मराठी प्रश्नमंजुषा क्र. ०२


पुढील संयुक्त वाक्याचे केवल वाक्यात रुपांतर करा.

‘मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही.’

अ) मला ताप आला की मी शाळेत जात नाही.

ब) मला ताप आला आणि की मी शाळेत जात नाही.

क) मला ताप आल्याने मी शाळेत जाणार नाही.

ड) मला ताप आला म्हणून मी शाळेत गेलो नाही.

Show Answer

पुढील पर्यायातील नामसाधित विशेषण कोणते?

अ) पैठणी साड्या

ब) वाहती नदी

क) वरचा मजला

ड) बोलका बाहुला

Show Answer

‘काही पक्षीच उडू शकतात.’ या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगा.

अ) संख्यावाचक विशेषण

ब) काव्यवाचक विशेषण

क) अनिश्चित संख्यावाचक विशेषण

ड) सार्वनामिक विशेषण

Show Answer

‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

 

अ) संमुख

ब) उन्मुख

क) विमुख

ड) दुर्मुख

Show Answer

पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. अ, आ

अ) ओष्ठ्य

ब) दंत तालव्य

क) कंठ्य

ड) दंत्य

Show Answer

‘हळूहळू’ शब्दप्रकार ओळखा.

अ) उपसर्गघटित

ब) प्रत्ययघटित

क) अभ्यस्त

ड) सिध्द

Show Answer

तो गटागटा पाणी प्यायला. वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

अ) परिणामवाचक

ब) स्थितीवाचक

क) रीतिवाचक

ड) कालवाचक

Show Answer

पुढील म्हणीला पर्यायी म्हण ओळखा. ‘बैल गेला अन झोपा गेला’

अ) आवळा देऊन कोहळा काढणे.

ब) वरातीमागून घोडे

क) पालथ्या घड्यावर पाणी

ड) वासरात लंगडी गाय शहाणी

Show Answer

‘श्रीमंत माणसांना गर्व असतो’ या वाक्यातील विशेषणाचे नाम करा.

अ) श्रीमंतांना गर्व असतो.

ब) श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात.

क) माणसांना गर्व असतो.

ड) यापैकी नाही

Show Answer

‘राहुल कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेट संघात स्थिरावला.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

अ) सिद्ध क्रियापद

ब) साधित क्रियापद

क) शक्य क्रियापद

ड) प्रायोजक क्रियापद

Show Answer

Top