चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ६३


१) अंधाच्या ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेविषयी अयोग्य कथन कोणते?

अ) या स्पर्धेचा अंतिम सामना १२ फेब्रुवारी,२०१७ रोजी बंगळुरू येथे भारत व पाकिस्तान या संघादरम्यान झाला.

ब) विश्वविजेता पाकिस्तान भारताला नमवून झाला.

क) ५७० धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर मुनीरला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

ड) अंतिम सामन्याचा सामनावीर प्रकाश जयारामैह याने ९९ धावांची खेळी केली.

१)फक्त अ,ब

२)फक्त ब

३)फक्त क,ड

४)फक्त ड

Show Answer

२) आय एन एस व्ही 'तारिणी' विषयी खालील विधाने विचारात घ्या.

अ) 'तारिणी' ही एक शिडाची नौका आहे.

ब) नुकतीच ही नौका नौदलात दाखल झाली.

क) रत्नाकर दांडेकर यांच्या अँक्वेरिअस शिपयार्ड प्रा.लि. या नौका बांधणी उद्योगाने तारिणीची बांधणी केली.

ड) संपूर्ण महिला नौसैनिकाच्या सहभागाने तारिणी सागर परिक्रमा करणार आहे.

इ) 'तारिणी' हे नाव ओरिसाच्या गंजम जिल्ह्यातील तारा-तारिणी या खलाशी व व्यापाऱ्यांच्या देवतेवरून देण्यात आले आहे.

वरीलपैकी चुकीचे विधान/ने ओळखा.

१) फक्त अ व इ

२) फक्त ब व ड

३) फक्त क

४) वरीलपैकी एकही नाही.

Show Answer

३) ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी खालील विधाने विचारात घ्या.

अ) ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारी,२०१७ दरम्यान डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले.

ब) या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे होते.

क) या संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले.

ड) संमेलन स्थळाला पु.वा.भावे साहित्य नगरी असे नाव देण्यात आले.

वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

१) फक्त अ

२) फक्त ब,क,ड

३) फक्त अ,ब,ड

४) फक्त ड,अ

Show Answer

४) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सात सदस्यांच्या समितीत -------- यांचाही समावेश करण्यात आला आहे.

१) राहून द्रविड, कपिल देव

२) विरेंद्र सेहवाग, गौरम गंभीर

३) राजीव शुक्ला, सौरव गांगुली

४) व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, अनुराग कश्यप

Show Answer

५) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सात सदस्यांच्या समितीत -------- यांचाही समावेश करण्यात आला आहे.

१) राहून द्रविड, कपिल देव

२) विरेंद्र सेहवाग, गौरम गंभीर

३) राजीव शुक्ला, सौरव गांगुली

४) व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, अनुराग कश्यप

Show Answer

६) खालील विधाने विचारात घ्या.

अ) भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद ३ ते ७ जानेवारी २०१७ या कालावधी मध्ये तिरुपती (आंध्रप्रदेश) येथे संपन्न झाली.

ब) ही भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद १०४ क्रमांकाची होती.

क) पहिली भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद १९४७ साली झाली होती.

ड) या परिषदेचे घोषवाक्य 'राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' हे होते.

वरीलपैकी चुकीचे विधान /ने ओळखा.

१)फक्त क

२)फक्त अ व क

३)अ व क

४)वरील सर्व

Show Answer

७) 'गानसरस्वती किशोरी आमोणकर' यांच्याबद्दल अचुक पर्याय निवडा.

अ) किशोरी आमोणकर यांचे ३ एप्रिल २०१७ ला वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.

ब) त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या जेष्ठ गायिका होत्या.

क) त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबरच,ख्याल,ठुमरी,भजन गायन करत होत्या.

ड) त्यांना संगीत नाटकं अकादमी पुरस्काराने १९८५ ला तर १९८७ ला पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

इ) त्यांनी स्वरार्थरमणी (रागरससिद्धांत) हा संगीत शास्रावरील ग्रंथ लिहिला होता.

१) अ,ब,क

२) अ,ब,क,ड

३) अ,ब,क,इ

४) वरील सर्व

Show Answer

८) खाली दिलेल्या योजना व राज्य यांच्या योग्य जोडया जुळवा.

योजना                                                                 राज्य

अ) बालिका संरक्षण योजना                                  i) बिहार

ब) आपकी बेटी, हमारी बेटी                                 ii) आंध्रप्रदेश

क) आश्रम योजना                                              iii) राजस्थान

ड) मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना                           iv) हरियाणा
 

  अ        ब            क           ड

१) ii        iii            iv            i

२) ii        iv            iii            i

३) iv       iii             ii            i

४) iii       iv             ii            i

Show Answer

९) खालील विधाने विचारात घ्या.

अ) भारताचे माजी मुख्य न्यायाधीश टी.एस.ठाकूर हे ३ जानेवारी,२०१७ रोजी निवृत्त झालेत.

ब) भारताचे नवे मुख्य न्यायाधीश हे सात महिने पदावर राहतील.

क) न्या.जगदिश खेहार यांनी कर्नाटक व उत्तराखंड या राज्यांचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे.

ड) खेहार यांची भारताचे ४४ वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे.

इ) खेहार हे भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारे पहिले शीख व्यक्ती आहेत.

वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

१) फक्त अ,ब,व ड

२) फक्त ब,क,ड व इ

३) वरीलपैकी सर्व

४) यापैकी एकही नाही

Show Answer

१०) जीएसटी विधेयकासंबंधी खालीलपैकी कोणते /ती विधान/ने बरोबर आहे?

अ) १०१ वी घटना दुरुस्ती, २०१६ घटनादुरुस्तीने याची ओळख संसदेत झाली.

ब) १२२ वी घटनात्मक सुधारणा, २०१६ घटनादुरुस्तीने याची पुनःओळख संसदेत झाली.

क) अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या काळात या दोन्ही विधेयकांची ओळख झाली.

ड) जीएसटी विधेयक १ जुलै ,२०१७ ला लागू झाला.

इ) जीएसटी या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणारा पहिला केंद्रशासित प्रदेश चंदिगढ आहे.

फ) जीएसटी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली - ८ सप्टेंबर

१)फक्त अ,ब,क,ड,व इ बरोबर

२)अ,ब,क,ड,फ बरोबर व इ चूक

३)वरीलपैकी एकही नाही

४)वरील सर्व

Show Answer

Top