चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ६१


१) न्या. गिरधर मालवीय समिती ने नुकताच अहवाल सरकारला सादर केला. ही समिती कशा संदर्भात आहे?

१) शेतकरी आत्महत्या थांबविण्याच्या उपाय योजना

२) दिल्लीमधील वायु प्रदूषण रोखण्यासाठी कायदा

३) गंगा अधिनियमाचा मसुदा तयार करण्यासाठी

४) देशात अनुसूचित जातीवरील अन्याय रोखण्यासाठी कायदा तयार करण्यासंदर्भात

Show Answer

२) २९ सप्टेंबर,२०१६ रोजी भारताने केलेल्या लक्ष्यभेदी कारवाई नंतर चुकून सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तानच्या ताब्यात गेलेल्या चंदू चव्हाण बाबतीत पुढील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा.

अ) त्याची २२ जानेवारी,२०१७ रोजी सुखरूप सुटका करण्यात आली.

ब) चंदू चव्हाण हा '३७ राष्ट्रीय रायफल्स' मध्ये तैनातीला होता.

क) चंदू चव्हाण हा धुळे जिल्ह्यातील बोरिविहीर या गावचा रहिवासी आहे.

१) अ,ब,क

२) फक्त ब,क

३) फक्त क

४) कोणतेही नाही

Show Answer

३) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईचे नवे नामकरण/नामविस्तार करण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाने विधानसभेत १६ डिसेंबर,२०१६ रोजी मंजूरी दिली आहे. त्यानुसार नवे नामकरण काय असणार आहे?

१) छत्रपती शिवाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई

२) छत्रपती शिव-संभाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई

३) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई

४) वरीलपैकी कोणतेही नाही

Show Answer

४) NATO (North Atlantic Treaty Organization) संघटनेविषयी अचूक विधान/ने ओळखा.

अ) जून २०१७ मध्ये माँटेनेग्रो हा NATO चा २९ वा सदस्य झाला आहे.

ब) NATO चे मुख्यालय मॉंट्रियल (कॅनडा) येथे आहे.

क) २५ मे,२०१७ रोजी NATO ची वार्षिक परिषद ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे पार पडली.

१) फक्त अ

२) फक्त अ व ब

३) फक्त अ व क

४) फक्त ब व क

Show Answer

५) खालील विधानांचा विचार करून बरोबर विधान/ने ओळखा.

अ) 'दिव्यांग हक्क विधेयक' या विधेयकाला राज्यसभेने १४ डिसेंबर,२०१६ रोजी मंजूरी दिली.

ब) 'दिव्यांग हक्क विधेयक' या विधेयकाला लोकसभेने १६ डिसेंबर,२०१६ रोजी मंजूरी दिली.

क) या विधेयकानुसार सरकारी नोकऱ्यामध्ये दिव्यांगाना ४ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

१) फक्त अ

२) फक्त ब,क

३) फक्त अ,क

४) वरील सर्व

Show Answer

६) टाटा समुहाचे नविन अध्यक्ष एन. चंद्रशेखरनं यांच्या विषयी पुढील विधाने विचारात घ्या.

अ) टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची सुत्रे एन. चंद्रशेखरनं यांनी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी स्विकारली.

ब) एन. चंद्रशेखरनं हे टाटा कुटुंबाबाहेरील व बिगर पारसी असलेले पहिले अध्यक्ष ठरले आहे.

क) २४ ऑक्टोबर, २०१६ रोजी हकालपट्टी झालेले सायरस मिस्त्री यांच्या जागी ते अध्यक्ष झाले आहेत.

ड) टाटा समुहाचे मुख्यालय दक्षिण मुंबईतील 'बॉम्बे हाऊस' आहे.

वरीलपैकी बरोबर विधाने ओळखा.

१) फक्त अ व ब

२) फक्त क व ड

३) फक्त अ,ब क ड

४) वरील सर्व

Show Answer

७) 'आय एन एस तरासा' संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) हे एकट वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट (WJFAC) आहे.

ब) याची निर्मिती DRDO ने केली आहे.

क) या क्राफ्टवर तेजस विमान सुसज्ज केले जाणार आहे.

वरील पैकी कोणते विधान योग्य आहे?

१) अ, ब व क

२) फक्त अ

३) फक्त ब

४) फक्त क

Show Answer

८) अ) भारतातील तृतीयपंथियांसाठी (Transgender) असलेली पहिली शाळा केरळमध्ये सुरु करण्यात आली.

ब) 'सहज इंटरनॅशनल' असे या शाळेचे नाव आहे.

वरील विधाने वाचा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

१) फक्त अ बरोबर

२) फक्त ब बरोबर

३) दोन्ही बरोबर

४) दोन्ही चूक

Show Answer

९) अ) महाराष्ट्र शासनाने नुकतीच भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय-फाय (Wi-Fi) सेवा सुरु केली आहे.

ब) ही सेवा मुंबई शहरात 'Mumbai Wi-Fi' नावाने सुरु करण्यात आली आहे.

वरील विधाने वाचून खालील योग्य पर्याय निवडा.

१) फक्त अ बरोबर

२) फक्त ब बरोबर

३) अ व ब दोन्ही बरोबर

४) अ व ब दोन्ही चूक

Show Answer

१०) रुबेला (Rubella) रोगासंदर्भात खालील विधानांचा विचार करून योग्य विधान/ने कोणती आहेत हे ओळखा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) रुबेला हा संक्रमण व्हायरस असून तो लसीकरण करून रोखू शकतात.

ब) थ्रोम्बोसाइटोपेनिया (रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे) या रोगाचे प्रमुख लक्षण आहे.

क) झोप न लागणे, तसेच घाम येणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे.

१) अ,ब व क

२) फक्त अ व ब

३) फक्त अ

४) फक्त क

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.