चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५८


१) पुढील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.

१) केंद्र सरकारने लवकरच १०० रु.चे नाणे बाजारात आणण्याचे घोषित केले.

२) तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांच्या जन्म शताब्दी निमित्त नाणी बाजारात आणण्यात येणार आहे.

३) या १०० रु.च्या नाण्याचे वजन ५० ग्रॅम असणार आहे.

४) नाण्याचा व्यास ४४ मिलीमीटर असून त्यात चांदी ५०%, तांबे ४०%, निकेल ५% आणि जस्त ५% असे मिश्रण असेल.

Show Answer

2) अ) बिमस्टेक (Bay of Bengal Initiative on Multisectoral, Technical & Economic Cooperation : BIMSTEC) राष्ट्रांची २०१७ ची १७ वी बैठक नेपाळमध्ये होणार आहे.

ब) बिमस्टेकची २०१६ ची बैठक गोवामध्ये झाली होती.

क) बिमस्टेकचे मुख्यालय बँकॉक (थायलंड) येथे आहे.

ड) पाकिस्तान हा बिमस्टेकचा सदस्य नाही.

वरीलपैकी चुकीचे विधान/ने कोणते/ती?

१) अ,क, व ड

२) फक्त क

३) फक्त क व ड

४) फक्त ब व ड

Show Answer

3) पुढीलपैकी अयोग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) कौशिक बसू यांची नुकतीच IEA-आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

ब) यापूर्वी २००९ ते २०१२ दरम्यान कौशिक बसू भारताचे आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ व ब दोन्ही

४) यापैकी नाही

Show Answer

४) 'अण्वस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम' (MTCR) गटाबाबतच्या विधानांचा विचार करा. (विक्रीकर निरीक्षक २९ जाने.२०१७)

अ) जून २०१६ मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला.

ब) या गटात ३५ राष्ट्रे सभासद आहेत.

क) प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे.

ड) क्षेपणास्रे आणि वैमानिक विरहित विमानांच्या तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मुख्य उद्देश आहे.

वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?

१) केवळ अ आणि ब

२) केवळ अ आणि क

३) केवळ अ आणि ड

४) वरील सर्व

Show Answer

5) सुयोग्य जोड्या जुळवा. पीक किमान आधारभूत किंमत

(२०१६-१७, प्रति क्विंटल रु.)

अ) गहू                                     i) ४०००

ब) हरभरा                                 ii) १६२५

क) मोहरी                                 iii) ३७००

ड) कापूस (लांब धागा)                iv) ४१६०

     अ           ब            क          ड

१)   ii           i               iii         iv

२)   ii          iii               i          iv

३) iii            ii                i         iv

४) ii             iii               iv        i

Show Answer

६) खालील विधानांपैकी अयोग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरु होणार असून सिंगापूर च्या मदतीने प्रकल्प पूर्ण होणार आहे.

ब) मुंबई - अहमदाबाद अंतर ५०८ किमी आहे.

क) बुलेट ट्रेन चा वेग ताशी ३५० किमी प्रस्तावित आहे.

ड) बुलेट ट्रेन एकूण मार्गांपैकी २१ किमी भुयारी मार्ग व ७ किमी समुद्राखालून मार्ग जाणार आहे.

१) अ बरोबर

२) ब बरोबर

३) क बरोबर

४) ड बरोबर

Show Answer

७) खालील विधानांपैकी योग्य विधाने निवडा.

अ) भारताच्या केंद्रीय कॅबिनेट मध्ये संरक्षण मंत्री म्हणून सीतारामन यांची निवड झाली.

ब) इंदिरा गांधी नंतर संरक्षण मंत्रीपदावर जाणाऱ्या सीतारामन ह्या दुसऱ्या महिला आहेत.

क) सीतारामन मुळच्या तामिळनाडू राज्याच्या आहेत.

१) अ व क

२) अ व ब

३) फक्त अ योग्य

४) सर्व योग्य

Show Answer

८) केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) नवीन महासंचालक राजीव रे भटनागर यांच्याविषयी काय खरे नाही?

अ) ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA, पुणे) चे माजी विद्यार्थी आहेत.

ब) ते राष्ट्रीय पोलीस मोहिमेचे पहिले संचालक आहेत.

क) त्यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे महासंचालक म्हणून देखील काम पहिले आहे.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) फक्त ब

४) यापैकी नाही

Show Answer

९) खालील विधानांपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी डॉ. अरविंद पानगढिया यांच्या जागी डॉ.राजीव कुमार यांची नियुक्ती केली.

ब) या आधी डॉ.राजीव कुमार हे फिक्की चे सरचिटणीस होते.

क) एम्स मधील बालरोगतज्ञ डॉ.विनोद पॉल यांचीही आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली.

१) अ बरोबर

२) अ व क बरोबर

३) अ व ब बरोबर

४) सर्व बरोबर

Show Answer

१०) खालील विधानाचा विचार करा आणि योग्य विधान/नांची निवड करा.

अ) सुरुवातीस २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात २ लाख रुपयांवरील व्यवहार रोखीने केल्यास त्यावर दंड आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

ब) अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात सुचविलेल्या दुरुस्तीमध्ये ३ लाख रुपयांवरील व्यवहार रोखीने केल्यास त्यावर दंड आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

१) फक्त अ बरोबर

२) फक्त ब बरोबर

३) दोन्ही बरोबर

४) दोन्ही चूक

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.