राज्यशास्त्र प्रश्नमंजुषा ०२


समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्यांचा अंतर्भाव होतो ?

1) कायद्यासमोर समानता

2) अस्पृश्यतेच्या समाप्ती

3) पदव्यांची समाप्ती

4) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य

अ) फक्त 1, 2 व 4

ब) फक्त 1, 3 व 4

क) फक्त 1, 2 व 3

ड) फक्त 2, 3, व 4

Show Answer

कालानुक्रमे मांडणी करा.

1) अंतर्गत सुरक्षा कायदा

2) प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा

3) दहशतवाद प्रतिबंधक कायदा

4) राष्ट्रीय सुरक्षा कायदा

अ) 2, 1, 4, 3

ब) 1, 2, 3, 4

क) 3, 4, 1, 2

ड) 2, 4, 3, 1

Show Answer

पुढील विधानांपैकी कोणती योग्य आहे ?

1) आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही ते अधिनियमाने स्वीकारावे / अंगीकारावे लागतात.

2) भारतीय न्यायालये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांशी ताळमेळ ठेवतात. परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कायद्यात मतभेद दिसतो. आंतरराष्ट्रीय कायदा मानला जातो.

अ) फक्त 1

ब) फक्त 2

क) 1 व 2 दोन्ही

ड) दोन्ही नाही

Show Answer

सर्वोच्च न्यायालयाच्या "घटकराज्य खाजगी प्राथमिक शाळांतील I ते IV वर्गांसाठी मातृभाषेची सक्ती करू शकत नाही." या निवड्यात खालील मुद्यांचा समावेश होतो.

1) खाजगी विनाअनुदानीत शाळा आणि भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या नियमाच्या कक्षेत येत नाही.

2) माता किंवा पिता अथवा पालक बालकाची मातृभाषा ठरवतील.

3) 19 (I) (a) कलमाने हमी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कात, बालकाला किंवा त्याच्या वतीने माता किंवा पिता अथवा पालकाला शिक्षणाचे माध्यम ठरविण्याचे अधिकार आहे.

योग्य विधान ओळखा.

अ) फक्त 1

ब) फक्त 1 व 2

क) फक्त 2 व 3

ड) 1, 2 व 3

Show Answer

राष्ट्रीय ध्वज (झेंडा) फडकावण्यावर कोणत्या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात ?

अ) बोधचिन्ह व नावे (अयोग्य वापरावर प्रतिबंध) (एम्बलम अँड नेमस् - प्रीव्हेन्शन ऑफ इम्प्रॉपर युज) अधिनियम 1950

ब) राष्ट्रीय गौरवाचा अपमान - प्रतिबंध अधिनियम 1971 (प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्टस् टू नॅशनल ऑनर अॅक्ट 1971)

क) वरील 1 व 2 दोन्हीही

ड) वरील 1 व 2 पैकी एकही नाही

Show Answer

राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत भाष्ये आणि भाष्यकार यांची जुळणी करा.

1) सामाजवादावाचून फेबियन समाजवाद

2) जरी या घोषणांचा कितीही प्रमाणात 'वाचने' मानावयाचे ठरले, तरीही त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकीर्ती प्राप्त होईल

3) राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही

4) बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक

i) के. टी. शाह

ii) डॉ. बी. आर. आंबेडकर

iii) 19 व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञान

iv) डॉ. के. सी. व्हेअर

अ) 1 - iii, 2 - iv, 3 - ii, 4 - i

ब) 1 - i, 2 - ii, 3 - iii, 4 - iv

क) 1 - ii, 2 - i, 3 - iv, 4 - iii

ड) 1 - iv, 2 - iii, 3 - i, 4 - ii

Show Answer

घटकराज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्यात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

अ) संसदेला तो अधिकार दिला आहे.

ब) संसद साध्या बहुमताने तसा कायदा करू शकते.

क) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित घटकराज्य विधीमंडळाची मते 'आजमावली' पाहिजेत.

ड) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.

Show Answer

माहिती अधिकार अधिनियम 2005, च्या कलम 12 अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही ?

अ) पंतप्रधान

ब) लोकसभेमध्ये विपक्षिदलाचा नेता

क) लोकसभेचा सभापती

ड) पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्य

Show Answer

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे ?

अ) 19 (1) (a)

ब) 19 (1) (b)

क) 19 (1) (c)

ड) 19 (1) (d)

Show Answer

माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत 'सक्षम प्राधिकारी' म्हणजे.......

1) लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा संघराज्य क्षेत्राच्या बाबतीत सभापती

2) सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत भारताचे मुख्य न्यायमूर्ती

3) उच्च न्यायालयाच्या बाबतीत उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती

4) संविधानाद्वारे किंवा तद्न्वेये स्थापन किंवा घाटीत करण्यात आलेल्या अन्य प्रधीकारणांच्या बाबतीत यथास्थिती राष्ट्रपती किंवा राज्यपाल

योग्य पर्याय निवडा.

अ) 1 व 2 फक्त

ब) 2 व 3 फक्त

क) 3 व 4 फक्त

ड) सर्व योग्य

Show Answer

Top