ICC will provide T20 International status to all its members

 1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) याने आपल्या वर्तमान सर्व 104 सदस्यांना टी-20 आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. सध्या टी-20 दर्जा प्राप्त देशांची संख्या 18 आहे, ज्यामध्ये 12 पूर्ण सदस्यांच्या व्यतिरिक्त स्कॉटलंड, नेदरलँड्स, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिरात (UAE), ओमान आणि नेपाळ यांचा समावेश आहे.
 3. सर्व सदस्य महिला संघांना देखील 1 जुलै 2018 पासून टी-20 आंतरराष्ट्रीयचा दर्जा दिला जाणार आहे.
 4. जेव्हा की पुरुष संघांना 1 जानेवारी 2019 पासून हा दर्जा मिळणार आहे.
 5. महिला आणि पुरूष संघांची क्रमवारीता ऑक्टोबर 2018 आणि मे 2019 मध्ये लागू केली जाणार आहे.


Senior Journalist S. Nihal Singh passed away

 1. प्रसिध्द जेष्ठ पत्रकार एस. निहाल सिंग यांचे वयाच्या ८९व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
 2. १९२९मध्ये रावळपिंडीत जन्मलेल्या निहाल सिंग यांची लोकशाही विचारांचे उदारमतवादी संपादक अशी ख्याती होती.
 3. निहाल सिंह इंडियन एक्स्प्रेसचे संपादक होते. याशिवाय, द स्टॅट्समॅनचे मुख्य संपादकआणि खलील टाइम्स व इंडियन पोस्टचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
 4. आणीबाणीविरोधात ताठ मानेने उभे राहिलेल्या थोडय़ा पत्रकारांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.
 5. आणीबाणीत त्यांनी ‘स्टेट्मन’च्या पहिल्या पानावर ‘आजचा अंक सेन्सॉरशिपखाली छापला गेला आहे’ असे वाक्य ठळकपणे छापून इंदिरा गांधी सरकारच्या आणीबाणीचा निषेध केला होता.
 6. न्यूयॉर्कमधील ‘इंटरनॅशनल एडिटर ऑफ द इयर’ (१९७७) या मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
 7. गेली २० वर्षे ते स्तंभलेखन करत होते. ओघवत्या शैलीत ते सरकारी धोरणांतील चुकांवर बोट ठेवत त्यामुळे त्याचे लेखन लोकप्रिय होते.
 8. संपादक होण्याआधी निहाल सिंग यांनी पाकिस्तान, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, सिंगापूर, अमेरिका, इंडोनेशिया या देशांत प्रतिनिधी म्हणून काम केले. यामुळे निहाल सिंग यांच्याकडे विदेशनीतीतज्ज्ञ म्हणूनही पाहिले जाई.
 9. त्यांचे वडील गुरमुख सिंग दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री होते, नंतर राजस्थानचे राज्यपालही होते.


 Former Chief Justice of Delhi High Court Rajinder Sachar died

 1. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचं निधन झालं. ते ९४ वर्षाचे होते.
 2. देशातील मुस्लिमांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सच्चर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. सच्चर समिती म्हणून ही समिती ओळखली जाते. 
 3. सच्चर यांनी १९५२ पासून वकिलीस सुरुवात केली होती.
 4. सुरुवातीला म्हणजे, ८ डिसेंबर १९६० मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून वकिली सुरू केली.
 5. १२ फेब्रुवारी १९७० मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले. पुढे ५ जुलै १९७२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.
 6. दिल्ली उच्च न्यायालयाशिवाय सिक्कीम आणि राजस्थान उच्च न्यायालयात त्यांनी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं. 
 7. भारतातील मुस्लिमांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यासाठी ९ मार्च २००५ रोजी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती.
 8. सच्चर हे या समितीचे प्रमुख होते. सच्चर यांच्या नावानंच ही समिती ओळखली जाते. 


 German physicist Peter Grunberg died after Nobel Wisdom

 1. भौतिकशास्त्रातील नोबेल मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ पीटर ग्रुएनबर्ग यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
 2. डिजिटल डेटाची साठवणूक करण्यासाठीच्या संशोधनामध्ये त्यांचे बहुमोल योगदान होते. 
 3. गिगाबाईट हार्ड डिस्कचा विकासासाठी आवश्यक अशा जीएमआरचा त्यांनी शोध लावलाहोता.
 4. ग्रूएनबर्ग यांना फ्रेंच वैज्ञानिक अल्बर्ट फर्ट यांच्याबरोबर २००७मध्ये जायंट मॅग्नेटोरेझिस्टन्स परिणामाच्या शोधासाठी नोबेल मिळाले.
 5. ग्रुएनबर्ग यांना याआधी २००६मध्ये युरोपीय युनियनचा पुरस्कार मिळाला होता. तसेच इस्रायल, जपान आणि तुर्कस्ताननेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते. 
 6. १९८९मध्ये त्यांना जर्मन अध्यक्षांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर २००६मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील मानाचा वूल्फ पुरस्कार मिळाला होता.


 Rajni Tilak, leader of Dalit feminist movement, died

 1. दलित अधिकार कार्यकर्त्या आणि लेखिका रजनी तिलक यांचे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले.
 2. लेखिका, उत्तम संघटक व दलित स्त्रीवादी आंदोलनाच्या नेत्या अशी बहुविध ओळख असलेल्या रजनी तिलक या महिलांसाठी तारणहार होत्या.
 3. धार्मिक व पितृसत्ताक अवडंबरे झुगारून देताना जातिअंताच्या लढाईसाठी त्यांनी निर्णायक आंदोलन छेडले. 
 4. रजनी तिलक यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवला.
 5. पितृसत्ताक पद्धतींविरुद्ध त्यांनी लढा दिला, शिवाय जातिवादालाही हादरे दिले. ‘पदचाप’ व ‘हवा सी बेचैन युवतियाँ’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह बरेच गाजले.
 6. त्यांचे ‘अपनी जमीं अपना आसमां’ हे आत्मचरित्र प्रशंसेस पात्र ठरले. उत्तर भारतीय दलित महिलांवरील अत्याचाराचे अनुभव त्यांनी प्रभावीपणे लेखणीतून मांडले.
 7. ‘बेस्ट ऑफ करवा चौथ’ हा त्यांचा नवा कथासंग्रह असाच वाचनीय व विचारांना प्रेरणा देणारा आहे.
 8. बामसेफ, दलित पँथर, आव्हान थिएटर, नॅशनल फेडरेशन ऑफ दलित विमेन, वर्ल्ड डिगनिटी फोरम, दलित लेखक संघ, राष्ट्रीय दलित महिला आंदोलन या  संस्थांशी त्या निगडित होत्या.
 9. सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह दलित मीडिया या संस्थेच्या त्या कार्यकारी संचालकही होत्या. ‘अभिमूकनायक’ या वृत्तपत्राचे संपादन त्या करीत असत.
 10. पुणे येथील दलित महिला परिषदेत त्यांना आंबेडकरी महिला चळवळीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता.
 11. दलितांच्या अधिकारांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या तिलक यांच्या निधनाने दलित अधिकार चळवळ आणि दलित साहित्याची मोठी हानी झाली आहे. 


 Senior socialist leader Bhai Vaidya passed away

 1. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य (भालचंद्र सदाशिव वैद्य) यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे २ एप्रिल रोजी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
 2. स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री असलेले वैद्य राजकीय आणि सामाजिक चळवळीत मात्र 'भाई वैद्य' याच नावाने परिचित होते.
 3. भाई वैद्य यांचा जन्म २२ जून १९२७ रोजी झाला होता. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. 
 4. १९४३पासून ते राष्ट्रसेवा दलाचे सेवक झाले. त्यानंतर १९४६मध्ये कॉंग्रेस समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला.
 5. १९५५मध्ये गोवामुक्ती आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.
 6. १९५७मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांनी ३ आठवडे तुरुंगवास भोगला होता.
 7. १९६२ ते ७८ दरम्यान ते पुणे महापालिकेचे सदस्य होते. याचबरोबर, १९७४-७५ दरम्यान त्यांनी पुणे शहराचे महापौरपदही भूषविले होते.
 8. देशातील आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने मिसाबंदीखाली कारावास भोगला.
 9. १९८३मध्ये जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान निघालेल्या भारत यात्रामध्ये ४००० किमी अंतराच्या यात्रेत त्यांचा सक्रिय सहभागहोता.
 10. पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दीड वर्षे प्रशासन सांभाळले होते.
 11. कष्टकऱ्यांच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या भाई वैद्य यांनी त्यांना सुमारे २५ वेळा कारावास भोगला होता. अगदी अलीकडे शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली होती.
 12. त्यांनी ‘लोकशाही समाजवाद’ ही विचारधारा स्वीकारली आणि अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.


Senior Socialist leader Bhai Vaidya passed away

 1. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. पूना हॉस्पिटलमध्ये भाई वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. भाई वैद्य स्वादुपिंडाचा कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
 2. भाई वैद्य यांचं पार्थिव रात्री लॉ कॉलेज रोडवरील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी 7 वाजता साने गुरुजी स्मारक येथे ठेवले जाईल. दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा आणि संध्याकाळी 6 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
 3. पार्थिव सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
 4. आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक-राजकीय कारकीर्दीत आयुष्यभर लोकशाही आणि समाजवादी मूल्यांची जोपासना करणारं व्यक्तिमत्त्व भाई वैद्य यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेले. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, आणीबाणीविरोधी आंदोलन इत्यादी अनेक आंदोलनांमध्ये भाई वैद्य यांनी सक्रीयपणे सहभाग घेतला होता.
 5. राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील विषयांवर भाई वैद्य हे अभ्यासपूर्ण मांडणी करत असत. तळागाळातील लोकांच्या हक्कांसाठी भाई वैद्य आयुष्यभर झटले.


 Malayalam writer M. Sukumaran passed away

 1. सुप्रसिद्ध मल्याळम लेखक एम सुकुमारन यांचे १६ मार्च २०१८ रोजी निधन झाले आहे.
 2. ते ७६ वर्षांचे होते.
 3. कट्टर कम्युनिस्ट असूनही त्यांना माकपमधील उणिवा दिसल्या व त्या उणिवा दाखवण्यासाठी त्यांनी १९७९ मध्ये ‘शेषक्रिया’ ही कादंबरी लिहिली होती.
 4. त्यांना ‘मरिचितिल्लावरुदे समराकांगल’ या पुस्तकासाठी १९७६मध्ये व ‘जनीथाकम’ पुस्तकासाठी १९९४ मध्ये असा दोनदा केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
 5. त्यांना ‘चुवना चिहनांगल’ या लघुकथा संग्रहासाठी २००६मध्ये राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
 6. त्यांच्या ‘संगागनाम’ आणि ‘उनर्थपट्टू’ या लघुकथांवर चित्रपट निर्मिती करण्यात आलेली आहे.


'Paramveer Parvaan' - Book that tells the victory of Param Vir Chakra winners

 1. ‘परमवीर परवाने’ या शीर्षकासह परमवीर चक्र विजेत्यांची शौर्यगाथा सांगणार्‍या पुस्तकाचा पहिला भाग लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे.
 2. पुस्तकामध्ये कविता आणि गीतांच्या माध्यमातून देशाच्या रक्षणार्थ सर्वोच्च बलिदान देणार्‍या 11 परमवीरांची शौर्यगाथा वर्तवली आहे.
 3. पुस्तकात सन 1947-48 चे युद्ध आणि त्यानंतर सन 1965 पर्यंतच्या युद्धांच्या बाबतीत वृतांत दिले गेले आहे.
 4. डॉ. प्रभाकिरण जैन यांनी पुस्तकात 11 परमवीरांचे जीवन आणि पराक्रम यांचे वर्णन केले आहे.
  1. मेजर सोमनाथ शर्मा,
  2. लांस नायक करम सिंह,
  3. सेकंड लेफ्टनंट रामा राधोबा राणे,
  4. कंपनी हवालदार मेजर पीरूसिंह शेखावत,
  5. नायक जदुनाथ सिंह,
  6. कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया,
  7. मेजर धनसिंह थापा,
  8. सूभेदार जोगिंदर सिंह,
  9. मेजर शैतान सिंह,
  10. कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद
  11. ले. कर्नल अर्देशिर बुर्जोजी तारापोर यांचा समावेश आहे.


 Veteran journalist Jamini Kadu dies

 1. ज्येष्ठ पत्रकार आणि बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचे नागपुरात निधन झाले.
 2. जैमिनी कडू यांचा विविध सामाजिक चळवळीत सहभाग होता.
 3. यात मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, १९७१ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्माण आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 4. त्यांनी केलेल्या समाजविधायक कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते.
 5. यामध्ये अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचा राष्ट्रीय प्रचारक, अधिवेशनांमध्ये महनीय वक्ता म्हणून सहभाग आणि सत्यशोधक सन्मान, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रातर्फे देण्यात येणारा गुणवंत पुरस्कार आदींचा समावेश आहे.
 6. यासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांचे ते पदाधिकारी होते.
 7. यात विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखेचे सचिव, भारतीय श्रमिक पत्रकार संघ नवी दिल्लीचे कार्यकारी सदस्य, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड नागपूरचे सल्लागार आणि कुणबी समाज दर्पण या मासिकाचे ते संपादक होते. 


Top