चालू घडामोडी प्रश्नमंजुषा १०४


१) ‘शि मीन्स बिझनेस’ कार्यक्रमाबाबत खालील विधानांचा विचार करा.

अ) महाराष्ट्र राज्य सरकारने फेसबूक या सोशल नेटवर्किंग कंपनीच्या साहाय्याने महिला नवाउद्दोजाकांना प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात केली.

ब) या कार्यक्रमांतर्गत २०१८ पर्यंत राज्यातील २५ हजार महिला नवउद्दोजक आणि स्वयं सहायता गटांना डिजिटल मार्केटिंग कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

वरीलपैकी योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

१)फक्त अ

२) फक्त ब ३

3) अ व ब दोन्ही

४) अ व ब दोन्हीही नाही

Show Answer

2) आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस’ संदर्भात खालील विधानांचा विचर करा.

अ) २०१७ साली “चॅलेंजेस अँड ऑपर्च्युनिटीज इन क्लायमेट- रेझीलांस अॅग्रीकल्चरल फॉर जेंडर इक्वेलिटी अँड द एमपॉवरमेंट ऑफ रुरल विमेन अँड गर्ल्स” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.

ब) २००८ साली पहिला ‘आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस’ साजरा केला गेला.

क) १५ ऑक्टोबर ला हा दिवस साजरा केला जातो.

वरील विधानांपैकी अयोग्य विधान/ने निवडा.

१)फक्त अ

२) फक्त ब

३) अ, ब व क 

४) यापैकी एकही नाही

Show Answer

3) ‘कांडला बंदर’बद्दल योग्य विधाने ओळखा.

अ) गुजरातमधील कांडला बंदरास पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यास केंद्रीय कॅबिनेट ने मंजुरी दिली आहे.

ब) या बरोबरच कांडला पोर्ट ट्रस्ट आता दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट या नावाने ओळखले जाणार आहे.

क) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या वर्षी विविध कार्यक्रम आयोगीत करण्यात आले होते.

१) फक्त अ

२) फक्त अ व ब

३) वरील सर्व

४) यापैकी एकही नाही

Show Answer

4) आयएनएस किल्तान युद्ध नौकेबद्दल खालीलपैकी योग्य विधाने सांगा.

अ) शत्रूंच्या पाणबुड्यांचा खात्मा करणारी ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे.

ब) किल्तान च्या बांधणीत कार्बन फायबरचा वापर करण्यात आलेला आहे.

क) कार्बन फायबरचा वापर करून बांधण्यात आलेली ही दुसरी भारतीय युद्ध नौका आहे.

ड) समुद्राखालून जाणार्या पाणबुड्या उध्वस्थ करण्याची क्षमता किल्तानमध्ये आहे.

१) फक्त अ व ब

२) फक्त अ, ब व क

३) फक्त अ, ब व ड

४) वरील सर्व

Show Answer

5) पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.

अ) गाईंच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या पशुधन संजीवनी योगानेंतर्गत झारखंडमध्ये १५ लाखांहून अधिक गायींचे हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.

ब) ही योजना राबविणारे झारखंड हे भारतातील दुसरे राज्य आहे.

क) या योगानेमध्ये जनावरांना आधार क्रमांकाप्रमाणे १२ आकडी क्रमांक देण्यात येणार आहे.

१) फक्त अ व ब

२) फक्त अ व क

३) फक्त अ, ब व क

४) यापैकी एकही नाही

Show Answer

6) देशात इस्लामिक बँकिंग न आणण्याचा निर्णय कोणत्या बँकेने घेतला आहे?

१) बँक ऑफ इंडिया

२) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

३) पंजाब इंटरनॅशनल बँक

४) बँक ऑफ इंडिया

Show Answer

7) आरबीआय (RBI) ने किती राज्यात प्रायोगिक तत्वावर आर्थिक साक्षरता अभियान चालविण्याची योजना केली आहे?

१) ७

२) ८

३) ९

४) १०

Show Answer

8) पर्यटन मंत्रालयाकडून संपूर्ण देशात ५ ऑक्टों. ते २५ ऑक्टों, २०१७ या दरम्यान कोणता कार्यक्रम आयोजित केला गेला होता?

१) उज्ज्वल पर्यटन

२) सर्वार्थ पर्यटन

३) पर्यटन शुभंभवतू

४) पर्यटन पर्व

Show Answer

9) केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिसमितीने ‘मुस्लिम महिलांच्या विवाहविषयक हक्कांचे संरक्षण विध्येयका’चा मसुदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यान्वये दोषीला किती वर्षांची शिक्षा होईल?

१) दोन वर्षे

२) तीन वर्षे

३) चार वर्षे

४) पाच वर्षे

Show Answer

10) केंद्र सरकारच्या शादी शगुन योजनेबद्दल योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.

अ) विवाहाच्या आधी पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम मुलींना मोडी सरकारकडून या योजनेंतर्गत ५१,००० चा निधी दिला जाणार आहे.

ब) अल्प संख्यांक समाजातील मुलींनी अधिकाधिक शिक्षण घ्यावे हा उद्देश या योजनेचा आहे.

क) ज्या अल्प संख्यांक कुटुंबांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

१) फक्त अ व ब

२) फक्त अ व क

३) वरील सर्व

४) यापैकी एकही नाही

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.