चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ०२


1). पद्म पुरस्कार- 2016 बद्दल बिनचूक विधान / विधाने ओळखा.

अ) यावर्षी 112 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

ब) यामध्ये 11 जणांना पद्मविभुषण, 18 जणांना पद्मभुषण व 83 जणांना पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

क) या पद्म पुरस्कारांमध्ये 19 महिलांचा समावेश आहे.

ड) या पद्म पुरस्कारांमध्ये 4 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहिर झाला आहे.

इ) या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 10 व्यक्तींचा समावेश आहे.
 

1) अ, क, आणि ड

2) अ, क, आणि इ

3) अ, ब, क आणि ड

4) अ, क, ड आणि इ

Show Answer

2). खालीलपैकी योग्य जोडया निवडा.

अ) ICC चे पहिले स्वतंत्र कार्याध्यक्ष       i) न्या. ए. पी. शहा

ब) BCCI चे नवे अध्यक्ष -                    ii) शशांक मनोहर

क) BCCI चे पहिले CEO                    iii) अनुराग ठाकुर

ड) BCCI चे पहिले लोकायुक्त             iv) राहुल जोहरी
 

1) अ-i,ब-ii,क-iii,ड-iv

2) अ-ii,ब-i,क-iv,ड-iii

3) अ-ii,ब-iii,क-iv,ड-i

4) अ- i,ब-ii,क-iv,ड-iii

Show Answer

3). भारतीय आयकर विभाग PAN कार्ड वापरासंबंधी नवी नियमावली ची अंमलबजावणी करणार आहे त्याबद्दल असत्य विधान / विधाने ओळखा.

अ) 1 जाने. 2016 पासून नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यात आली.

ब) काळा पैसे रोखण्यासाठी तसेच कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी नवी नियमावली बनवली आहे.

क) हॉटेल किंवा रेस्ट्रॉरेंट चे 50 हजार किंवा जास्त रुपयांचे बिल रोखमध्ये भरतांना PAN कार्ड आवश्यक आहे.

ड) 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे दागिने रोखमध्ये खरेदी करतांना PAN कार्ड आवश्यक आहे.

इ) बँकेच्या योजना, पोस्ट ऑफिस योजना, डिपॉझिट योजनेमध्ये वर्षाला 5 लाख रुपयांचा व्यवहार करतांना PAN कार्ड आवश्यक आहे.

ई) 50 हजार व त्यापेक्षा जास्त रुपयांचा डिमांड ड्राफ्ट बनवितांना PAN कार्डची आवश्यकता आहे.

1) ब

2) ड

3) क

4) ई

Show Answer

4). दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF) कप स्पर्धेबद्दल बरोबर नसणारे विधान / विधाने ओळखा.

अ) यंदाचे विजेतेपद भारताने पाकिस्तान संघावर मात करून पटकाविले आहे.

ब) भारताचे हे या स्पर्धेतील सातवे विजेतेपद आहे.

क) जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ 166 व्या क्रमांकावर आहे.

1) अ

2) ब

3) क

4 ) यापैकी नाही

Show Answer

5). खालीलपैकी चूक नसणारे विधान / विधाने ओळखा.

अ) देशात सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो.

ब) देशात सौरऊर्जा निर्मितीत राजस्थान या राज्याचा पहिला क्रमांक लागतो.

क) सौरऊर्जा निर्मिती करणारे करणारे राज्याचा उतरता क्रमांक-

i) राजस्थान,

ii) गुजरात ,

iii) महाराष्ट्र,

iv) मध्यप्रदेश,

v) तामिळनाडू

1) फक्त अ

2) फक्त ब

3) फक्त अ व क

4) फक्त अ व ब

Show Answer

6). भारतातील पहिली तृतीयपंथी मतदान अधिकारी खालीलपैकी कोण ठरले आहे.

अ) दिया राघव

ब) हरिका वाच्छू

क) रिया सरकार

ड) दिया नाजक

1) अ

2) क

3) ब

4) ड

Show Answer

7). खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.

अ) अण्णा द्रमुकच्या मुख्य असलेल्या जे.जयललिता सहाव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या.

ब) 1989 नंतर सलग दुसऱ्यांदा सत्ता कायम राखण्यात व मुख्यमंत्री पद स्वीकारणाऱ्या पहिल्या मुख्यमंत्री.

क) विधानसभा निवडणूकीत अण्णा द्रमुक या पक्षाला 234 पैकी 144 जागा मिळाल्या होत्या.

ड) DMK या पक्षाने निवडणूकीत 89 जागा जिंकल्या आहेत.

1) क

2) ड

3) ब

4) अ

Show Answer

8). भारताच्या 'नाविक' या दिशादर्शक यंत्रणेबद्दल काय खरे नाही.

अ) NAVIC म्हणजेच IRNSS होय.

ब) IRNSS -1G या अंतिम व सातव्या उपग्रहाचे प्रक्षेपण 28 एप्रिल, 2016 ला होते.

क) शेवटचा सातवा उपग्रह IRNSS - 1G हा PSLV 33 व्दारे अंतराळात सोडण्यात आला.

ड) पंतप्रधान मोदी यांनी या यंत्रणेला नाविक असे नाव दिले होते.

इ) IRNSS या यंत्रणेची कक्षेची उंची 36 हजार कि.मी. आहे.

ई) जगभरामध्ये स्वतःची दिशादर्शक यंत्रणा विकसित करणारा भारत 5 वा देश ठरला आहे.

फ) IRNSS शृंखलेतील पहिला उपग्रह PSLV -22 च्या साहाय्याने 1 जुन 2013 ला प्रक्षेपित करण्यात आला होता.

1) ब

2) फ

3) इ

4) क

Show Answer

9). 'दीपा कर्माकर' या खेळाडूबद्दल बरोबर नसणारे विधान / विधाने निवडा.

अ) दीपा कर्माकर ही जिम्नास्टीकची खेळाडू आहे.

ब) ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला जिम्नास्टीक खेळाडू ठरली.

क) 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत दीपाने सुवर्णपदक पटकाविले होते.

ड) 1964 नंतर ऑलिम्पिकमध्ये भारतीय जिम्नास्टीकला प्रवेश तिने मिळवून दिला आहे.

1) ब

2) ड

3) क

4) अ

Show Answer

10). केंद्र शासन पोटॅशियम ब्रोमेटवर बंदी आणण्याच्या विचारात आहे, त्याबद्दल अचूक विधान / विधाने ओळखा.

अ) पोटॅशियम ब्रोमेट हे अन्नात मिश्रण म्हणून वापरले जाते.

ब) नुकतेच ब्रेड व इतर काही पदार्थात पोटॅशियम आयोडेटचे अंश आढळून आले होते.

क) FSSAI ने पोटॅशियम ब्रोमेटला अन्न मिश्रनांच्या यादीतून वगळण्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली आहे.

ड) पोटॅशियम ब्रोमेट चा उपयोग मोठया प्रमाणावर बेकारी उत्पादनात केला जातो.

1) अ, क आणि ड

2) अ, ब आणि ड

3) अ, ब, क आणि ड

4) अ आणि ड

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.