चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ६०


१) QR-SAM च्या संदर्भात खालील विधाने वाचा.

अ) हे जमिनीवरून हवेत मारा करणारे अत्यंत प्रभावी क्षेपणास्त्र आहे.

ब) हे स्वदेशी भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र याची निर्मिती DRDO आणि BEL ने संयुक्तपणे केली आहे.

क) हे क्षेपणास्त्र सर्व ऋतू मध्ये कार्यक्षम आहे.

ड) या क्षेपणास्राची मारक क्षमता २० ते ३० किमी आहे.

इ) या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी ३ जुलै, २०१७ रोजी करण्यात आली.

वरील विधानांपैकी योग्य विधान/ने कोणते/ती ?

१) फक्त अ आणि ब

२) अ, ब, क आणि इ

३) फक्त क आणि ड

४) वरील सर्व

Show Answer

२) आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू राफेल नदाल विषयी खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

अ) राफेल नदाल १० वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारा पहिला खेळाडू आहे.

ब) कोणत्याही एक ग्रॅडस्लॅम स्पर्धा १० वेळा जिंकणारा राफेल नदाल पहिला खेळाडू ठरला.

क) राफेल नदाल हा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीतील एकही अंतीम सामना हरला नाही.

१) फक्त अ व ब

२) फक्त अ व क

३) फक्त ब व क

४) वरील सर्व

Show Answer

३) महाराष्ट्रातील शेतकरी जूनच्या पहिल्या आठवडयात अनिश्चित काळासाठी संपावर गेले होते, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या कोणत्या होत्या?

अ) कृषी कर्ज माफी

ब) कृषी मालाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

क) वीजबिल माफी

ड) भविष्यात घेण्यात येणाऱ्या कृषी कर्जाची व्याज माफी

 

१) अ, ब व क

२) फक्त अ व ब

३) अ, ब व ड

४) वरील सर्वच

Show Answer

४) मरियम मिर्जाखानी यांचे १५ जुलै, २०१७ रोजी वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) गणितातील नोबेल समजला जाणारा फिल्ड मेडल जिंकणारी एकमेव महिला होती.

ब) मरियम मिर्जाखानी ही फिल्ड मेडल जिंकणारी पहिली महिला होती.

क) ती इराणची राहणारी होती.

वरीलपैकी योग्य विधान/ने कोणते/ती.

 

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) फक्त अ व क

४) वरील सर्व योग्य

Show Answer

५) माजी न्यायाधीश पी.एन. भगवती यांचे १५ जून,२०१७ रोजी निधन झाले. त्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) भारताचे ते १७ वे सरन्यायाधीश होते.

ब) त्यांना 'जनहित याचिके'ची प्रणेते म्हटले जाते.

क) त्यांना पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वरीलपैकी योग्य विधान/ने कोणते/ती?

१) अ व ब

२) अ व क

३) फक्त अ

४) वरील सर्व

Show Answer

६) खालील विधानांचा विचार करा.

अ) भारतीय अर्थव्यवस्थेचे रूपांतर कॅशलेस अर्थव्यवस्थेमध्ये करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने 'अमिताभ कांत' च्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून तिला त्यासंबंधीच्या शिफारशी करण्यास सांगितले आहे.

ब) निच्छलीकरणाच्या निर्णयानंतर देशात 'डिजिटल पेमेंट' व्यवहारांना चालना देण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी 'एन.चंद्राबाबू नायडू' यांची निवड करण्यात आली होती.

क) केंद्र सरकारने घेतलेल्या निच्छलीकरणाच्या निर्णयानंतर देशात 'डिजिटल इंडिया' कार्यक्रमाला अधिक गती मिळाली असून 'अकोदरा' गावाने देशातील पहिले डिजिटल खेडे होण्याचा मान मिळवला आहे.

वरीलपैकी योग्य विधाने निवडा.

१) फक्त अ,ब

२) फक्त अ,क

३) यापैकी एकही नाही

४) अ,ब,क

Show Answer

७) पर्यटन विभागाने नुकतेच महाराष्ट्रातील खालील पैकी कोणत्या ठिकाणांना 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

अ) नागपूर येथील दिक्षाभूमी ब) मुंबई-दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर (स्मारक) चैत्यन्यभूमी

क) तारापोरवाला मत्सालय मुंबई ड) बीबि का मकबरा औरंगाबाद

१) फक्त अ

२) फक्त अ,ब

३) फक्त अ,ब,क

४) वरील सर्व

Show Answer

८) जलिकट्टू बाबत खालील विधाने विचारात घ्या.

अ) तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात जलिकट्टू विधेयकाला २३ जानेवारी,२०१७ रोजी मंजूरी देण्यात आली.

ब) पशुक्रुरता प्रतिबंधक कायदा- १९६० मध्ये तामिळनाडूत दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रपती महोदय प्रणव मुखर्जी यांनी २० जानेवारी,२०१७ रोजी मंजूरी दिली.

क) तामिळनाडूत साजरा केला जाणारा पोंगल या सणात जलिकट्टू हा खेळ खेळला जातो.

ड) उधळलेल्या बैलावर अंकूश मिळवित इच्छित वधूला मागणी घालण्याच्या या खेळाला जलिकट्टू म्हणतात.

वरीलपैकी योग्य विधान/ने कोणती.

१) फक्त अ,ब,क

२) फक्त ब,क,ड

३) फक्त अ,ड

४) वरील सर्व

Show Answer

९) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. (विक्रीकर निरीक्षक २९ जाने.२०१७)

१) पी.व्ही. सिंधू ही ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

२) पी.व्ही. सिंधू भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी सर्वात लहान वयाची खेळाडू ठरली आहे.

३) साक्षी मलिक ही भारतीयांमधून ऑलिम्पिक पदक जिंकणारी सहावी महिला खेळाडू ठरली आहे.

४) साक्षी मलिक ही कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

Show Answer

१०) रेरा : RERA म्हणजेच Real Estate Regulation Act. हा कायदा २०१६ मध्ये केंद्र सरकारने मंजुर केला. त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या नियमाबाबत योग्य विधान/ने निवडा.

अ) या कायद्यातील नियमानुसार सर्व विकासकांना महारेरामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.

ब) विकासकाला दिलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण न झाल्यास जास्तीत जास्त २ वर्षे पर्यंत मुदत वाढ देता येईल.

क) रेरा प्राधिकरणाच्या आदेशांची अंमलबजावणी न करणाऱ्या विकासकाला १ ते ३ वर्षे तुरुंगवास किंवा प्रकल्प खर्चाच्या १० ते २० टक्के दंड आकारण्यात येईल.

१) फक्त अ बरोबर

२) फक्त अ व ब बरोबर

३) वरील सर्व बरोबर

४) फक्त अ व क बरोबर

Show Answer

Top