांकावर असून त्याला 70 गुण मिळाले.
 • हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला. बिहार, झारखंड, अरुणाचल यांची कामगिरी खराब झाली आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा अहवाल जारी करताना सांगितले की, संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 पर्यंत साध्य करताना त्यात भारताची मोठी भूमिका असणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मध्य प्रदेशच्या 18 वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने आर. आर. लक्ष्य चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या एअर रायफल नेमबाजी स्पर्धेतील 10 मीटर वरिष्ठ गटाचे रविवारी सुवर्णपदक पटकावले.

2. तर वर्षांच्या पूर्वार्धात 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिक पात्रता स्थान निश्चित करण्याची किमया साधणारा ऐश्वर्य पहिल्या 10 फैरींमध्ये राजस्थानच्या 16 वर्षीय यश वर्धनपेक्षा पिछाडीवर होता; परंतु 10.7, 10.8 आणि 10.9 असे सातत्याने गुण मिळवणाऱ्या ऐश्वर्यने एकूण 252.2 गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.

3. यशने 250.7 गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर हृदय हझारिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

4. गतविजेत्या दिव्यांश सिंग पनवारला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

5. तसेच कनिष्ठ गटात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने 249.9 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर पवन अंधारेला रौप्यपदक मिळाले. सौरव लगडने कांस्यपदक पटकावले.


Top

Whoops, looks like something went wrong.