Sentenced to former South Korean President Lee Myung Baak

 1. दक्षिण कोरियाच्या सेऊलस्थित न्यायालयाने देशाचे माजी राष्ट्रध्यक्ष ली म्यूंग बाक यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
 2. ली म्यूंग बाक २००८ ते २०१३ दरम्यान दक्षिण कोरियाचे १०वे राष्ट्रध्यक्ष होते. तुरुंगवासाची शिक्षा झालेले ते दक्षिण कोरियाचे चौथे राष्ट्रध्यक्ष आहेत.
 3. त्यांची उत्तराधिकारी आणि दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला राष्ट्रध्यक्ष पार्क ग्युन-हे यांनासुद्धा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 4. पार्श्वभूमी:-
 5. ली म्यूंग बाक यांच्यावर सॅमसंग आणि इतर मोठ्या कंपन्यांकडून अवैधरित्या १० दशलक्ष डॉलर्स प्राप्त केल्याचा आरोप आहे.
 6.  याव्यतिरिक्त, ली म्यूंग बाक खाजगी वाहन निर्मात्या कंपनीकडून २१.७७ दशलक्ष डॉलर्सची लाच घेतल्याप्रकरणी दोषी आढळून आले आहेत.
 7. १५ वर्षे तुरुंगवासाव्यतिरिक्त त्यांना १३ अब्ज वोन (दक्षिण कोरियाचे चलन) इतका दंडही ठोठाविण्यात आला आहे.
 8. ली म्यूंग बाक:-
  1. दक्षिण कोरियाचे राजनेता ली म्यूंग बाक यांचा जन्म १९ डिसेंबर १९४१ रोजी झाला. २००८ ते २०१३ दरम्यान ते दक्षिण कोरियाचे १०वे राष्ट्राध्यक्ष होते.
  2. त्यापूर्वी ते ह्युंडाई अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. १ जुलै २००२ ते ३० जून २००६ दरम्यान ते सेऊलचे महापौर होते.
  3. डिसेंबर २००७मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांना ४८.७ टक्के मते मिळाली. २५ फेब्रुवारी २००८ त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदभार स्वीकारला.
  4. २२ मार्च २०१८ रोजी त्यांना भ्रष्टाचार, लाच, पदाचा दुरुपयोग आणि कर चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली.


Death: Nobel laureate Dr. Leon Lederman

 1. गॉड पार्टिकल म्हणजेच हिग्ज बोसॉनच्या संशोधनात महत्वपूर्ण कार्य करणारे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉ. लियोन लेडरमन यांचे ३ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले.
 2. हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. हा कण अस्तित्वात असावा असे भाकीत १९६४ मध्ये वर्तवण्यात आले होते.
 3. जगभरातील अनेक वैज्ञानिक यासाठी काम करीत होते. डॉ. लियोन लेडरमन हे त्यातील एक होते.
 4. डॉ. लियोन लेडरमन:-
  1. लियोन यांचा जन्म १५ जुलै १९२२ रोजी न्यूयॉर्क शहरात झाला. तेथेच शालेय शिक्षण घेतल्यानंतर रसायनशास्त्र विषय घेऊन ते पदवीधर झाले.
  2. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ३ वर्षे त्यांनी अमेरिकी सैन्यात काढली. या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास सुरू केला.
  3. नंतर सैन्यदलातील नोकरी सोडून त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेच त्यांनी संशोधन करून पीएचडी मिळविली.
  4. १९५८मध्ये ते याच विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक बनले. २ वर्षांनंतर त्यांनी आधी फोर्ड फाऊंडेशनचे फेलो म्हणून २ वर्षे काम केले.
  5. तेथून ते फर्मिलॅबचे संचालक बनले. विज्ञानविषयक चळवळीतही त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.
  6. १९९१मध्ये लियोन हे ‘अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’चे अध्यक्ष बनले.
  7. शालेय अभ्यासक्रमात इतर विषयांच्या तुलनेत भौतिकशास्त्राला प्राधान्य मिळावे यासाठी काही शास्त्रज्ञांनी ‘फिजिक्स फर्स्ट’ ही स्वतंत्र चळवळ अमेरिकेत सुरू केली. लियोन हे त्यातील एक प्रमुख होते.
  8. ‘द गॉड पार्टिकल’ हे त्यांचे पुस्तक तेव्हा जगभरात गाजले.
  9. १९८८मध्ये म्यूऑन न्यूट्रिनोच्या शोधाबद्दल त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारमिळाला होता. या शोधात मेल्विन श्वार्त्झ व जॅक स्टीनबर्गर हेही सहभागी असल्याने या तिघांनाही हा पुरस्कार विभागून देण्यात आला.
  10. याशिवाय त्यांना वूल्फ पारितोषिक, अर्नेस्ट ओ लॉरेन्स पदक असे अनेक प्रतिष्ठेचे मानसन्मान मिळाले.
  11. अखेरच्या काळात त्यांना असाध्य रोगाने ग्रासले. यावरील उपचार खूपच महागडे असल्याने शेवटी त्यांना हा खर्च भागवण्यासाठी नोबेल पारितोषिकाचे पदकही विकावे लागले.
 5. हिग्ज बोसॉन:-
  1. हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. त्याला देवकण (गॉड पार्टिकल) असेही म्हणतात.
  2. हिग्स बोसॉन हे नाव ब्रिटिश शास्त्रज्ञ पीटर हिग्स आणि भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोसयांच्यावरून ठेवण्यात आले आहे. कलकत्त्यातल्या बोस यांचे हे मूलकण शोधण्यात मूलभूत योगदान आहे.
  3. डॉ. पीटर हिग्ज आणि फ्रँकस एंग्लर्ट यांनी या हा कण अस्तित्वात असावा असे भाकित १९६४मध्ये केले गेले होते.
  4. ४ जुलै २०१२ रोजी जिनिव्हाजवळील लार्ज हॅड्रॉन कोलायडर ह्या प्रयोगशाळेत दोन वेगळ्या संघांनी अनेक प्रयोगाअंती हिग्ज बोसॉनचे अस्तित्व सिद्ध केले.
  5. या कणांचा शोध लावणारे ब्रिटनचे पीटर हिग्ज आणि बेल्जियमचे फ्रँकस एंग्लर्ट या शास्त्रज्ञांना २०१३चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.


Famous writer Kavita Mahajan dies in Pune

 1. ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. 
 2. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या.
 3. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना गेल्या महिन्याभरापासून फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता. 
 4. कविता महाजन या महिनाभरापूर्वीच पुण्याला मुलीकडे गेल्या होत्या. मुलीला ताप येत असल्याने त्यांनी तिला चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
 5. मात्र, त्यांनाही ताप आणि फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागल्याने बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
 6. कविता महाजन यांचा जन्म नांदेडमध्ये झाला होता. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या मुली होत.
 7. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयामध्ये एम.ए. ही पदवी मिळविली होती.
 8. त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (२००८) मध्ये मिळाला होता.
 9. याचबरोबर कवयित्री बहिणाबाई पुरस्कार (२००८), साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला, २०११), मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
 10. कविता महाजन यांचा कुहू हा लेखसंग्रह लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता.
 11. तसेच म्रृगजळीचा  हा काव्यसंग्रह, ब्र आणि भिन्न या कादंबऱ्याही गाजल्या होत्या. उर्दू भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते.


Prabhakar Karandikar, a veteran artist in the theater stage

 1. मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचे  निधन झाले.  
 2. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन विवाहित मुली आहेत. त्यांच्या पत्नी सुधा यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दहा वाजता वैकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 3. अगदी लहानपणापासून संगीत शिक्षण घेतलेल्या करंदीकरांनी शास्त्रीय संगीताची तालीम यशवंतबुवा मराठे व नंतर छोटा गंधर्व यांच्याकडे घेतली होती.
 4. त्यानंतर भरत नाट्य मंदिर, सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमी, मराठी रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी संगीत रंगभूमीवर सुमारे पाचशेहून अधिक प्रयोग सादर केले होते.
 5.  संगीत सौभद्र, संगीत मंदार माला, संगीत स्वयंवर, संगीत संशयकल्लोळ, संगीत वैरीण झाली सखी, शाहीर प्रभाकर, संगीत अभोगी या नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या.
 6. राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे सुवर्ण पदक मिळविण्याचा बहुमानही त्यांनी मिळविला होता.
 7. पुणे महानगरपालिकेने मानाचा बालगंधर्व पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते.
 8. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नरूभाऊ लिमये यांच्या नंतर भरत नाट्य संशोधन, मंदिराच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली.
 9. त्यापूर्वी ही त्यांनी त्या संस्थेमध्ये अनेक पदे भूषविली. गेले काही महिने त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यातच पत्नीच्या निधनाचा धक्का ते सहन करू शकले नाहीत.


Vishnu Khare, the Vice-President of Hindi Sahitya Akademi, passed away

 1. हिंदीचे प्रतिष्ठित लेखक, कवी आणि निवेदक यांचे बुधवारी दीर्घकालिन आजाराने निधन झाले.
 2. दिल्लीतील जी.बी. पंत हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 3. ते ६८ वर्षांचे होते.  ब्रेन हॅमरेजचा त्रास असल्याने त्यांना मागील काही दिवसांपासून दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 4. हिंदी अकादमीचे उपाध्यक्षपद त्यांच्याकडे होते. मागील आठवड्यात ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांचा डावा भाग पॅरालाईज झाला होता.
 5. ते आपल्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये राहत होते.
 6. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची मुलगी प्रीती खरे बॉलीवूड कलाकार असून देवदासमध्ये तिने शाहरुख खानच्या वहीनीची भूमिका केली आहे.
 7. खरे यांचा जन्म ९ फेब्रुवारी रोजी झाली. हिंदीचे शिक्षण घेतलेल्या खरे यांनी याच भाषेत करीयर करायचे ठरवले.
 8. त्यासाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. तसेच समीक्षक, कवी आणि निवेदक म्हणूनही त्यांनी अतिशय कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली.
 9. त्यांनी लिहीलेला ‘आलोचना की पहली किताब’ या ग्रंथावर बरीच चर्चा झाली.
 10. त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे त्यांना साहित्यिक योगदान पुरस्कार, रघुवीर सहाय्य स्मृती पुरस्कार, भवानी प्रसाद मिश्र स्मृती पुरस्कार आणि मध्य प्रदेश शिखर सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


senior philosopher fakruddin bennur passed away

 1. ज्येष्ठ विचारवंत, चिंतनशील लेखक प्रा. फकरूद्दिन तथा एफ.एच. बेन्नूर (वय 80 वर्षे) यांचे 17 ऑगस्ट रोजी निधनझाले.
 2. प्रा. बेन्नूर यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1938 रोजी सातारा येथे झाला. 1966 ते 1998 पर्यंत त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले.
 3. कर्नाटक विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी हिंदू-मुस्लीम प्रश्न, मुस्लीम राजकारण, सामाजिक सौहार्द, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयांवर 150 हून अधिक शोधनिबंध सादर केले होते.
 4.  डॉ. आंबेडकर अकादमीची स्थापना केली होती.
 5. सन 2014 मध्ये त्यांनी इतिहास पुनर्लेखन समितीची स्थापना केली.
 6. गाजीउद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी प्रा. बेन्नूर यांचा मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात येणार होता. यावेळी त्यांच्या ‘मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद‘, ‘भारतीय मुस्लीम विचारक‘ यासह तीन पुस्तकांच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन होणार होते; आता हा सोहळा होणार नसल्याने दुख: व्यक्त होत आहे.


atal bihari vajpayi passed away on 16 august 2018

 1. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कवी, लेखक, पत्रकार, राजकीय नेते असं वाजपेयींचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. एक छोटा राजकीय कार्यकर्ता ते पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता.
 2. वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. ते आयुष्यभर अविवाहित राहिले.
 3. जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५ ते १९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७ ते १९८०), भाजपचे अध्यक्ष (१९८० ते १९८६) आणि भाजप संसदीय पक्षाचे नेते (१९८० ते १९८४, १९८६, १९९३ ते १९९६), ११व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते.
 4. तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री ही पदे त्यांनी भूषविली.


'भारत छोडो' चळवळीत सहभाग
१९४२मध्ये 'भारत छोडो' चळवळीत वाजपेयींनी उडी घेतली. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघाच्या संपर्कात आले. पुढे भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली. १९५७ मध्ये वाजपेयी बलरामपूर मतदारसंघातून संसदेवर सर्वप्रथम निवडून आले. तरुणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही आपली छाप सोडली. खुद्द जवाहरलाल नेहरूंनीही वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होतील, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता.

मोरारजी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री
१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघाने आणीबाणी विरोधात रान उठवले. याच दरम्यान वाजपेयींना तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीआधी भारतीय जनसंघाने अनेक प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची स्थापना केली. जनता पार्टीला निवडणुकीत बहुमत मिळाले आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. वाजपेयी हे दिल्लीतून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत वाजपेयी १९७९ मध्ये चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. वाजपेयी यांनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. पुढे १९७९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील कारवाईमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

भाजपचे पहिले अध्यक्ष
१९७७ मध्ये विराजमान झालेले जनता पक्षाचे सरकार फार काळ टिकले नाही. अवघ्या दोनच वर्षांत १९७९ मध्ये मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. नंतर अंतर्गत कलहामुळे जनता पक्षही विस्कटला. पुढे वाजपेयींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघातील मित्र खासकरून लालकृष्ण आडवाणी आणि भैरोसिंह शेखावत यांच्यासोबत मिळून १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष बनले.

पंतप्रधानपदाचे उमेदवार
ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपचा पाठिंबा होता, मात्र इंदिरा गांधी यांची अंगरक्षकाकडून हत्या झाल्यानंतर दिल्लीमध्ये ज्या शीख विरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. भाजपवरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता. त्यातूनच विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला भाजपने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा अग्रभागी होता. पुढे ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला. तरीही देशाच्या राजकारणातला भाजपचा प्रभाव कायम राहिला. १९९५च्या मार्चमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला चांगले यश मिळाले. त्याचवेळी भाजपच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात आडवाणी यांनी वाजपेयी यांचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.

...
अन् वाजपेयींनी दिला राजीनामा
१९९६च्या लोकसभा निवडणुकीत भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षांच्या यशामुळे १९९६ची लोकसभा त्रिशंकू राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही. त्यामुळेचबहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे न जाताच वाजपेयींनी तेराव्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तो दिवस होता १ जून १९९६. त्यानंतर १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयींनी यशस्वीपणे आघाडीचं सरकार चालवलं. इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ते सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले बिगर काँग्रेसी नेते ठरले.

एका मताने कोसळले सरकार
१९९६ ते ९८ दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. दैवेगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे अल्पकाळ राहिली. १९९८च्या निवडणुकांत भाजपने पुन्हा चांगले यश मिळवले. भाजपने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली आणि वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार विराजमान झालं. १९९८च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी एनडीएचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासदर्शक ठरावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. त्यावेळी विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही आणि अखेर देश पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले.

लाहोर भेट
१९९८च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तानसोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर स्वागत झाले. वाजपेयींसोबत पाकिस्तानला केवळ राजकारणी आणि मुत्सद्दीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. देव आनंद यांचाही त्यात समावेश होता. कारगील युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी 'खेल भी जीतो और दिल भी' हा संदेश दिला होता.

विमान अपहरण, संसदेवरील हल्ल्याचा आघात

१९९९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एनडीएला पुन्हा घवघवीत यश मिळाले आणि वाजपेयींनी सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हा कार्यकाळ संमिश्र ठरला. सरकार सत्तेत आले त्याचवर्षी तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण केले. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीला निघाले होते. दहशतवाद्यांनी हे विमान कंदहारला नेते. वाजपेयी सरकारवर त्यावेळी विमानाच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडण्याची नामुश्की झेलावी लागली. २००१ मध्ये दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले. वाजपेयी सरकारसाठी हे दोन मोठे आघात ठरले.

अटल बिहारी वाजपेयींना जडलेला डिमेन्शिया नेमका काय?

 • भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते.
 • किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
 • त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
 • अखेर 16 August 2018 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


indian former captain ajit vadekar passed away

 1. भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे 15 August बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
 2. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही काळापासून अजित वाडेकर आजारी होते. त्यांच्याच कर्णधारपदाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
 3. १९५८ साली मुंबईच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले.
 4. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारे वाडेकर एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. स्लीपमधील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्यांची ओळख होती.
 5. अजित वाडेकर यांच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९६७ साली अर्जून आणि १९७२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
 6. १ एप्रिल १९४१ रोजी मुंबईत वाडेकर यांचा जन्म झाला. त्यांनी शिकून इंजिनिअर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण वाडेकर क्रिकेटपटू झाले.
 7. १९५८-५९ च्या सुमारास त्यांनी मुंबईकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १३ डिसेंबर १९६६ मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
 8. भारताकडून ३७ कसोटी सामने खेळताना त्यांनी ३१.०७ च्या सरासरीने २,११३ धावा केल्या. यात एक शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश होता.
 9. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी २३७ सामन्यात १५ हजार ३८० धावा केल्या. यात ३६ शतके आणि ८४ अर्धशतकांचा समावेश होता. अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिल्यांदा १९७१ साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. ते भारताचे पहिले वनडे कर्णधार होते.
 10. अजित वाडेकर यांची मुंबईच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर लगेचच १९७१ साली त्यांची भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.
 11. सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वानाथ, फारुख इंजिनिअर, बिशनसिंग बेदी, प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन असे एकाहून एक सरस खेळाडूंनी भरलेल्या संघाचे त्यांनी नेतृत्व केले.
 12. १९७१ साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी विजयाची चव चाखली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या बलाढय संघांना त्यांच्या भूमीत पराभूत करण्याची किमया साधली.
 13. १९७० च्या दशकात भारताने वेस्ट इंडिजमध्ये पाच कसोटी सामने जिंकले. १९७२-७३ साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडवर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला.
 14. एकदिवसीय क्रिकेटमधील अजित वाडेकर भारताचे पहिले कर्णधार होते. पहिल्या वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी ६७ धावा केल्या. ते अवघे दोन वनडे खेळले. त्यात ८१.११ च्या स्ट्राईक रेटने त्यांनी ७३ धावा केल्या. १९७४ साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलेला त्यावेळी वाडेकर कर्णधार होते.
 15. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही वाडेकरांनी भारतीय क्रिकेटला आपले योगदान दिले. १९९० च्या दशकात मोहम्मद अझरुद्दीन कर्णधार असताना ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा वेगवेगळया भूमिका बजावणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये त्यांचा समावेश होतो.
 16. वाडेकर यांच्या आधी लाला अमरनाथ आणि चंदू बोर्ड या दोन खेळाडूंनीच इतक्या वेगवेगळया जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत.


chattisgarh governor balramaji das tondon passed away

 1. छत्तीसगडचे राज्यपाल आणि सहा वेळा आमदारकी जिंकलेले बलरामजी दास टंडन यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
 2. रायपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते.
 3. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास बलरामजी दास टंडन यांना ह्रदयविकाराचा त्रास सुरू झाला. यानंतर राजभवनातील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रायपूरच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले परंतु उपरांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचे निधन झाले.
 4. बलरामजी दास टंडन यांनी 18 जुलै, 2014 ला छत्तीसकडच्या राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांना जन्म 1 नोव्हेंबर 1927 ला पंजाबच्या अमृतसर येथे झाला होता.
 5. सामाजिक कार्य, समाजसेवा आणि जनकल्याण कार्यात वाहून घेतलेल्या बलरामजी यांच्यावर पंजाबच्या जनतेचा विशेष जीव होता.
 6. बलरामजी यांनी 1957, 1962, 1967, 1969 आणि 1977 अशा पाचवेळा आमदारकी जिंकली होती. तसेच आणीबाणी काळात 1975 ते 1977 अशी दोन वर्ष त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. 
 7. 1991 मध्ये त्यांनी अमृतसरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्यावर अनेकदा हल्ला झाला, परंतु ते थोडक्यात वाचले होते.
 8. बलरामजी यांचा मुलगा संजय टंडन यांनी त्यांच्या आयुष्यावर ‘एक प्रेरक चरित्र‘ हे पुस्तकही लिहिले आहे.
 9. बलरामजी यांना खेळाप्रती आत्मियता होती. कुस्ती, व्हॉलिबॉल, स्विमींग आणि कबड्डी अशा खेळात त्यांना विशेष रस होता.


vidyadhar surajprasad naypaul

 1. भारतीय वंशाचे व लंडनमध्ये स्थायीक झालेले नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे ८५ वर्षी निधन झाले.
 2.  १९७१ मध्ये बुकर पुरस्कार तर २००१ मध्ये साहित्याच्या नोबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
 3.  नायपॉल यांचा जन्म १९३२ त्रिनिदादमध्ये झाला होता. "ए बेंड इन द रिवर" आणि "ए हाऊस फॉर मिस्टर बिस्वास" ही त्यांची पुस्तके मोठ्या प्रमाणात चर्चेत आली.
 4.  १९५१ मध्ये नायपॉल यांचे "द मिस्टिक ऑफ मैसर" हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले होते. 
 5.  १९९० मध्ये इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांना सर ही पदवी बहाल केली होती.
 6.  जागतिक पातळीवरील ज्या ५० लेखकांची यादी बनवण्यात आली होती त्यामध्ये व्ही. एस. नायपॉल हे सातव्या क्रमाकांचे लेखक होते.
 7.  इतर गाजलेली पुस्तके... इन ए फ्री स्टेट (१९७१), ए वे इन द वर्ल्ड (१९९४), हाफ ए लाईफ (२००१) आणि मॅजिक सीड्स (२००४) ई.


Top

Whoops, looks like something went wrong.