M KARUNANIDHI PASSED AWAY

 1. द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे 7 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते.
 2. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार सुरु होते.
 3. रक्तदाब जाणवू लागल्याने त्यांना 28 जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. 
 4. करुणानिधी यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.
 5. तसेच तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. करूणानिधी यांच्यावर चेन्नईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
 6. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत अनेक राजकीय नेते अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत.
 7. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे.
 8. केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि देशातील सर्व राज्यातील राजधानीतील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाणार आहे.
 9. चेन्नईमध्ये राजकीय सन्मानासह करूणानिधींवर 8 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. 
 10. तामिळनाडूसह संपूर्ण देशभरात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.


indian former navy chief jayant nadkarni passaway

 1. भारताचे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे 2 जुलै रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
 2. जयंत नाडकर्णी भारताचे 14वे नौदल प्रमुख होते.
 3. डिसेंबर 1987 ते नोव्हेंबर 1990 पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून धुरा संभाळली. कुलाब्यातील नौदलाच्या आयएनएचएस अश्वनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 4. जयंत नाडकर्णी यांना दोन मुले असून त्यांचा एक मुलगा भारतीय नौदलात रियर अॅडमिरल पदावर कार्यरत आहे.
 5. नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे 2016 मध्ये निधन झाले.


 Vikramviar astronaut Peggy Whitson retired from NASA

 1. अवकशात सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या अमेरिकेतील महिला अवकाशयात्री पेगी व्हिटसन नासा या अवकाश संशोधन संस्थेतून निवृत्त झाल्या.
 2. पेगी यांनी अवकाशात ६६५ दिवस २२ तास २२ मिनिटे वास्तव्य करण्याचा विक्रम केलेला आहे.
 3. महिलांमध्ये सर्वाधिक स्पेस वॉक त्यांनी केले आहेत. १० स्पेसवॉकमध्ये त्यांनी ६० तास २१ मिनिटे एवढा मोठा काळ व्यतीत केला.
 4. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात त्यांनी तीन मोहिमा पूर्ण केल्या. २००२मध्ये त्यांचा पहिला अवकाश स्थानक प्रवास घडला.
 5. अवकाशस्थानकात नेमण्यात आलेल्या त्या पहिल्या वैज्ञानिक अधिकारी ठरल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान त्या अवकाश स्थानकाचे सारथ्य करणाऱ्या पहिल्या महिला होत्या.
 6. त्या १९८६मध्ये नासात आल्या, तेथे अनेक भूमिका पार पाडत असताना त्या मीर अवकाश स्थानकातही प्रकल्प वैज्ञानिक बनल्या.
 7. व्हिटसन यांचा जन्म आयोवात झाला. आयोवा वेसलन कॉलेजमधून त्या विज्ञानाच्या पदवीधर बनल्या.
 8. राइस विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात डॉक्टरेट केल्यानंतर जॉन्सन स्पेस सेंटर येथे त्यांनी संशोधनाचे काम सुरू केले.
 9. त्यानंतर कृग इंटरनॅशनल संशोधन गटात त्या काम करीत होत्या. १९९६मध्ये त्यांची जॉन्सन स्पेस सेंटर येथे अवकाशप्रवासासाठी उमेदवार म्हणून निवड झाली.
 10. त्याआधी त्यांनी नासामध्ये जैवरसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले होते. अमेरिका-रशिया वैज्ञानिक कार्यकारी गटाच्या त्या सहअध्यक्षही होत्या.
 11. त्यांच्या सोळाव्या मोहिमेत त्यांनी सुनीता विल्यम्सचा स्पेसवॉकचा विक्रम मोडला. टाइम नियतकालिकाने अलीकडेच त्यांचा गौरव केला.


 Berkshire Hathaway, Amazon and J.P. Morgan's healthcare firm, Atul Gavande, has the ax

 1. बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन.कॉम आणि जे.पी. मॉर्गन चेस या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अतुल गावंडे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे.
 2. अमेरिकेतील बोस्टनमध्ये कंपनीचे मुख्यालय असेल. येत्या ९ जुलैपासून गवांदे कंपनीच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतील.
 3. या तिन्ही कंपनीच्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, हा नव्या कंपनीच्या स्थापनेमागे उद्देश आहे.
 4. औषधोपचाराच्या किमतीवर नियंत्रण आणण्याचा या कंपनीचा प्रामुख्याने भर असेल. 
 5. बर्कशायर हॅथवेचे संस्थापक व प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे, अॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि जेपी मॉर्गनचे जामी डायमॉन यांनी जानेवारी महिन्यात या नव्या कंपनीची घोषणा केली होती.
 6. या तिन्ही कंपन्यांच्या ना नफा तत्त्वावर सुरु केलेल्या या कंपनीमुळे १० लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
 7.  अतुल गावंडे:-
 8. अतुल गावंडे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापक असून ते एंडोक्राइन सर्जन आहेत. आरोग्य क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी नेहमीच टीका केली आहे.
 9. डॉ. गावंडे यांचे आई-वडील अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. अतुल यांचा जन्मही अमेरिकेतीलच आहे. त्यामुळे त्यांना भारतीय वंशाचे अमेरिकन म्हणता येईल.
 10. ब्रिगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये ते नोकरी करतात. ते हार्वर्ड टीएन चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये आरोग्य धोरण व व्यवस्थापन विभागात प्राध्यापक असून, हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरीचे प्राध्यापक आहेत.
 11. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे उत्तम लेखकही आहेत.
 12. ‘बिंग मॉर्टल : मेडिसीन अँड व्हॉट मॅटर्स इन द एन्ड हे २०१४’ मध्ये त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. या पुस्तकातून त्यांनी वृद्धांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला होता.
 13. तसेच आरोग्यविषयक वृत्तपत्र लिखाण व अन्य संशोधन यामुळे त्यांच्या क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आहेत.
 14. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. अमेरिकेत राबविण्यात आलेल्या ओबामा केअर या आरोग्य योजनेमध्ये डॉ. गावंडे यांचा मोठा वाटा होता.


Famous Urdu comedian Mushtaq Ahmed Yusufi passes away

 1. प्रसिध्द उर्दू व्यंग्यकार आणि विनोदी लेखक मुश्ताक अहमद युसूफी कराची येथे वयाच्या ९७व्या वर्षी निधन झाले.
 2. पाकिस्तानच नव्हे तर भारतातील उर्दू साहित्यवर्गातील ते सर्वाधिक वाचले गेलेले व लोकप्रिय विनोदी लेखक गणले जातात. त्यांचीतुलना उर्दूतील इब्ने इन्शा या नामवंत साहित्यिकाशी केली जाते.
 3. मुश्ताक अहमद युसूफी यांचा जन्म ४ सप्टेंबर १९२१ रोजी टोंक (राजस्थान) येथे झाला. फाळणीनंतर ते कराचीला गेले.
 4. त्यांनी आग्रा विद्यापीठातून तत्त्वज्ञानात एमए पदवी घेतली. नंतर अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. पुढे त्यांच्या उर्दू साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना डीलिट ही पदवीही प्रदान करण्यात आली.
 5. व्यवसायाने बँकर असलेल्या युसूफी यांनी पाकिस्तानातील अलाइड बँक, युनायटेड बँक व पाकिस्तान बँकिंग काउन्सिलची सर्वोच्च पदे त्यांनी भूषविली.
 6. अर्थजगतामध्ये वावरत असताना दुसरीकडे त्यांचे विनोदी लेखनही सुरू होते. त्यांचे लिखाण बहुप्रसव झाले नसले तरी ते अत्यंत वाचकप्रिय होते.
 7. चिराग तले, खाकम बदहन, जरगुजिश्त, आबे गुम आणि शामे शहरे यारां हे त्यांचे पाच विनोदी लेखसंग्रह उर्दू साहित्य जगतात अफाट लोकप्रिय आहेत.
 8. ते समाजातील सांस्कृतिक, नैतिक धारणा, मानवी स्वभावाचे वैविध्य, राजकीय व्यक्तिमत्त्वांची अनाकलनीय वृत्ती यावर अत्यंत मिश्कीलपणे व्यंगात्मक भाष्य करीत.
 9. मात्र त्यांच्या विनोदातील व्यंग अथवा उपरोध बोचरा नव्हता, किंबहुना विचार करण्यास प्रवृत्त करणाराच होता.
 10. समाजातील त्याज्य रूढी, परंपरांना विनोदाची टाचणी लावताना ते घाबरले नाहीत. धर्माध वर्ग त्यांच्या लिखाणामुळे कधी दुखावला गेला असेही घडले नाही.
 11. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना आदमजी पुरस्कार, सितारा ए इम्तियाज, हिलाल ए इम्तियाज, पाकिस्तान अकादमी ऑफ लेटर्स, कायदे आजम मेमोरियल मेडल आदी अनेक पुरस्कार मिळाले.
 12. हिलाल ए इम्तियाज हा पाकिस्तानात साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. 


Rebel poet and Shantanu Kamble passed away

 1. विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू नाथा कांबळे यांचे नाशिक येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते.
 2. ते गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
 3. नव्या शाहीरांसाठी प्रेरणादायी असलेले शंतनू हे मुळचे सांगलीतील तासगावचे होते. मुंबईतल्या वडाळा येथे ते राहत होते. आजारपणानंतर मात्र ते नाशिकला स्थायिक झाले होते. 
 4. शाहीर अण्णा भाऊ साठे, लोकशाहीर वामनदादा कर्डक, शाहीर बोबडे यांच्या प्रभावातून कांबळे यांनी शाहिराच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची चळवळ पुढे चालविली.
 5. सामाजिक विषमता, अंधश्रद्धा याविरोधात त्यांनी गावोगावी जाऊन जनप्रबोधन केले. लोकशाहीचा प्रचार-प्रसार केला.
 6. अनेक वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि जातीअंताच्या लढाईत ते अग्रेसरहोते.
 7. गाणी आणि कवितातून ते जातीय अत्याचार, शोषण, आर्थिक-सामाजिक विषमता आणि मानवतावादावर भाष्य करत असायचे.
 8. २००५मध्ये त्यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे १०० दिवस ते पोलीस कोठडीत होते. मात्र, नंतर त्यांची त्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
 9. कांबळे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘कोर्ट’ हा चित्रपटही गाजलेला आहे. विद्रोही मासिकाच्या संपादक मंडळावरही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली, तसेच लिखाणही केले.
 10. त्यांच्या निधनामुळे विद्रोही चळवळीतील एक शिलेदार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


Adv. Shantaram Datar passed away

 1. मराठी भाषा मंचचे संस्थापक आणि न्यायालयीन कामकाज मराठीतून होण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा उभारणारे अॅड. शांताराम दातार यांचे निधन झाले.
 2. उच्च न्यायालयात मराठी भाषेतून न्यायदान केले जावे यासाठी त्यांनी आग्रह धरला. कनिष्ठ न्यायालयांतील कामकाज मराठीत सुरू होण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
 3. महाराष्ट्रात मराठीची होत असलेली गळचेपी आणि शासनाचे मराठीविरोधी धोरण या सर्व गोष्टींविरूद्ध आवाज उठवण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे दातार संस्थापक होते.
 4. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा आंदोलने केली. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासनाला अधिसूचना काढावी लागली.
 5. दातार यांचा जन्म ९ जून १९४२ला मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
 6. निरनिराळ्या ठिकाणी नोकऱ्या करून त्यांनी एलएलबीपर्यंतचे शिक्षण इंदूरमध्ये घेतले. वकिली व्यवसाय करण्यासाठी ते १९६८साली कल्याणमध्ये आले.
 7. दातार यांचे संपूर्ण शिक्षण हिंदी माध्यमातून झाले असले, तरी त्यांनी मराठी भाषेसाठी कायम लढा दिला.
 8. दातार हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. तेव्हापासून त्यांना समाजसेवेची आवड होती.
 9. कल्याण येथे वकिली व्यवसायास सुरूवात केल्यानंतर त्यांनी १९७२मध्ये भारतीय मजदूर संघाच्या व १९७२पासून जनसंघाच्या कामास सुरूवात केली.
 10. जून १९७५मध्ये देशात आणीबाणी घोषित झाली. तेव्हा ते आणीबाणीविरूध्दच्या लढ्यात सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला होता. 
 11. ते भाषा सल्लागार समितीचे निमंत्रित सदस्य आणि महाराष्ट्र राज्याच्या विधी सल्लागार परिभाषा समितीचेही सदस्य होते. ते अनेक बँकांचे व संस्थांचे कायदेशीर सल्लागारम्हणूनही काम पाहत होते. 
 12. मराठी राजभाषा नियम १९६६मध्ये दुरूस्ती करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समितीचे ते सदस्य होते.
 13. महाराष्ट्र शासनाने दोन महिन्यापूर्वी मराठीच्या न्यायव्यवहारासाठी उपाययोजना करता यावी, यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीत दातार होते.
 14. ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा या पुस्तकाच्या निमिर्तीमध्ये त्यांचा सहभाग होता.


 Sujeet Bukhari, editor of Raising Kashmir Kashmir, murdered

 1. ज्येष्ठ पत्र कार आणि जम्मू काश्मीरमधील रायझिंग काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक सुजात बुखारीयांची श्रीनगर येथे  दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
 2. श्रीनगरमधील प्रेस कॉलनीतील आपल्या कार्यालयातून बाहेर पडताना बुखारी व त्यांच्या सुरक्षारक्षकावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात बुखारी हे ठार झाले, तर सुरक्षा रक्षकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
 3. यापूर्वी बुखारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हापासून त्यांना सुरक्षारक्षक पुरवण्यात आला होता.
 4. जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेली शस्त्रसंधी अंतिम टप्प्यात असताना बुखारी यांची हत्या झाली आहे. ते ५० वर्षांचे होते.
 5. हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बुखारी यांच्यावरील हल्ल्याचे कारणही समजू शकलेले नाही.
 6. जम्मू-काश्मीरमध्ये १५ वर्षांनी दहशतवाद्यांनी पत्रकाराची हत्या केल्याची घटना घडली आहे.
 7.  सुजात बुखारी:- 
  1. सुजात बुखारी हे जम्मू काश्मीरमधून प्रकाशित होणाऱ्या ‘रायझिंग काश्मीर’ दैनिकाचे संपादक होते. त्यांनी मनिलातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
  2. त्यापूर्वी ते ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राचे श्रीनगरमधील ब्यूरो चिफ होते. बुखारी यांचीधाडसी पत्रकार म्हणून ओळख होती. 
  3. ते काश्मीरच्या शांतता प्रक्रियेसाठी नेहमीच आग्रही असायचे. काश्मीरचा प्रश्न शांततेने सुटेल, अशी त्यांची भूमिका होती.
  4. काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे होणारे उल्लंघनाबाबतही त्यांनी आवाज उठवला होता. काश्मीरमध्ये त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळही सुरु केली होती.
  5. सुजात बुखारी यांचे बंधू सय्यद बशरत बुखारी हे मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये कायदा मंत्री आहेत.
  6. बुखारी यांना वर्ल्ड प्रेस इन्स्टिट्यूट फेलोशिप, अमेरिका आणि एशियन सेंटर फॉर जर्नालिझम, सिंगापूरची फेलोशिप मिळाली होती.


 Professor Mohammad Omar Memon passed away

 1. अरबी आणि उर्दू भाषांचे जाणकार आणि इस्लामी धर्मसाहित्याचे आणि त्यासोबत सूफी संतविचारांचे अभ्यासक प्राध्यापक मोहम्मद उमर मेमन यांचे वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले.
 2. भारतीय उपखंडातील एका भाषेवर निस्सीम प्रेम करणारे एक अमेरिकी प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती.
 3. दिवंगत प्राध्यापक मोहम्मद उमर मेमन हे भारतीय म्हणून जन्मले. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील इस्लामी धर्मसाहित्याचे जाणकार प्राध्यापक अब्दुल अजीज मेमन हे त्यांचे वडील.
 4. १९५४साली हे कुटुंब अलिगढहून कराचीस गेले. त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण कराचीतच झाले. अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळाल्याने हार्वर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात इस्लामी धर्मसाहित्याचा अभ्यास केला.
 5. ते विविध विद्यापीठांत अभ्यागत म्हणून शिकवू लागले. मॅडिसन शहरातील विस्कॉन्सिन विद्यापीठात १९८०पासून त्यांना प्राध्यापकपद मिळाले.
 6. फाळणीच्या व्यथा सांगणारा ‘अ‍ॅन एपिक अन-रिटन’ हा कथासंग्रह तसेच १९४७ नंतरच्या कथांचा ‘द कलर ऑफ नथिंगनेस’ हा संग्रह यांचे ते संपादक व अनुवादक होते.
 7. ‘डोमेन्स ऑफ फीअर अ‍ॅण्ड डिझायर’ तसेच ‘द ग्रेटेस्ट उर्दू शॉर्ट स्टोरीज एव्हर टोल्ड’ यांचे अनुवाद-संपादनही त्यांनीच केले.
 8. वयाच्या पन्नाशीपर्यंत ते स्वत:देखील कथा लिहीत होते. त्या कथांचा ‘तारीक गली’ हा संग्रह प्रसिद्ध आहे.
 9. उर्दूच्या विद्यापीठीय अभ्यासाला वाहिलेली एकमेव इंग्रजी संशोधनपत्रिका त्यांनी सुरू केली.
 10. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या संस्थेसाठी पाकिस्तानी कथासाहित्याचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले होते.


World famous celebrity chef Anthony Bourdain died

 1. जगप्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी शेफ अँथनी बॉर्डेन यांचे वयाच्या ६१व्या वर्षी निधन झाले आहे. फ्रान्समध्ये सध्या ते एका शोसाठी चित्रिकरण करत होते.
 2. हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह ८ जून रोजी फ्रेंच शेफ इरिक रिपर्ट यांना आढळला. अँथनी यांनी आत्महत्या केल्याचा दाट संशय सीएनएनने व्यक्त केला आहे.
 3. अनेक फूड शोद्वारे अँथनी यांनी आपली ओळख निर्माण केली. कथाकथनांचे उत्तम कौशल्य त्यांच्याजवळ होते.
 4. प्रत्येक फूड शो होस्ट करताना त्यांच्या या शैलीमुळे ते प्रेक्षकांचे खूप आवडते शेफ बनले होते. जगभरातील अनेक देशांत त्यांनी भ्रमंती केली.
 5. ते उत्तम खव्वय्ये तर होतेच पण चांगले निवेदकही होते. खाद्यसंस्कृती, भ्रमंती या विषयावरच त्यांनी लेखनही केले होते.
 6. फ्रान्समध्ये ते ‘पार्ट अननोन’ या ट्रव्हल अँड फूड शोसाठी एपिसोड चित्रीत करत होते.
 7. हा शो गेल्या ५ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या कार्यक्रमाने ५ प्रतिष्ठीत अॅमी अवॉर्डही जिंकले आहेत.


Top

Whoops, looks like something went wrong.