MPSC chalu ghadamodi, current affairs

1. स्थलांतरित कामगार आणि रोजंदारी मजूर यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची 1 जून 2020 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.

2. तर या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे.

3. बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पासवान यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

4. तसेच या योजनेचा लाभ मुख्यत्वे स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर यांना होणार आहे, हा वर्ग रोजगारासाठी सातत्याने देशभरात फिरतीवर असतो.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सलग दोन जीएसटी विवरणपत्रे न भरणार्‍या व्यावसायिकांना आता ई-वे बिल तयार करता येणार नाही. यामुळे त्याला मालवाहतूकही करता येणार नाही.

2. तर जीएसटी चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबाजवणी 1 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

3. जीएसटीकडे नोंदणीकृत व्यावसायिकांना पन्नास हजारांपेक्षा अधिक किमतीच्या मालवाहतुकीसाठी संगणकीकृत बिल बनवावे लागते. त्याला ई-वे बिल म्हणतात. वाहतुकीदरम्यान तपासणी झाली तर ते दाखवणे सक्तीचे आहे. त्यामुळे बिलाशिवाय मालवाहतूक शक्य होत नाही.

4. एखाद्या व्यावसायिकाने सलग दोन मासिक किंवा सहामाही विवरणपत्रे भरली नसतील तर. त्याची नाकेबंदी केली जाणार आहे. पुरवठादार आणि खरेदीदाराचे ई-वे बिल फायलिंग पोर्टल ब्लॉक केले जाईल. त्यामुळे दोघांनाही ई-वे बिल बनवता येणार नाही. कुरिअर व्यावसायिक आणि ऑनलाईन व्यावसायिक कंपन्यांनाही हा नियम लागू
आहे.

5. तसेच आंतरराज्य अणि राज्यांतर्गत अशा दोन्ही वाहतुकीला हा नियम लागू असेल. अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या 28 टक्के करदाते विवरणपत्रे नियमित भरत नाहीत. तरीही ई-वे बिल तयार करून मालवाहतूक करतात. व्यवसाय करूनही त्याचा कर भरला जात नसल्याचा संशय आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. हवाई दलानंतर आता नौदलालादेखील देशातील पहिली महिला पायलट मिळणार आहे. बिहारची शिवांगी स्वरूप ही देशातील पहिली नौदल पायलट बनणार आहे. ती कोच्चीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

2. तिला ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॅच लावण्यात येणार आहे.
नौदल कोच्चीच्या ऑपरेशन ड्यूटीमध्ये शिवांगी सहभागी होईल. ती
फिक्स्ड विंग डोर्नियर सर्विलांस विमान उडवेल. हे विमान कमी अंतराच्या समुद्री मिशनसाठी पाठवले जाते. यामध्ये आधुनिक सर्विलांस, रडार, नेटवर्किंग आणि इलेक्ट्रॉनिक सेंसर आहेत.

3. शिवांगीला मागील वर्षी जूनमध्ये व्हाइस एडमिरल एके चावला यांनी औपचारिकरित्या नौदलात सहभागी केले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. व्होडाफोन, आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ने मंगळवार, 3 डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे 50 टक्क्यांपर्यंतवाढ करण्याचे जाहीर केले.

2. तर त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ‘रिलायन्स जियो’नेही 6 डिसेंबरपासून सुमारे 40 टक्के दरवाढीची घोषणा केल्याने मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

3. रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेने कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत.

4. तसेच मोबाइल जोडणी महिनाभर अतूट राहावी यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान 49 रुपयांचा ‘रिचार्ज’ करणे आवश्यक आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. खासगी क्षेत्रातील नोक-यांमध्ये भूमिपुत्रांसाठी 80 टक्के आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कायदा करेल, तसेच शेतक-यांना कर्जमुक्ती देऊन चिंतामुक्त करण्याची ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहातील अभिभाषणात दिली.

2. राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. महिलांना समान संधी आणि त्यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे.

3. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन व उच्च शिक्षण मोफत देण्याचा आटोकाट प्रयत्न राहील. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील 865 गावांतील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल.

4. तसेच नुकसानग्रस्त शेतक-यांना तत्काळ साहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, असेही राज्यपाल म्हणाले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. फास्टॅग प्रणालीची मुदत केंद्र सरकारने 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आली आहे.

2. 1 डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली होती. मात्र ही मुदत आता 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली होती.

3. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे.

3. तसेच यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर ‘फास्टॅग’ लावावं लागणार आहे. हा ‘फास्टॅग’ अधिकृत टॅग विक्रेते किंवा बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे. तर टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंड स्क्रिनवर ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर ‘फास्टॅग’ स्कॅन करतो. त्यानंतर ‘फास्टॅग’च्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.

4. ‘फास्टॅग’ अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्यासंबंधिचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. ‘फास्टॅग’ची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने ‘फास्टॅग’ खरेदी करावे लागणार आहे. कार, जीप,

5. व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत. तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. लष्कराने दीर्घ पल्ल्याच्या ‘स्पाइक’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची बुधवारी यशस्वीरीत्या चाचणी घेतली. महू येथे दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली.

2. लष्कर जवळपास तीन दशके दुसऱ्या पिढीची आणि आता कालबाह्य झालेली क्षेपणास्त्रे वापरत होते. ‘स्पाइक’मुळे आता आधुनिक क्षेपणास्त्राची उणीव भरून निघणार आहे. ‘स्पाइक’ हे चौथ्या पिढीतील क्षेपणास्त्र असून ते चार किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करते.

3. हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते मध्येच दुसऱ्या लक्ष्याला भेदण्यासाठी वळवता येते. या क्षेपणास्त्रांची निर्मिती इस्रायलच्या ‘राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टीम’ने केली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सन २०१३ ते २०१७ या कालावधीत देशभरात बालविवाहाची दीड हजारांहून अधिक प्रकरणे उघड झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

2. एका प्रश्नाच्या उत्तरात इराणी यांनी बालविवाहांबाबतची गेल्या पाच वर्षांतील माहिती सादर केली. बालविवाहाची सर्वाधिक प्रकरणे सन २०१७मध्ये (३९५) उघड झाली.

3. सन २०१६मध्ये हे प्रमाण ३२६, सन २०१५मध्ये २९३, २०१४मध्ये २८० आणि २०१३मध्ये २२२ इतके होते, असे इराणी यांनी ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो’च्या माहितीच्या आधारे सांगितले.सन २०१७मध्ये सर्वाधिक बालविवाह कर्नाटकात झाले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.

2. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

3. शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.

4. आमदार नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आठवे नेते ठरले आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1869 मध्ये झाला होता.

2. प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.

3. 29 नोव्हेंबर 1993 हा दिवस जे.आर.डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा स्मृतीदिन आहे. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.

4. सन 1996 या वर्षी नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका ‘मदर तेरेसा‘ यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर झाला होता.


Top