विज्ञान प्रश्नमंजुषा ०१


योग्य जोड्या लावा.

१) स्वयंपोषी            i) अमरवेल

२) परजीवी              ii) घटपर्णी

३) किटकभक्षी         iii) कवक

४) परपोषी              iv) आंब्याचे झाड

अ) १-iv, २-i, ३-ii, ४-iii

ब) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

ड) १-i, २-iii, ३-ii, ४-iv

Show Answer

कंठस्थ/अवटू ग्रंथीसंबंधी कोणते वाक्य अयोग्य आहे?

१) ही गर्दी लाल रंगाची ग्रंथी मानेमध्ये कंठाजवळ असते.

२) हिचा आकार इंग्रजी H सारखा असतो.

३) ही थायरॉक्सीन नावाचे हार्मोन स्त्रवते.

अ) १ अयोग्य

ब) २ अयोग्य

क) ३ अयोग्य

ड) यापैकी नाही

Show Answer

उती म्हणजे विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींचा समुह होय. खालील वनस्पती मधील सरल स्थायी ऊतीचे काही प्रकार व त्यांची कार्ये यांची जोडी दिलेली आहे. यांपैकी अयोग्य पर्याय निवडा.

१) हरित उती – प्रकाश संश्लेषण

२) वायू उती – वनस्पती पाण्यावर तरंगू शकतात.

३) दृढ उती – वनस्पती ताठ व टणक बनवणे.

४) मुल उती – अन्न व पाणी साठवून ठेवतात.

अ) फक्त १ अयोग्य

ब) १, २ अयोग्य

क) फक्त ४ अयोग्य

ड) यापैकी एकही नाही

Show Answer

किरणोत्सारी मुलद्रव्यातून जेव्हा अल्फा कणाचे उत्सर्जन होते तेव्हा अणुवस्तूमानांकावर काय परिणाम होतो? योग्य पर्याय निवडा.

अ) अणुवस्तुमानांक २ ने कमी होतो.

ब) अणुवस्तुमानांक २ या वाढतो.

क) अणुवस्तुमानांक ४ ने कमी होतो.

ड) अणुवस्तुमानांक काहीच परिणाम होत नाही.

Show Answer

सोडीअम कार्बोनेटमध्ये खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आहेत?

अ) सोडिअम, सल्फर, हायड्रोजन

ब) कार्बन, सल्फर, हायड्रोजन

क) सोडिअम, कार्बन, ऑक्सीजन

ड) कार्बन, सल्फर, ऑक्सीजन

Show Answer

खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा.

१) जर दोन वस्तूंमधील अंतर पाच पट केले तर त्यांच्यातील गुरुत्व बल आधीच्या गुरुत्व बलाच्या १/२५ पट एवढे होईल.

२)जर दोन वस्तूंमधील अंतर पाच पट केले तेव्हा त्यांच्यामधील गुरुत्व बल कायम राखण्यासाठी त्यांपैकी एका वस्तूचे वस्तुमान आधीच्या वस्तुमानाच्या २५ पट करावे लागेल.

अ) फक्त १ योग्य

ब) फक्त २ योग्य

क) १ आणि २ योग्य

ड) यापैकी एकही नाही

Show Answer

योग्य जोड्या लावा.

काचेचे प्रकार                           उपयोग

१) सोडा, लाईम काच               i) चंचूपात्रे बनविणे

२) बोरोसिलिकेट काच            ii) खिडक्यांची तावदाने

३) फ्लिंट काच                        iii) कृत्रिम हिरे बनविणे

४) जल काच                          iv) साबण उद्योग

अ) १-ii, २-i, ३-iii, ४-iv

ब) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

क) १-i, २-iv, ३-iii, ४-ii

ड) १-ii, २-iii, ३-iv, ४-i

Show Answer

खालील विधानामधून योग्य पर्याय निवडा.

१) PH मुल्य जेवढे जास्त तेवढा आम्लगुणधर्म जास्त असतो.

२) PH मुल्य जेवढे जास्त तेवढा आम्लारीगुणधर्म जास्त असतो.

अ) १ योग्य, २ अयोग्य

ब) २ योग्य, १ अयोग्य

क) १ व २ योग्य

ड) १ व २ अयोग्य

Show Answer

फ्लिंट काच कशापासून तयार करण्यात येते?

अ) वाळू + सोडा + चुनखडी

ब) वाळू + बोरॉन + सोडा

क) सोडिय़म + पोटॅशिअम + लेड सिलिकेट

ड) वाळू + सोडा + बेरीअम ऑकसाईड

Show Answer

खालील विधानांपैकी अयोग्य विधाने कोणती नाहीत ती ओळखा.

१) ऑक्सीडीकरण अभिक्रियेत ऑक्सीजन स्वीकारला जातो व हायड्रोजन बाहेर टाकला जातो.

२) क्षपण अभिक्रियेत हायड्रोजन स्वीकारला जातो व ऑक्सीजन बाहेर टाकला जातो.

३) जेव्हा या दोन्ही अभिक्रिया एकाचवेळी घडून येतात तेव्हा त्यांना ड्ररेडॉक्सफ अभिक्रिया असे म्हणतात.

अ) फक्त १ व २

ब) फक्त ३

क) वरील सर्व

ड) एकही नाही

Show Answer

Top