MPSC chalu ghadamodi, current affairs

1. देशातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष वेधलेल्या बॉक्सिंग लढतीत शनिवारी सहा वेळा विजेत्या एमसी मेरी कोमने निखत झरीनला नामोहरम केले आणि पुढील वर्षी चीनला होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान पक्के केले.

2. तर 36 वर्षीय मेरी कोमने 23 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या झरीनचा 9-1 असा पराभव केला. मेरी कोमसाठीसुद्धा निवड चाचणीचा निकष असायला हवा, अशी मागणी करीत या लढतीविषयीची उत्कंठा झरीनने वाढवल्याने बॉक्सिंग हॉलमधील वातावरण तणावपूर्ण शांततेचे होते.

3. तसेच अन्य लढतींत, 57 किलो वजनी गटात आशियाई पदकविजेत्या साक्षी चौधरीने दोन वेळा रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेरला नमवले.

4. 60 किलो गटात राष्ट्रीय विजेत्या सिम्रनजीत कौरने माजी विश्वविजेत्या एल. सरिता देवीचा पराभव केला. दोन वेळा जागतिक पदकविजेत्या लव्हलिना बोर्गोहेनने 69 किलो गटात ललिताला सहज पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या पूजा राणीने 75 किलो गटात नूपुरला नामोहरम केले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. बांगलादेशमध्ये होणाऱ्या जागतिक एकादश संघाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-20 सामन्यांत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आशियाई एकादश संघाकडून एकत्रित खेळणार नाहीत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी सांगितले.

2. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुढील वर्षी मार्च महिन्यात दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

3. तसेच 18 आणि 21 मार्चला होणाऱ्या या दोन सामन्यांसाठी भारताच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे.गेली सात वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झालेल्या नाहीत. परंतु विश्वचषक आणि आशियाई स्पर्धामध्ये या उभय संघांमध्ये सामने झालेले आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताच्या आघाडीच्या रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी 63व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखली आहे. अंजुम मुद्गिलने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली.

2. तर याचप्रमाणे अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंग देसवालने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात राष्ट्रीय जेतेपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या हर्षदा निथावे आणि अनिकेत जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

3. मनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने कनिष्ठ मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक मिळवताना राष्ट्रीय स्पर्धेतील सातव्या सुवर्णाची नोंद केली. तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील वरिष्ठ, कनिष्ठ आणि सांघिक गटांमध्ये चार सुवर्णपदके जिंकली होती.

4. अंजुमने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान मिळवताना 1172 गुण मिळवले. मग अंतिम फेरीत सुवर्णलक्ष्य साधताना अंजुमने 449.9 गुण मिळवले, तर तमिळनाडूच्या एन. गायत्रीला 2.6 गुण कमी मिळाले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मागील दहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांवर वर्चस्व गाजवणारा भारताचा कर्णधार विराट कोहली याला ‘द क्रिकेटर’ या पाक्षिकाने दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.

2. तर पाक्षिकाने गेल्या 10 वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 50 क्रिकेटपटूंची यादी तयार केली असून, त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश आहे.

3. भारताकडून कोहलीसह रविचंद्रन अश्विन 14 व्या, रोहित शर्मा 15 व्या, महेंद्रसिंग धोनी 35 व्या आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा 36 व्या स्थानावर आहे.

4. तसेच महिला क्रिकेटपटू मिताली राज 40 व्या स्थानी आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1.भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय प्रकाराप्रमाणेच कसोटीतही ‘आयसीसी’ जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र कसोटीचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची एका स्थानाने घसरण झाली आहे.

2. कोहलीच्या खात्यात सर्वाधिक 928 गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील स्टीव्ह स्मिथपेक्षा (911) तो 17 गुणांनी पुढे आहे.

3. त्यामुळे वर्षांखेरीसपर्यंत तरी कोहलीच्या अग्रस्थानाला कोणताही धोका नाही. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन (864) आणि भारताचा चेतेश्वर पुजारा (791) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहे. युवा मार्नस लबूशेन (786) पाचव्या स्थानावर आहे.

4. तसेच पाकिस्तानच्या बाबर आझमने (767) श्रीलंकेविरुद्ध झळकावलेल्या सलग दोन शतकांमुळे सहावा क्रमांक पटकावला असून रहाणे 759 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मनू भाकरने राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली.

2. तर 17 वर्षीय मनूने वरिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 243 गुण मिळवले, तर कनिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 241 गुण मिळवले.

3. युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मनूने पात्रता फेरीत 588 गुण मिळवले.

4. वरिष्ठ गटात देवांशी धामाने रौप्य आणि यशस्वी सिंग देशवालने कांस्यपदक पटकावले. मनू आणि यशस्वी यांनी 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील स्थाने आधीच पक्की केली आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताची वेटलिफ्टिंगपटू राखी हॅल्डरने कतार आंतरराष्ट्रीय चषक वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या 64 किलो गटात कांस्यपदक मिळवताना दोन राष्ट्रीय विक्रम नोंदवले.

2. राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राखीने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील स्नॅच आणि एकूण वजन उचलण्याचे दोन विक्रम मोडीत काढले.

3. तर तिने एकूण 218 किलो वजन उचलले.

4. भारताने या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत एकूण तीन पदकांची कमाई केली. माजी विश्वविजेत्या मिराबाई चानूने सुवर्णपदक मिळवले, तर जेरेमी लालरिनुंगाने रौप्यपदक पटकावले.

5. 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने या स्पर्धेतील गुण महत्त्वाचे ठरणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय वेगवान गोलंदाज व्हर्नन फिलँडरने जाहीर केला.

2. डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केलने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती पत्करल्यामुळे फिलँडरच्या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला आणखी एक धक्का बसला आहे.

3. तर 34 वर्षीय फिलँडरने 60 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 7 ट्वेन्टी-20 सामन्यांत प्रतिनिधित्व केले.

4. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 22.16 च्या धावसरासरीने 216 बळी मिळवले आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्यात धडाकेबाज फलंदाज शेमरॉन हेटमायरने आणखी एक विक्रमी कामगिरी केली आहे.

2. तर आपल्या संघाला वन-डे मालिकेत पहिला सामना जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हेटमायरने इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गनला मागे टाकलं आहे.

3. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2018 पासून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हेटमायर आता तिसऱ्या स्थानी आला आहे.

4. भारताविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात हेटमायरने 37 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. भारताकडून आपला पहिला वन-डे सामना खेळणाऱ्या नवदीप सैनीने हेटमायरला माघारी धाडलं.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताचा सलामीवीर आणि उप कर्णधार रोहित शर्माने 22 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम मोडीत काढताना रोहितने भल्या भल्या फलंदाजांना मागे सारले आहे.

2. रोहितने या एका वर्षात 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 25 सामन्यांमध्ये रोहितने 2400 धावांचा पल्ला पार केला आहे.

3. तर यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा माजी धडाकेबाद सलामीवीर सनथ जयसूर्याच्या नावावर होता. जयसूर्याने एका वर्षात सलामीवीर म्हणून 2387 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीतने तब्बल 22 वर्षांनी मोडीत काढला आहे.


Top