Famous scientist Stephen Hawking passes away

 1. विज्ञानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे आणि विश्वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगणारे ख्यातनाम ब्रिटिश शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले.
 2. विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवर यांच्या सदर्भात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. 
 3. हॉकिंग यांनी लिहलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘द ग्रँड डिझाईन’, ‘युनिव्हर्स इन नटशेल’, ‘माय ब्रीफ हिस्ट्री’, ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 4. त्यांचे विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित 'ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' हे पुस्तक खूप गाजले.

हॉकिंग यांचे जीवन

 1. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक आणि आई इझाबेल ऑक्सफर्डच्या पदवीधर होत्या.
 2. हॉकिंग यांना विद्यार्थीदशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. विज्ञान विषयात त्यांना रस होता. 1959 साली त्यांनी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती.
 3. त्यांनी 1962 साली ऑक्सफर्डमधून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. याच विद्यापीठात त्यांनी 30 वर्षे गणिताचे अध्यापन केले.
 4. वयाच्या अवघ्या 21 वर्षी जडलेल्या दुर्धर ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ नामक आजारामुळे त्यांचे संपूर्ण शरीर अधू असूनही त्यांनी जिद्दीने आपला प्रवास केला.
 5. हॉकिंग यांची अल्बर्ट आइनस्टाइन आणि सर आयझॅक न्यूटन यांच्याशी तुलना केली जाते.
 6. विश्वशास्त्र (cosmology) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. 2009 साली त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते.
 7. शिवाय त्यांना कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर ही पदवी बहाल केली होती.


 Veteran artist, Sadanand Chandekar passed away

 1. 'हसरी उठाठेव' या विनोदी नाट्यातून रसिकांचे दीर्घकाळ मनोरंजन करणारे एकपात्री क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी  सदानंद चांदेकर यांचे डोंबिवलीत निधन झाले.
 2. आपल्या एकपात्री कार्यक्रमातून त्यांनी दीर्घकाळ रसिकांना हसवत ठेवले.
 3. 'आम्ही दिवटे' हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.
 4. पुण्यातील राहत्या घरी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव आणण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता नाट्य परिषदेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे.
 5. गेल्या काही दिवसांपूर्वी ते डोंबिवलीमध्ये मुलाच्या घरी राहत होते. यावेळी ते घरात पडले.
 6. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील आल्याचे समजते. यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादारम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 68 वर्षांचे होते.


Senior scientist Dr. Gerald Revan dies

 1. टाइप २ मधुमेहावर पायाभूत संशोधन करणारे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जेराल्ड रीव्हन यांचे निधन झाले.
 2. इन्शुलिनला आपल्या शरीरात प्रतिरोध झाला तर त्यामुळे टाइप २ मधुमेह होतो व त्यामुळे इतर अनेक रोग उद्भवतात हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले होते.
 3. १९८८मध्ये त्यांनी इन्शुलिन प्रतिरोध व चयापचयातील अनेक दोष यांचा संबंध जोडून दाखवला; यातून हृदयविकारही बळावतो हे त्यांनी सांगितले. या सगळ्या विकारसमुच्चयाला त्यांनी ‘सिंड्रोम एक्स’ असे नाव दिले होते.
 4. १९५०मध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम सुरू केले. इन्शुलिनच्या अभावी होणारा मधुमेह एवढा एकच प्रकार तेव्हा माहिती होता, पण ते त्यापलीकडे गेले.
 5. १९८८मध्ये एका व्याख्यानात त्यांनी सिंड्रोम एक्सची संकल्पना मांडली. त्यात रक्तदाब, रक्तशर्करा व अनियमित एचडीएल कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइडची रक्तातील पातळी यांचा समावेश होता.
 6. टाइप २च्या मधुमेहातील उपचारात आज जी काही प्रगती झाली आहे त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
 7. एकूण आठशे शोधनिबंध त्यांच्या नावावर होते. त्यांचे ‘सिंड्रोम एक्स’ हे पुस्तक विशेष गाजले.
 8. मिडलटन पुरस्कार, बँटिंग मेडल, फ्रेड कॉनरॉड कॉख पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.


Javed Abadi dies of crippled people

 1. अपंगांच्या हक्कांसाठी लढणारे आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते जावेद अबिदी यांचे वयाच्या ५३व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रोजी निधन झाले.
 2. अपंगांच्या हक्कांसाठी झगडणारा भारताचा वैश्विक चेहरा म्हणूनही जावेद अबिदी यांची ओळख होती.
 3. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये जन्मलेल्या जावेद अबिदी यांना स्पिनिया बिफिडा झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे वयाच्या १५ वर्षापासूनच त्यांना व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला.
 4. अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘डिसअॅबिलिटी राइट ग्रुप’ (डिआरजी)ची स्थापना केली होती.
 5. ‘राइट्स फॉर पर्सन विथ डिसअॅबिलिटी बिल २०१४’ हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर अपंगांचा कँडल मार्च काढला होता.
 6. ताजमहालपासून अनेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी विख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांना व्हीलचेअरवरून भेटी देता याव्यात, यासाठी तेथे रॅम्प बांधण्याचा आग्रह अबिदींनीच धरला होता.
 7. १९९३मध्ये सोनिया गांधी यांच्या आग्रहास्तव त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनच्या अपंग विकास विभागाची जबाबदारी स्वीकारली.
 8. ‘इंटरनॅशनल डिसॅबिलिटी अलायन्स’च्या उपाध्यक्षपदी २०१३ मध्ये अबिदी यांची निवड झाली.
 9. जनगणनेत अपंगांना स्वतंत्र प्रवर्ग, अपंग कामकाज मंत्रालय या महत्त्वाच्या निर्णयांना त्यांची अपंगांच्या हक्कांसाठी चळवळ कारणीभूत होती.
 10. अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. म्हणूनच त्यांना अपंगांचे तारणहार म्हणून ओळखले जायचे.


Nobel laureate Gunther Blobel, American biologist, died

 1. नोबेल विजेते अमेरिकी जीवशास्त्रज्ञ गुंथर ब्लोबेल यांचे १८ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
 2. पेशींच्या अंतर्गत भागांमध्ये प्रथिनांच्या हालचालींशी संबंधित संशोधनासाठी १९९९मध्ये त्यांना नोबेल मिळाले होते.
 3. त्यांचा जन्म १९३६साली तेव्हा जर्मनीमध्ये आणि आता पोलंडमध्ये असेलेल्या वॉल्टर्सडॉर्फ शहरात झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनीतून अमेरिकेत आले.
 4. ब्लोबेल यांनी टुबिनगेन विद्यापीठातून एमडी केली व नंतर मॅडिसनमधील विस्कॉन्सिन विद्यापीठात आले.
 5. रॉकफेलर विद्यापीठातून त्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पेशी जीवशास्त्रातील कारकीर्द सुरू ठेवली.
 6. पेशीतील प्रथिनांच्या हालचालींवर आधारित सिग्नल हायपोथेसिस त्यांनी पेशी जीवशास्त्रज्ञ डेव्हिड डी साबातिनी यांच्याबरोबर काम करताना मांडले.
 7. रेणवीय झिपकोड या पेशीतील रेणूंच्या हालचालींच्या संकेतावलीचा उलगडा त्यांनी केला. त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांची कारणमीमांसा करणे शक्य झाले.
 8. त्यांच्या संशोधनातून पुढील काळात सिस्टीक फायब्रॉसिस, ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), स्किझोफ्रेनिया (व्यक्तिमत्त्व दुभंग), एड्स, कर्करोग व इतर आनुवंशिक रोगांवर मोठी प्रगती झाली.
 9. १९९९मध्ये त्यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल मिळाले तेव्हा त्यांनी ते पैसे फ्रेंड्स ऑफ ड्रेसडेन या संस्थेच्या पुनर्उभारणीसाठी दिले.
 10. त्यांना १९९३मध्ये मूलभूत वैद्यकीय संशोधनासाठी अल्बर्ट लास्कर पुरस्कार मिळाला होता. १९९७मध्ये त्यांना विज्ञान संशोधनात न्यूयॉर्कच्या महापौराचा पुरस्कार मिळाला.


senior Literary Vasant Narhar Phene passed away

 1. ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचे मुंबईतील खार या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 2. साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणारे वसंत नरहर फेणे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
 3. ‘काना आणि मात्रा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर वयाच्या ९०-९१ व्या वर्षापर्यंत ते लेखन करतच होते.
 4. ‘हे झाड जगावेगळे’, ‘ज्याचा त्याचा क्रूस’, ‘मावळतीचे मृदगंध’ ‘ध्वजा’, ‘निर्वासित नाती’, ‘पहिला अध्याय’, ‘विश्वंभरे बोलविले’ ही आणि अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
 5. याच्या ३५ व्या वर्षी त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली.
 6. त्यांच्या वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांची ‘कारवारी माती’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीत त्यांनी लहानपणीची माणसे, प्रसंग, बालपण असे सारे काही रेखाटले आहे.
वसंत नरहर फेणे
 1. मुंबईतील जोगेश्वरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. मुंबई, कारवार आणि सातारा असा प्रवास करत वसंत फेणे यांनी अनेक अडथळ्यांवर मात केली आणि साहित्य विश्वास स्वतःचे स्थान निर्माण केले.
 2. वसंत नरहर फेणे हा चार वर्षांचे होते त्याचवेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची आई त्यांना आणि त्यांच्या भावंडांना घेऊन कारवार या ठिकाणी गेली.
 3. तिथल्या मराठी प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर वसंत फेणे कारवारला आले पण वर्षभरात पुन्हा कारवार येथे गेले.
 4. काही वर्षांनी मुंबईत येऊन त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. संवेदनशील लेखक अशी ओळख असलेल्या वसंत नरहर फेणे यांनी काही काळ राष्ट्र सेवादलातही काम केले.
 5. नोकरीच्या निमित्ताने कोल्हापूर, विजापूर, पुणे, नाशिक या ठिकाणी त्यांना फिरावे लागले. भटकंतीच्या काळातील अनुभवांमधूनच त्यांच्यातला लेखक आकार घेत गेला.
 6. कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद, कादंबरी अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. सामान्य माणसाचे आयुष्य आपल्या कथांमधून कादंबऱ्यांतून उलगडले.
 7. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
 8. वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत लिहिता असणारा लेखक साहित्यविश्वाने गमावला आहे.


Veteran actress Shammi died

 1. ज्येष्ठ बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री शम्मी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
 2. त्या ८९ वर्षांच्या होत्या.
 3. चित्रपटसृष्टीत त्यांचे मोलाचे योगदान असून २०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
 4. विनोदी भूमिकासांठी त्या ओळखल्या जायच्या. ‘कुली नं १’, ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.
 5. छोट्या पडद्यावरील ‘देख भाई देख’, ‘जबान संभाल के’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘कभी ये कभी वो’ आणि ‘फिल्मी चक्कर’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे त्या लक्षात राहिल्या होत्या.
 6. शम्मी यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
 7. महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
 8. फॅशन डिझायनर संदीप खोसलानेही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.


Shankaracharya Jayendra Saraswati dies of Kanchi Kamkoti Peeth

 1. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने २८ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.
 2. जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ रोजी तामिळनाडूमधील इरुलनीकी गावामध्ये झाला. दक्षिण भारतात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी होते.
 3. मठाचे ६८वे शंकराचार्य चंद्रशेखरेंन्द्र सरस्वती यांनी १९५४साली जयेंद्र सरस्वती यांना कांची मठाच्या पीठाधीपती पदावर नियुक्त केले.
 4. जयेंद्र सरस्वतींचे मूळ नाव सुब्रमण्यन महादेव अय्यर होते. चंद्रशेखरेंन्द्र यांनीच सुब्रमण्यन यांना जयेंद्र सरस्वती हे नाव दिले.
 5. चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या निधनानंतर १९९४पासून जयेंद्र सरस्वती यांनी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्यपद सांभाळले. ते या पीठाचे ६९वे शंकराचार्य होते.
 6. जयेंद्र सरस्वती यांच्या निधनामुळे आता विजयेंद्र सरस्वती हे पद सांभाळतील. १९८३साली जयेंद्र सरस्वती यांनी विजयेंद्र सरस्वती यांना मठाचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते.
 7. देशात अयोध्येच्या प्रश्नासह हिंदू धर्मावर परिणाम करणाऱ्या विषयांवर त्यांच्या भूमिकेला मोठे महत्व प्राप्त झाले होते.
 8. कांचीपुरम वरदराजन पेरूमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररामन खून प्रकरणी सरस्वती यांना २००४मध्ये अटक झाली होती. ५ जानेवारी २००५पर्यंत ते तुरुंगात होते.
 9. नंतर त्यांना जामीन मिळाल्यावर २०१३मध्ये पुडुचेरीच्या विशेष न्यायालयाने त्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त केले.
 10. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आदी शंकराचार्य यांनी कांची कामकोटी पीठाची स्थापना केल्याचे मानले जाते. या पीठाकडून शाळा, रुग्णालये चालविली जातात.


Bollywood actress Sridevi dies

 1. बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत निधन झाले.
 2. श्रीदेवी यांनी मद्यपान केल्यामुळे त्यांचा तोल गेल्याने बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे दुबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीतून उघड झाले आहे.
 3. श्रीदेवी उर्फ अम्मा यंगर अय्यपन यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूतील शिवकाशी येथे झाला.
 4. त्या १९९६साली निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.
 5. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे.
 6. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
 7. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी तमिळ चित्रपट ‘थुनैवन’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
 8. १९७१साली ‘पुम्बाता’ या मल्ल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता.
 9. वयाच्या १२व्या वर्षी ‘ज्युली’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केले. तर १५व्या वर्षी ‘सोलवा सावन’ हा त्यांचा प्रौढ कलाकार म्हणून पहिला चित्रपट ठरला.
 10. त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. १९८३मध्ये ‘हिम्मतवाला’ हा त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. तर मॉम हा चित्रपट श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला.
 11. लग्नानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर ६ वर्षानंतर त्यांनी ‘मिसेस मालिनी अय्यर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केली. 
 12. त्यानंतर २०१२साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
 13. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 14. श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 15.  श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट:- 
  1. जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले, गैर क़ानूनी, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.


The world-famous cardiologist Dr. BK Goyal passes away

 1. प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी के गोयल यांचे २० फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.
 2. सर्वसामान्य तसेच गरजू रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.
 3. हृदयविकारशास्त्रातील प्रगाढ अभ्यास आणि अनुभवामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून गोयल यांच्याकडे रुग्णांचा ओघ असे.

 डॉ. बी के गोयल

 1. जयपूरला १९३६साली जन्मलेले डॉ. बी के गोयल हे एक जगप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ होते.
 2. डॉ. गोयल हे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते.
 3. तसेच त्यांनी जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डियोलॉजीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणूनही काम केले.
 4. टेक्सास हार्ट इन्स्टिटय़ूट व न्यू ऑर्लिन्स येथील ओशनर हार्ट इन्स्टिटय़ूट या संस्थांमध्ये ते सल्लागार शल्यविशारद होते.
 5. खान अब्दुल गफार खान म्हणजे सरहद्द गांधी यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे गोयल यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
 6. १९९०मध्ये तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा त्यांच्यावर उपचारासाठी गोयल यांना पाचारण करण्यात आले होते.
 7. गोयल यांनी भारतातील पहिले इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि मोबाइल कोरोनरी केअर युनिट स्थापन केले.
 8. त्यांचे ‘हार्ट टॉक’ हे पुस्तक अनेक भाषांत प्रसारित झाले. १९८०मध्ये वयाच्या ३९व्या वर्षी ते मुंबईचे नगरपाल (शेरीफ)होते.
 9. अवघ्या २९व्या वर्षी जे जे रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. याशिवाय अनेक रुग्णालयांत हृदयरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले.
 10. ह्युस्टनस्थित टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते तसेच भारतीय सैन्यदलाच्या विभागाचेही ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते.
 11. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वैद्यकीय सल्लागार चमूमध्येही त्यांचा सहभाग होता. मुंबईतील हाफकिन संस्थेच्या अध्यक्षपदाचा त्यांनी १४ वर्षे कार्यभार सांभाळला.
 12. देशातील पल्स पोलिओ अभियान, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडो अमेरिकन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, हार्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया, इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॅजी, धन्वंतरी फाऊंडेशन येथेही त्यांनी भरीव काम केले.
 13. मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाने गोयल यांची जुलै २००७मध्ये उपराष्ट्रपती पदासाठी आणि मार्च २०१२मध्ये राष्ट्रपती पदासाठी शिफारस केली होती.
 14. वैद्यकीय क्षेत्रातील मौल्यवान योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (१९९०), पद्मविभूषण (२००५) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
 15. गोयल यांनी पन्नासहून अधिक वर्षे वैद्यकीय सेवा केली. यात त्यांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता निस्पृह भावनेने रुग्णसेवा केली.


Top