चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ४५


१) जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेहरुन्निसा दलवाई यांचे ८ जून, २०१७ रोजी निधन झाले. त्यांच्याविषयी अचूक विधानांची निवड करा.

अ) मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या त्या पत्नी होत्या.

ब) शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला होता.

क) १९८६-८७ मध्ये त्यांनी महाराष्ट्रात तलाक मुक्ती मोर्चा काढला होता.

ड) 'मी भरून पावले' हे त्यांच्या चरित्राचे नाव आहे.

Show Answer

२) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ५ मे,२०१७ रोजी 'दक्षिण आशियाई उपग्रहा' चे (GSAT-9) अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्टय नाही?

१) स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिन असलेल्या GSLV F-09 या प्रक्षेपकाद्वारे याचे प्रक्षेपण करण्यात आले.

२) या उपग्रहाचा उद्देश दक्षिण आशियाई भागातील देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत व संपर्क उपलब्ध व्हावा हा आहे.

३) दक्षिण आशियातील ८ देश या (GSAT-9) मोहिमेचा भाग आहेत.

४) विद्युत प्रणोदक / प्रचालकाचा (Electric Propulsion) वापर करण्यात आलेला हा भारताचा पहिलाच उपग्रह आहे.

Show Answer

३) पुढीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे,ते ओळखा.

१) पी.ए. संगमा - पद्मविभूषण पुरस्कार २०१७

२) चो रामस्वामी - पद्मविभूषण पुरस्कार २०१७

३) विराट कोहली - पद्मश्री पुरस्कार २०१७

४) दीपा करमाकर - पद्मश्री पुरस्कार २०१७

Show Answer

४) ९.१५ किमी लांबीचा ढोला-सादिया पूल हा देशातील सर्वात लांबीचा नदी पूल ठरला आहे. या पुलाचे नाव काय ठेवण्यात आले आहे?

१) ब्रह्मपुत्रा - लोदित सेतू

२) आसाम - अरुणाचल पूल

३) भूपेन हजारिक पूल

४) यापैकी नाही

Show Answer

५) भारतातील पहिली 2G (सेकंड जनरेशन) इथेनॉल बायो रिफायनरीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले?

1) गांधीनगर (गुजरात)

२) पणजी (गोवा)

३) पुणे (महाराष्ट्र)

४) भटिंडा (पंजाब)

Show Answer

६) आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासंबंधीची योग्य विधान/ने शोधा.

अ) बालहक्कांसाठी आणि असुरक्षित बालकांच्या समस्या दूर करण्यासाठी योगदान दिलेल्या बालकास दरवर्षी हे पारितोषिक देण्यात येते.

ब) विजेत्याच्या देशामधील प्रकल्पामध्ये १ लाख युरोची गुंतवणूक असे या पारीतोषिकाचे स्वरूप आहे.

क) किड्स राईट्स या बालहक्कांसाठी काम करणाऱ्या बिगर शासकीय पारीतोषिकाची स्थापना केली.

ड) २०१६ सालच्या आंतरराष्ट्रीय बाल शांतता पारितोषिकफ केहकशां बसू यांना सन्मानित करण्यात आले आहे.

इ) केहकशां बसू ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणारी भारतीय पर्यावरण कार्यकर्ता आहे.

फ) केहकशां बसू ही १६ वर्ष वयाची असून वयाच्या १२ व्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिने ग्रीन होप नावाची पर्यावरण संस्था सुरु केली आहे.

१)फक्त अ,ब,क,इ,फ योग्य

२)फक्त अ,क,इ,फ योग्य

३)वरीलपैकी सर्व

४)वरीलपैकी एकही नाही

Show Answer

७) मूळचे महाराष्ट्रातील सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वराड गावचे लिओ वराडकर यांची नुकतीच (३ जून, २०१७) कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

 

१) नेदरलँड

२) आईसलँड

३) फिनलँड

४) आयर्लंड

Show Answer

८) रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी देशातील पहिली 'अंत्योदय एक्सप्रेस' चे उदघाटन २७ फेब्रुवारी,२०१७ रोजी केले. अंत्योदय एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावणार आहे?

१) एर्नाकुलम-हावडा

२) नवी दिल्ली- हावडा

३) आग्रा-हावडा

४) पुरी-वाराणसी

Show Answer

९) वस्तू व सेवा कर (GST) यासंबंधी पुढीलपैकी असत्य विधान निवडा.

१) GST विधेयक संमत करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले काँग्रेसशासित राज्य आहे.

२) GST विधेयक (१२२ वे घटनादुरुस्ती विधेयक) संमत करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य आहे.

३) GST विधेयक संमत करणारे महाराष्ट्र हे १० वे राज्य आहे.

४) GST विधेयक संमत करणारे मिझोराम हे १६ वे राज्य आहे.

Show Answer

१०) आग्नेय आशियाई प्रदेशातील हेपॅटिटीस रोगाच्या जागरूकतेसाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणाची सदिच्छादूत म्हणून निवड केली आहे ?

१) शाहरुख खान

२) विराट कोहली

३) ऐश्वर्या रॉय

४) अमिताभ बच्चन

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.