चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ०४


1). केंद्रीय अर्थ मंत्रालयाने निर्गुंतवणूक विभागाचे नामकरण खालीलपैकी कोणते केले आहे.

अ) दिपक

ब) नाविक

क) दिपम

ड) नवदिपक

1) क

2) ड

3) ब

4) अ

Show Answer

2). 'राष्ट्रीय यंत्रसामग्री धोरणा'बद्दल काय खरे नाही.

अ) या धोरणाचा मुख्य उद्देश हा कारखानदारी क्षेत्राला गती देणे, औद्योगिक उत्पादनात वाढ घडवून आणणे, रोजगार निर्मितीला चालना देणे आहे.

ब) या धोरणाव्दारे भांडवली वस्तु क्षेत्रातील 12% असणारा वाटा 2025 पर्यंत 20% करणे.

क) सध्या या क्षेत्रात असणारा 84 लाख रोजगाराचे प्रमाण 3 कोटीवर घेऊन जाणे.

ड) भांडवली वस्तुंचे देशांतर्गत मागणीतील प्रमाण 60% वरून 2025 पर्यंत 100% करणे.

1) ब

2) क

3) अ

4) ड

Show Answer

3). खालीलपैकी असत्य असणारे विधान / विधाने ओळखा.

अ) भारत अणुइंधन पुरवठादार गटाचे (NSG) सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

ब) अणुइंधन पुरवठादार गटाचे एकुण 50 सदस्य आहे.

क) अणुइंधन पुरवठादार गटाचे पाकिस्तानला सदस्यत्व 2010 ला चीनच्या मदतीने मिळाले आहे.

ड) भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न केल्यामुळे NSG साठी भारताला विरोध होत आहे.

1)ब आणि ड

2) ब आणि क

3) अ आणि ब

4) यापैकी नाही

Show Answer

4). जगातील सर्वात मोठे कॉर्गो विमान ‘अँन्टोनोव्ह N-225 मिर्या' हे नुकताच भारतात आले होते,ते कोणत्या देशाचे विमान आहे.

अ) अमेरिका

ब) फ्रान्स

क) इस्राईल

ड) युक्रेन

1) क

2) ब

3) ड

4) अ

Show Answer

5). 2016 च्या IPL- 9 क्रिकेट स्पर्धेबद्दल अयोग्य जोडया / जोडी निवडा.

अ) विजेता संघ - सनरायजर्स हैद्राबाद

ब) उपविजेता संघ - मुंबई इंडियन्स

क) ऑरेंज कॅप - विराट कोहली

ड) पर्पल कॅप - भुवनेश्वर कुमार

1) ड

2) ब

3) क

4) अ

Show Answer

6). खालील विधाने तपासा.

अ) भारताच्या मदतीने अफगाणिस्तानात सलमा धरण बांधण्यात आले आहे.

ब) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अफगाणिस्तानाच्या सलमा धरणाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

क) अफगाणिस्तानाच्या हरिरुर्द नदीवर सलमा या धरणाचे भारताच्या मदतीने पुर्नबांधणी केली आहे.

1) अ व ब सत्य. क असत्य

2) अ,ब व क सत्य

3) अ सत्य, ब व क असत्य

4) अ व क सत्य, ब असत्य

Show Answer

7). खालीलपैकी खरे विधान / विधाने निवडा.

अ) केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या यादीत देशातील 20 शहरांची निवड केली होती.

ब) केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत दुसऱ्या यादीत 13 शहरांची निवड करण्यात आली आहे.

क) स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात निवड झालेल्या शहरांची एकुण संख्या ही आता तीन झाली आहे.

1) अ आणि क

2) अ आणि ब

3) ब आणि क

4) अ, ब आणि क

Show Answer

8). खालीलपैकी बरोबर असणारे विधान / विधाने ओळखा.

अ) ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा दिल्मा रौसेफ यांची ब्राझीलमधील सत्ता संपुष्टात आली आहे.

ब) राष्ट्राध्यक्षा दिल्मा रौसेफ यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला आहे.

क) राष्ट्राध्यक्षा दिल्मा रौसेफ यांच्यावर बजेट कायद्याचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप होता.

1) अ, ब आणि क

2) अ आणि क

3) अ आणि ब

4) ब आणि क

Show Answer

9). 'मॅन बुकर पुरस्कार - 2016' बद्दल अचूक विधान / विधाने ओळखा.

अ) यंदाचा मॅन बुकर पुरस्कार 'द व्हेजिटेरियन' या पुस्तकाच्या लेखिकेला जाहिर झाला आहे.

ब) दक्षिण सुदानच्या लेखिका 'हान कांग' यांनी 'द व्हेजिटेरियन' या पुस्तकाचे लेखन केले आहे.

क) 'द व्हेजिटेरियन' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ब्रिटनमधील 'दिबोरा स्मिथ' यांनी केला आहे.

1) ब आणि क

2) अ आणि ब

3) अ आणि क

4) अ, ब आणि क

Show Answer

10). खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

अ) ब्रिटनची राजधानी लंडन या शहरांचा महापौर होण्याचा मान प्रथमच मुस्लिम नागरिकाला मिळाला आहे.

ब) सादिक खान यांची लंडनच्या महापौरपदी निवड झाली आहे ते भारतीय वंशाचे आहे.

क) ब्रिटनमध्ये सादिक खान हे लेबर पार्टीचे खासदार राहिले आहे.

1) अ आणि क

2) अ आणि ब

3) ब आणि क

4) सर्व अचूक

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.