mpsc chya watevar

MPSC च्या वाटेवर चालताना....


MPSC ने दिलेलं …

आमचे एक सर गमतीने म्हणायचे की ज्या व्यक्तिचा बदला घ्यायचा, त्याच्या पोराला MPSC च्या नादी लावा ….

खूप jokes होत राहतात  यावर . मी मागे वळून बघतो…  जेव्हापासून हातात सहज पडलेल्या 2 Private च्या नोकऱ्या सोडल्या आणि MPSC चा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला…ते आजपर्यंत….!!!  लहान पणापासून गुणवत्ता यादीत म्हणा किंवा स्पर्धांमध्ये म्हणा विशेष कष्ट न घेता यश मिळालं त्यामुळे  मी स्वतः आणि इतर लोक पण मला फार हुशार समजायचे. वाटलं एका attempt मध्ये काढून घेऊ MPSC .

MPSC  ने पहिला धडा दिला की सहज काहीच मिळत नसत. अभ्यास करत असताना अनेक हुशार आणि खूप काही great सोडून आलेले लोक बघितले आणि याचा नाद सोडून आपल्या मार्गी निघून जाणारे पण बघितले…
पण या सगळ्याने खूप शिकवलं. मग मला MPSC ने ३ धडे दिले

हा अभ्यास खरंच खूप चांगला आहे . मला या अभ्यासाने गोष्टींना Reason करायला शिकवलं. गोष्टींकडे डोळसपणे बघायला शिकवलं.जे चांगलं दिसतं त्यातली मेख आणि जे वाईट दिसतं त्यात फक्त सरकारची चूक नसते हे कळलं.  problems  आहेत समाजात…  त्यासाठी आपण तितकेच जबाबदार असतो याची जाणीव करून दिली.

आपले अधिकार आणि कर्तव्य माहित असणं आणि ते रोजच्या जीवनात वापरणं यातला फरक कळला.
शाळेत अतिशय boring पद्धतीने शिकवले जाणारे इतिहास , भूगोल, राज्यशास्त्र , अर्थशास्त्र किती interesting आहेत याची कल्पना आली. आता वाटत शाळेत जाव आणि म्हणावं की मला २ lectures द्या फक्त…  त्यांना समजावू दे की, "राष्ट्रपती हा भारताचा नागरीक असावा आणि वयाची इतकी इतकी वर्ष पूर्ण केलेला असावा" एवढचं नाही हे सगळं …. !!!

मला खात्री आहे स्वतः ची  की मी कशावर पण असाच विश्वास नाही ठेवणार आता . कोणत्या विषयातील Master नसेल पण प्रत्येक गोष्टीतलं थोडं मला माहित आहे. Jack of all , Master of none
आणि जे माहित नाही त्याचा अभ्यास करून जाणून घेण्याची इच्छाशक्ती निर्माण झालीय.

आता आरक्षणाचा कसं  झालय  किंवा प्रशासन कधीच सुधारणार नाही किंवा  किंवा रेल्वे ची भाडेवाढ का केली…. हे असले प्रश्न येत नाहीत.  कारण त्यामागच सगळं किंवा बरंच काही माहित असतं. आपल्या देशात सगळ वाईट च नाही याची पुरेपूर कल्पना आलीय. आपल्या लोकशाही साठी जगात का मान आहे आपल्या देशाला ,ते खोलवर कळतंय . योगा दिवस declare होण किंवा PARIS  मध्ये आपल्या देशाचा पुढाकार ही किती अभिमानाची गोष्ट आहे ते जाणवतंय…

दैनंदिन जीवनात वावरताना  खूप बदल घडवून आणलाय MPSC ने माझ्यात …  मला कोणी विचारलं की तू गेल्या ३ वर्षात ठोस काय मिळवलं रे… त्याच उत्तर "शून्य" असू शकतं … पण मी काय मिळवलं ते मला माहितेय… कारण मला "दृष्टीकोन " मिळालाय!! खूप  up n downs येतात … कधी कधी चिडायला होतं तर कधी रडायला पण येतं… पण तेवढ्या पुरतं … कारण तेपण शिकवते की MPSC …!!!

मला माहित नाही की यात माझं भविष्य काय असेल…. मी काय मिळवेल …. पण एवढ नक्कीच माहितेय की MPSC ने एक चांगलं नागरिक व्हायला शिकवलंय…. प्रत्येक गोष्टीत  खारीचा वाटा किती महत्त्वाचा असतो ते उमगलंय… मी म्हणतो , प्रत्येकाने आयुष्यात एकदा MPSC चा अभ्यास नक्की करावा…. हा अतिरेक होईल… पण MPSC देणाऱ्याला वेडा म्हणू नये किंवा त्याला नोकरी ला कधी लागणार म्हणून उगाच सारखा सारखं विचारून demotivate करण्याचा प्रयत्न करू नये आणि सणकी तर अजिबात ठरवू नये

!!! कारण यात एक वेगळीच मज्जा आहे ती अनुभवल्याशिवाय नाही समजणार …. !!!


Top

Whoops, looks like something went wrong.