
740 26-Nov-2019, Tue
1. दीव आणि दमण व दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करून एकच केंद्रशासित बनविण्याचे विधेयक केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेमध्ये सादर केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी हे विधेयक मांडले.
2. जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी केल्यानंतर तीन महिन्यांनी केंद्राने दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्याचे प्रस्तावित केले आहे.
3. नव्या केंद्रशासित प्रदेशाचे नाव ‘दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव’ आणि प्रदेशाचे मुख्यालय दमण आणि दीव असण्याची शक्यता आहे. गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरील या दोन केंद्रशासित प्रदेशाचे एकत्रीकरण हे अधिक चांगल्या प्रशासनाकरिता होणार आहे.
4. सध्या दोन्ही प्रदेश एकमेकांपासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर असूनही दोन्ही प्रदेशांचा वेगळा अर्थसंकल्प आणि वेगळे सचिवालय आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीनंतर देशात सध्या नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत.