विज्ञान प्रश्नमंजुषा ०२


पुढील कोणती विधाने योग्य आहेत ?

1) ऑक्सिजनयुक्त रक्त आणि बिनाऑक्सिजन रक्त यांचे मिश्रण होऊ नये म्हणून पक्ष्यांमध्ये व सस्तन प्राण्यांत चार दालनाचे हृदय आहे.

2) ओम्फिबीयनस व काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये काही प्रमाणात ऑक्सिजन युक्त व विना ऑक्सिजन रक्त मिश्रण होण्यास हरकत नसते म्हणून त्यांचे हृदय तीन दालनांचे असते.

3) माश्यांमध्ये केवळ दोन दालनांचे हृदय असते कारण गील्समध्ये जाऊन ऑक्सिजनयुक्त होते व नंतर शरीराच्या इतर भागात जाते.

अ) 1 व 2

ब) 2 व 3

क) व 3

ड) 1, 2, 3

Show Answer

खालीलपैकी कोणते विधान / विधाने योग्य आहे ?

1) ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणारी विकारे विषाणूमध्ये नसतात.

2) कोणत्याही संश्लेषित (सिंथेटिक) माध्यमात विषाणूची वाढ होऊ शकते.

3) एका साजीवातून दुसऱ्या सजीवात विषाणूंची लागण हि जैविक द्वारेच होते.

अ) फक्त 1

ब) फक्त 2 आणि 3

क) फक्त 1 आणि 3

ड) 1, 2 आणि 3

Show Answer

डायक्लोरोडायफेनिल ट्रायक्लोरो इथेन (डीडीटी) सर्वप्रथम क्लोरीनेटेड ऑरगॅनिक कीटकनाशक असून परिणामकारक कीड नष्ट करणाऱ्या त्याच्या गुणांकरता पॉल मुलर यांना मेडिसीन व फिजिऑलॉजीचे 1948 चे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले

1) डीडीटी मलेरिया पसरविणाऱ्या मच्छरांविरुद्ध परिणामकारक आहे.

2) डीडीटी टायफस वाहतूक करणाऱ्या उवांविरूद्ध परिणामकारक आहे.

3) डीडीटी पाण्यातील माशांकारिता अत्यंत विषारी आहे.

4) प्राणिजन डीडीटीचे सहज चयापचय प्रक्रिया (पृथक्करण) करू शकत नाहीत.

वरील कोणती विधाने खरी आहेत ?

अ) 1 व 3

ब) 1 व 4

क) 1, 3 व 4

ड) 1, 2, 3 व 4

Show Answer

वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासुन 'बास्ट फायबर्स' प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात ?

अ) रसवाहिन्या

ब) जलवाहिन्या

क) मुळे

ड) पाने

Show Answer

खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

अ) कार्बनडाय ऑक्साईड लेसरचा (CO LASER) उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करू शकतो.

ब) मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही.

क) शत्रूची क्षेपणास्त्रे शोधण्याकरिता रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते.

ड) सोनार (SONAR) तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो.

Show Answer

निळसर हिरवे शेवाळे ही संभवनीय ---------- करीता वापरली जातात.

अ) जैविक कीटकनाशके

ब) जैविक खाते

क) कीटक नाशके

ड) स्पुरकक्षार द्रवणशील करणारे

Show Answer

बायो डीझेल कशापासून बनविले जाते ?

अ) साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थापासून

ब) खाद्य व बिगर खाद्य तेलबियांपासून

क) अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांपासुन

ड) शेतातील टाकाऊ पदार्थांच्या किण्वन प्रक्रियेतून

Show Answer

खालील धातू विचारात घ्या.

1) प्लॅटिनम

2) सोने

3) तांबे

4) शिसे

चढत्या घनतेनुसार त्याची क्रमवारी लिहा :

अ) 3, 4, 2, 1

ब) 4, 3, 2, 1

क) 1, 2, 3, 4

ड) 3, 4, 1, 2

Show Answer

खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे ?

अ) ग्लुकोकॉकार्टीकॉईड

ब) प्रोजेस्टेरॉन

क) टेस्पेस्टेरॉन

ड) इन्सूलीन

Show Answer

पाण्याच्या थेंबाविषयी पुढे सर्वसाधारण विधाने आहेत.

1) पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार असण्यास पृष्ठतान कारणीभूत आहे.

2) गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याच्या थेंबाचा आकार गोल असतो.

3) जर पाण्याचे वस्तुमान ताणले गेले तर थेंब तयार होतात.

वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) फक्त 1

ब) 1 आणि 2 फक्त

क) 3 फक्त

ड) 1, 2 आणि 3

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.