चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७१


1) अफगाणिस्तानातील दहशतवादी तळावर अमेरिकेकडून जोरदार हल्ला करण्यात आला,त्याविषयी खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.

अ) हा बॉम्ब जीबियू ४३/बी किंवा मदर ऑफ ऑल बॉम्ब म्हणूनही ओळखला जातो.

ब) हा आजवरचा सर्वात शक्तिशाली अणुविरहित बॉम्ब आहे.

क) त्याचे वजन सुमारे ९८०० किलो आहे.

ड) या बॉम्बची स्फोटक क्षमता मोठी असली तरी जमिनीत घुसण्याची क्षमता अणुबॉम्बसारखी नाही.

१) अ,ब व क

२) अ व क

३) सर्व योग्य

४) क व ड

Show Answer

2) 'नोबेल पुरस्कार' प्राप्त मलाला युसूफझाई हिच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

अ) संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी मलालाची जागतिक शांतिदुत पदी निवड केली आहे.

ब) मलाला संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वात तरुण शांतिदुत ठरली आहे.

क) २०१३ साली 'मलाला निधी' ची स्थापना करण्यात आली होती.

ड) २०१५ साली मलाला हिला शांततेचे नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

१) अ व ब

२) अ,ब व क

३) ब,क व ड

४) वरील सर्व

Show Answer

3) 'जेष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर' यांच्याबद्दल योग्य विधान/विधाने ओळखा.

अ) गोविंद तळवलकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी अमेरिकेतील ओहिओ राज्यातील क्लिव्हलँण्ड येथे निधन झाले.

ब) त्यांनी लेखक, संपादक, पत्रकार, राजकीय विश्लेषक, साहित्यिक इ.क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला होता.

क) महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदी धुरा त्यांनी २७ वर्षे सांभाळली होती.

ड) त्यांनी मराठीसोबत इंग्रजी वृत्तपत्रातही लेखन केले होते.

इ) त्यांनी नौरोजी ते नेहरू, विराट ज्ञानी न्या.रानडे, नेक नामदार गोखले, अग्निकांड, पुष्पांजली इ.पुस्तके लिहिली.

ई) त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

१)अ,क,ड,ई

२)अ,ब,क,ड

३) अ,ब,इ,ई

४) वरील सर्व

Show Answer

4) 'खांदेरी' या पाणबुडी संदर्भात योग्य पर्याय निवडा.

अ) संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांच्याहस्ते माझगाव गोदीत 'खांदेरी' या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचे जलावरण करण्यात आहे.

ब) फ्रान्स कंपनीच्या साहाय्याने 'प्रोजेक्ट-७५' करारानुसार 'खांदेरी' पाणबुडीची बांधणी करण्यात आली.

क) स्कॉर्पिन वर्गातील 'खांदेरी' ही दुसरी पाणबुडी आहे.

ड) 'खांदेरी' पाणबुडीला खांदेरी या जलदुर्गावरून नाव देण्यात आले आहे.

१) अ व ब

२) अ,ब व क

३) अ,ब व ड

४) अ,ब,क व ड

Show Answer

5) गगनजित भुल्लर यांच्या विषयी खालील विधानांचा विचार करा.

अ) भारताच्या गगनजित भुल्लर याने इंडोनेशिया ओपन गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

ब) गगनजितने कारकिर्दीत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे.

क) गगनजितचे एशियन टूरमधील हे सातवे विजेतेपद ठरले आहे.

वरीलपैकी योग्य विधाने असलेला पर्याय निवडा.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) यापैकी एकही नाही

४) वरील सर्व

Show Answer

6) आदिती अशोक बद्दल खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) आदिती अशोक हिने हिरो महिला इंडियन ओपन टूर्नामेंट चे विजेतेपद पटकाविले आहे.

ब) महिला युरोपियन टुर किताब जिंकणारी आदिती अशोक ही पहिली भारतीय महिला गोल्फपटू आहे.

वरील विधानांपैकी योग्य विधान/ने कोणते/ती?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) दोन्ही अयोग्य

४) दोन्ही योग्य

Show Answer

7) खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.

अ) जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर (D.Lit) ही पदवी प्रदान करण्यात आली.

ब) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसकर आहेत.

१) फक्त ब

२) फक्त अ

३) अ व ब

४) यापैकी नाही

Show Answer

8) सक्षम-२०१७ विषयी खालील विधानांचा विचार करा.

अ) नवी दिल्ली येथे १६ जानेवारी,२०१७ रोजी या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

ब) हे एक ऊर्जा संरक्षण अभियान आहे.

क) या कार्यक्रमाचे आयोजन पीसीआरओ (पेट्रोलियम संरक्षण संघटना) आणि पेट्रोलियम मंत्रालयामार्फत केले जात आहे.

ड) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पेट्रोलियम उत्पादनाचा उपयोग आणि सुरक्षाच्या विषयी सामान्य माणसाला जागरूक करणे आहे.

वरील योग्य विधान/ने कोणते/ती आहे/त.

१) फक्त अ,ब

२) फक्त क,ड

३) फक्त अ,क,ड

४) अ,ब,क व ड

Show Answer

9) माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कोणत्या न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला.

१) फरीदाबाद २) अहमदाबाद ३) जाफराबाद ४) नागपूर

९८४). PSLV - C 37 प्रक्षेपकाद्वारे सोडलेल्या उपग्रहासंबंधी सत्य विधान/ने ओळखा.

अ) अमेरिकेचे लेमुर नॅनो नावाचे आठ उपग्रह आहेत.

ब) डोवेस प्रकारचे ८८ नॅनो उपग्रह सोडले गेले.

क) डोवेस प्रकारचे नॅनो उपग्रह प्लॅनेट या अमेरिकेच्या खाजगी संस्थेचे आहेत.

ड) भारताच्या तीन उपग्रहांचे एकूण वजन ७३२.१ कि.ग्रॅ. होते.

इ) कार्टोसॅट-२डी या उपग्रहाचे वजन ७१४ कि.ग्रॅ.होते.

फ) १०३ उपग्रहांचे वजन ६६३ कि.ग्रॅ.होते.

१) फक्त अ, ब, क आणि इ

२) फक्त ब, क, इ आणि फ

३) अ, ब, ड, इ आणि फ

४) वरील सर्व सत्य

Show Answer

10) जयवंतीबेन मेहता यांच्याबद्दल अचूक विधान/विधाने ओळखा.

अ) वयाच्या ७८ व्या वर्षी ७ नोव्हेंबर,२०१६ ला त्यांचे निधन झाले.

ब) आणीबाणीत त्यांनी १९ महिने तुरुंगवास भोगला होता.

क) १९६८ ते १९७८ असे दहा वर्षे त्या नगरसेविका होत्या.

ड) १९७८ ला प्रथमच त्या विधानसभेवर निवडून गेल्या होत्या.

इ) १९९९ मध्ये त्या १३ व्या लोकसभेत द.मुंबईच्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या होत्या.

ई) त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्या होत्या.

१) अ,क,ड,इ

२) ब,क,ड,इ

३) अ,ब,क,ड,इ

४) वरील सर्व अचूक

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.