spardhak ani virodhak

स्पर्धक आणि विरोधक


जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना
 स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे .
स्पर्धक* आपल्याला सतत गतीशील आणि क्रियाशील बनवितात ..
विरोधक* कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात. 
आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात ..
या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही.. 
समाज" फुकटात यांना तुम्हाला देवून टाकतो .. 
त्यांच्यावर चीडू नका त्यांचे कायम स्वागत करा 
कारण* त्यांच्या शिवाय तुमचे जगणे अधूरे आहे ...

आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस..

          येणारी प्रत्येक वादळे ही
   आपल्याला उध्वस्त करण्यासाठी 
                नसतात..........,

           तर आपण काय आहोत 
             याची जाणीव करून 
           देण्यासाठी असतात......!!!!

स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा झाली पाहिजे..

ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाचा द्वेष असावा,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी…!!


Top

Whoops, looks like something went wrong.