MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पाकिस्तान बरोबर पुन्हा हवाई युद्धाचा प्रसंग उदभवल्यास F-16 फायटर विमानांना रोखण्यासाठी भारताने फ्रान्सला पहिली चारही राफेल फायटर विमाने मेटेओर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करुन देण्याची विनंती केली आहे.

2. भारताने फ्रान्स बरोबर 36 राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला आहे.

3. तर यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात फ्रान्सच्या हवाई दलाच्या तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या औपचारीक कार्यक्रमामध्ये पहिली चार विमाने भारताला सुपूर्द करण्यात आली.

4. त्याचवेळी भारताकडून फ्रान्सला आठ ते दहा मेटेओर क्षेपणास्त्रे देण्याची विनंती करण्यात आली. सध्या फ्रान्समध्ये इंडियन एअर फोर्सच्या इंजिनिअर्स आणि वैमानिकांना राफेल विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

5. तसेच पुढच्यावर्षी मे महिन्यात पहिल्या चार राफेल विमानांचे भारतामध्ये लँडिंग होईल. अंबाला बेसवर ही विमाने तैनात असतील.

6. मेटेओर हे एअर टू एअर लढाईमधील सर्वोत्तम मिसाइल आहे. बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे नजरेपलीकडच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणारे हे मिसाइल आहे.

7. मेटेओर मिसाइलद्वारे 120 ते 150 किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान पाडणे शक्य आहे. सध्याच्या घडीला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे असे मिसाइल नाही.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. रिझर्व्ह बँकेने आजच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला.

2. तसेच बँकेने भलेही रेपो रेटमध्ये कपात केलेली नसली तरी सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत काही मोठे निर्णय घेतलेत. आरबीआयने एटीएमबाबत काही मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याचे व एक विशेष कार्ड लाँच करण्याचे संकेत दिले आहेत.

3. तर सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने विविध बँकांचे ATM बद्दलचे नियम बदलणार आहेत. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे.

4. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे. एटीएम मशिनमधून पैसे बाहेर पडण्याची जी प्रणाली आहे ती अधिक सक्षम बनवावी, या मशिनमध्ये वापरण्यात येणारे अप्लिकेशन अर्थात सॉफ्टवेअरमध्येही बदल करावेत. त्यावर सातत्याने निगराणी राखावी. महत्वाच्या डेटा सुरक्षित ठिकाणी असावा, त्यावरील प्रक्रिया आणि त्याचे हस्तांतर व्यवस्थित व्हावे असे काही मार्गदर्शक तत्वे बँकेने तयार केली आहेत.

5. शॉपिंगसाठी नव्या कार्डसोबतच आरबीआयने प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट (PPI) लाँच करण्याची घोषणाही केली आहे. याचा वापर 10 हजार रुपयांपर्यंतचं सामान किवा सेवा खरेदी करण्यासाठी करता येईल.

6. आरबीआयनुसार हे कार्ड बँक अकाउंटद्वारे रिचार्ज करता येईल. याचा वापर बिल पेमेंट करण्यासह अन्य प्रकारच्या खरेदीसाठी केला जाऊ शकतो. याशिवाय पीपीआय कार्डला बँकेत रोख रक्कम भरुन देखील रिचार्ज करता येईल. तसंच, डेबिट कार्डद्वारे रिचार्जचा पर्यायही उपलब्ध असेल. एका महिन्यात कमाल 50 हजार रुपयांपर्यंत

7. रिचार्ज करता येईल. याबाबत अधिक माहिती 31 डिसेंबर 2019 पर्यंत दिली जाणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. प्रमुख व्याजदर स्थिर ठेवताना रिझव्‍‌र्ह बँकेने केवळ चार महिन्यांच्या फरकाने विकासदर अंदाजात 1.90 टक्के कपात ही दशकातील सर्वात मोठी दर अंदाज कपात ठरली आहे.

2. तर चालू वित्त वर्षांसाठीचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अंदाज 5 टक्के व्यक्त करण्यात आला असून, चार महिन्यांपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने 6.9 टक्के विकासदराचे भाकीत केले होते.

3. तसेच चालू वित्त वर्षांतील आतापर्यंतच्या पाच द्विमासिक पतधोरणादरम्यान झालेली एकूण 2.40 टक्के विकास दर अंदाज कपात ही 2012-13 मधील 1.80 टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे.

4. रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारच्या पतधोरणाद्वारे व्याजदर बदलेले नाहीत. यापूर्वी सलग पाच पतधोरण आढावा बैठकीत विकास दराला प्राधान्य देताना व्याजदर कपात केली गेली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. यंदा 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे 10 ते 12 जानेवारी दरम्यान होत आहे.

2. तर दर वर्षी संमेलनामध्ये एक प्रकाशक आणि एका साहित्यिकाचा विशेष सन्मान केला जातो. साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान केला जाणार आहे.

3. तसेच शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांना संमेलनात गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचाही सन्मान होणार आहे.

4. साहित्य संमेलनात महिला साहित्यिकांना अध्यक्षपद भुषवण्याची संधी खूप कमी वेळा मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून एक साहित्यिक आणि एक प्रकाशक यांचा संमेलनात विशेष सन्मान केला जातो.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. महिलांवरच्या राक्षसी हल्ल्यांमुळे देशाच्या विवेकालाच हादरा बसला आहे त्यामुळे ज्यांना पॉक्सो कायद्याखाली दोषी ठरवण्यात आले आहे त्यांचा दयेच्या अर्जाचा (याचिकेचा) अधिकार काढून घेतला पाहिजे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. देशातील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी जळजळीत भाष्य करताना ठोस संदेश दिला.

2. अशा आरोपींचा दयेच्या अर्जाचा अधिकार नाकारायचा की नाही याचा निर्णय संसदेने घ्यायचा आहे, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. पण आमचा सर्वाचा विचार आता त्या दिशेने आहे, असे त्यांनी माउंट अबू येथे महिला सुरक्षेवर आयोजित कार्यक्रमात सांगितले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. विप्रो कंपनीचे एके काळचे प्रमुख अझीम प्रेमजी हे आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले. फोर्ब्ज मासिकाने आशियातील 30 दानशूर व्यक्तींची यादी प्रकाशित केली असून, त्यात प्रथमच स्थानावर अझीझ प्रेमजी आहेत.

2. तर या 30 दानशूरांच्या यादीत भारतातील किरण मजुमदार-शॉ, त्यांचे पती जॉन शॉ व हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचे संस्थापक व चेअरमन अतुल निशार यांचीही नावे आहेत.

3. तसेच अझीम प्रेमजी सुमारे 50 वर्षे विप्रोचे कार्यकारी संचालक होते. ते जुलैमध्ये निवृत्त झाले. नंतर त्यांनी आपण दानधर्म व समाजसेवा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी अझीम प्रेमजी फाऊडेशनला 760 कोटींचे समभाग देणगीपोटी दिले आहेत. ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करीत आहे. त्यांनी 21 अब्ज डॉलर्सची संपत्ती देणगीच्या स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे.

4. बायकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण मजुमदार शॉ व त्यांचे पती जॉन शॉ यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोला 53 कोटी 45 हजार लाखांची देणगी दिली. त्यांनी अन्य संस्थांना दिलेल्या देणग्यांची रक्कम ४0 कोटी रुपयांहून अधिक आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिल्याने आता त्यानुसार टप्प्याटप्प्याने महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अग्निशमन दलात आता 435 पदांची भरती केली जाणार आहे.

2. तर त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 250 पदे भरण्यात येणार असून त्यात महिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, सुमारे 81 महिलांचीही भरती केली जाणार आहे.

3. तसेच यासंदर्भातील जाहिरात येत्या 15 दिवसांच्या आत प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुढील सोपस्कारानंतर साधारणपणे चार महिन्यांच्या आत त्या अग्निशमन दलात सामील होणार आहेत.

4. अग्निशमन दलात महिलांना स्थान देणारी ठाणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. यंदा भारतीय उपखंडातील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात गेल्या सव्वाशे वर्षातील सर्वाधिक 12 चक्रीवादळे निर्माण होण्याचा प्रकार घडला.

2. तर त्यातील 7 चक्रीवादळे ही अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़. एकावेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रकार अरबी समुद्रात यंदा दोनदा झाले आहेत़.

3. तसेच सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात 7 चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़.

4. हवामान विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडीवारीनुसार 1891 पासून गेल्या 128 वर्षात प्रथमच अरबी समुद्रात इतकी चक्रीवादळे व कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाली आहेत़.

5. तर यापूर्वी 1998 मध्ये अरबी समुद्रात 6 चक्रीवादळे निर्माण झाली होती़. अरबी समुद्रात यंदा चक्रीवादळांची संख्या वाढली असतानाच बंगालच्याउपसागरातील चक्रीवादळाच्या संख्येत मात्र घट झाली आहे़.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. देशभरात वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय (एमबीबीएस/ बीडीएस) अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश (नीट) परीक्षा 3 मे रोजी घेण्यात येणार आहे.

2. तर या परीक्षेच्या आधारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण-संशोधन संस्थेसह (जेआयपीएमईआर) देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्व वैद्यकीय अभ्यासकम्रांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.

3. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे (एनटीए) महासंचालक विनित जोशी यांनी सांगितले की, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील विविध वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेचा ताण कमी होईल. शिवाय विद्यार्थी आणि पालकांना खर्चही कमी लागेल.

4. तसेच मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या जागी नॅशनल मेडीकल कमीशन स्थापन केले आहे.

5. आयुर्वेदिक, होमियोपॅथिक, अ‍ॅलोपॅथी, युनानी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकाच परीक्षेचे आयोजन केले जाईल. त्याच आधारे प्रवेश दिले जातील. लेखी परीक्षा व्हावी, ही मंत्रालयाची शिफारस एनटीएने मान्य केली आहे. राज्यांच्या मागणीची दखल घेऊन यावेळी लेखी परीक्षा घेतली जाईल.

6. तर इंग्रजी आणि अन्य दहा भाषेत परीक्षा घेण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. नौदलाने दीर्घकालीन योजनेत तीन विमानवाहू युद्धनौका ताफ्यात सामील करण्याचे ठरवले आहे, असे नौदल प्रमुख अडमिरल करमबीर सिंह यांनी सांगितले.

2. तर स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका 2022 पर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

3. वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यास नौदल सज्ज आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 2022 पर्यंत कार्यान्वित होईल तसेच त्यावर मिग 29-के विमाने तैनात करण्यात येतील.

4. तसेच नौदलासाठी वार्षिक अर्थसंकल्पातील तरतूद गेल्या पाच वर्षांत 18 टक्क्य़ांवरून 13 टक्के झाली आहे. नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तरतुदीतील ही कपात योग्य नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.


Top