राज्यशास्त्र प्रश्नमंजुषा ०३


लोकपाल अध्यक्षांच्या आणि सदस्यांच्या नेमणूक मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश असेल?

अ) प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, विरोधीपक्ष नेता, महाधिवक्ता इत्यादी

ब) प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता आणि राष्ट्रपती इत्यादी

क) प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, लोकसभेचा विरोधीपक्ष नेता, सरन्यायाधीश /सरन्यायाधीशाने नेमलेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश इत्यादी

ड) राष्ट्रपती , लोकसभा अध्यक्ष, लोकसभेचा विरोधीपक्षनेता, सरन्यायाधीश/सरन्यायाधीशाने नेमलेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधिश इत्यादी

Show Answer

खालील पर्यायातून योग्य विधान कोणते ?

१) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याच्या पद्धतीचे    नियमन ‘न्यायाधिश चौकशी कायदा, १९६८’ प्रमाणे होते.

२) अध्यक्ष/सभापतीमार्फत आरोपींची चौकशी करण्यासाठी चार सदस्य    असलेली समिती नेमण्यात येते.

३) जर दोन्ही सभागृहामध्ये प्रस्ताव विशेष बहुमताने संमत झाला तर  राष्ट्रपतींकडे न्यायाधीशास पदावरून दूर करण्याचे समावेदन सादर केले  जाते.

अ) १, २, ३ योग्य

ब) १, २ योग्य

क) २, ३ योग्य

ड) १, ३ योग्य

Show Answer

पुढील विधानांचा विचार करा.

१) वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यशासनास आहेत.

२) वित्त आयोगाचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो.

३) महाराष्ट्राच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री. वासुदेवन होते.

४) आत्तापर्यंत ४ वित्त आयोग नेमले आहेत.

अ) १, ३ योग्य

ब) २, ४ योग्य

क) ३, ४, १ योग्य

ड) २, ३, ४ योग्य

Show Answer

महिला मताधिकाराचा अधिकार खालीलपैकी कोणत्या देशाला सर्वांत आधी मिळाला?

अ) न्यूझीलंड

ब) ऑस्ट्रेलिया

क) फिनलंड

ड) श्रीलंका

Show Answer

वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीत खालीलपैकी कोण होते?

१) भगवंतराव गाढे

२) बाळासाहेब देसाई

३) एम. आर. यार्दी

४) डी. डी. साठे

५) एस. पी. मोहिते

अ) १, २, ३, ४

ब) १, २, ४, ५

क) २, ३, ४, ५

ड) वरील सर्व

Show Answer

भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद केलेल्या तरतुदी विचारात घ्या.

1) भारतीय नागरिकासाठी समान नागरी कायदा अमलात आणणे.

2) खेड्यात पंचायतीची स्थापना करणे.

3) ग्रामीण भागामध्ये कुटिरोद्योग सुरु करणे.

4) कामगारांना सोयीस्कर करमणूक आणि इतर संधी उपलब्ध करून देणे.

वरीलपैकी कोणत्या तरतुदी महात्मा गांधीच्या तत्त्वावर आधारीत आहेत. याबाबत योग्य पर्याय निवडा.

अ) फक्त 1, 2 व 4

ब) फक्त 2 व 3

क) फक्त 1, 3 व 4

ड) 1, 2, 3 व 4

Show Answer

भारतातील सार्वजनिक वित्तावरील संसदेच्या नियंत्रणाच्या पद्धती यांचे बाबत काय खरे आहे ?

1) संसादेपुढे वार्षिक वित्तीय अहवाल ठेवणे.

2) अॅप्रोप्रिएशन बिल पारित झाल्यानंतरच देशाच्या क्न्सोलायडेटेड खंड मधून पैसे काढण्यास परवानगी

3) सप्लीमेंटरी ग्रँट्स व व्होट ऑन अकौंटची तरतूद

4) पार्लमेंटरी बजेट ऑफिसद्वारा वर्षातून एकदा तरी सरकारच्या आर्थिक धोरणाबाबत आणि योजना खर्चाबाबतचा मध्यावधी आढावा घेणे.

5) संसदेत वित्तीय बिल सदर करणे.

अ) फक्त 1, 2, 3 व 5

ब) फक्त 1, 2 व 4

क) फक्त 3, 4 व 5

ड) वरीलपैकी सर्व

Show Answer

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर,

1) राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या दोन तृतीयांश सदस्यांनी तसा ठराव केला.

2) राज्यपालांच्या मते राज्याच्या घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे.

3) विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला.

4) राज्य कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केला.

अ) 1, 2 व 3

ब) 1, 2 व 4

क) 2 व 3

ड) 1 व 4

Show Answer

भारताच्या महाधीवक्त्याला खाजगी वकीली करण्याचा अधिकार आहे जर :

अ) दुसरा पक्ष राज्य असेल

ब) दुसरा पक्ष राज्य नसेल

क) दुसरा पक्ष केंद्र आहे पण राज्य नाही

ड) वरीलपैकी कोणतेही नाही

Show Answer

Top