playstore
Reliable Academy | Study Materials | मुख्य परीक्षा भूगोल अभ्यासक्रमाची मांडणी

मुख्य परीक्षा भूगोल अभ्यासक्रमाची मांडणी


मुख्य परीक्षा भूगोल अभ्यासक्रमाची मांडणी

मुख्य परीक्षेचा उद्देश एखाद्या मुद्द्याचा बहुआयामी विचार करण्याची उमेदवाराची क्षमता तपासणे हाच असतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप     inter disciplinary, multifaceted    असते. कोणत्याही विषयाच्या मूलभूत आयामांमध्ये त्याचे भौगोलिक आयाम महत्त्वाचे असतात. भूगोल हा विषय महत्त्वाच्या चालू घडामोडींसहित अनेक विषयांच्या अभ्यासाला संकल्पनात्मक पाया देतो. या विषयाचे प्रश्न  applied  प्रकारचे, व्यावहारिक व कॉमन सेन्स तपासणारे अशा प्रकारचे असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे भूगोलाची परिपूर्ण तयारी अत्यंत आवश्यक आहे.

अभ्यासाच्या सोयीसाठी आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाची वेगळ्या प्रकारे मांडणी करून घेणे व्यवहार्य ठरेल. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोल व हवामान या घटकांचा एकत्रित अभ्यास केल्याने भौगोलिक संज्ञा व्यवस्थित कळतील. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह यातील सर्व मुद्दे पाहावे लागतील.

 

प्राकृतिक  व पर्यावरणीय भूगोल 

भूरूपशास्त्र – पृथ्वीचे अंतरंग – रचना आणि घटना – अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे भूमिस्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक, भूरूपचक्रांची संकल्पना – नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमिस्वरूपे. भारतीय उपखंडाची उत्क्रांती व भूरूपशास्त्र, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग. महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपीय वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये/भूमिस्वरूपे – टेकड्या, कटक, पठारी  प्रदेश, कुंभगर्ता, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण

हवामानशास्त्र वातावरण – संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे, सौर ऊर्जा- पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन, तापमान- पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे ऊध्र्व व क्षितिज समांतर वितरण

हवेचा दाब, वारे, ग्रहीय व स्थानिक वारे, महाराष्ट्रातील मोसमी वारे (मान्सून), पर्जन्याचे वितरण, अवर्षण व पूर व त्यांच्याशी निगडित समस्या.

पर्यावरण भूगोल: परिसंस्था-घटक, जैविक आणि अजैविक, ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, पोषण/रासायनिक घटकांचे चक्रीकरण, अन्न साखळी, अन्न जाळे, पर्यावरणीय ऱ्हास व संधारण, जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन – जैवविविधतेतील ऱ्हास, जैवविविधतेच्या ऱ्हासामधील धोके, मानव व वन्यजीव संघर्ष, निर्वनीकरण, जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम, CO, COs, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील उष्मावृद्धी केंद्रे (Heat Islands), पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन (EIA), क्योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिट्स

सामाजिक भूगोल

मानवी भूगोल- मानवी भूगोलातील विचारधारा, निश्चयवाद/निसर्गवाद, संभववाद/शक्यतावाद, थांबा व पुढे जा निश्चयवाद, विकासासंबंधीची विविध मते

मानवी वसाहत ग्रामीण व नागरी वसाहत – स्थळ, जागा, प्रकार, अंतरे व त्यांची रचना, नागरी व ग्रामीण वस्त्यांमधील समस्या, ग्रामीण नागरी झालर/किनार क्षेत्र

नागरीकरण, नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन

लोकसंख्या भूगोल लोकसंख्याविषयक सांख्यिकी साधने/ माहिती सामग्री, महाराष्ट्रातील लोकसंख्यावाढ, घनता व वितरण, महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना व वैशिष्ट्ये, लोकसंख्या बदलाचे घटक, जनन दर, मृत्युदर, लोकस्थलांतर, महाराष्ट्रातील जन्मदर, मृत्युदर, लोकस्थलांतराचा कल व पातळी, लोकसंख्यावाढ व आर्थिक विकास, लोकसंख्याविषयक धोरण

 

आर्थिक भूगोल

आर्थिक व्यवसाय – शेती, महाराष्ट्रातील पिके व पिक प्रारूप, उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती, शेतीची आधुनिक तंत्रे, सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, कृषीविषयक शासकीय धोरण

मासेमारी मत्स्य व्यवसाय- भूअंतर्गत मासेमारी, अरबी समुद्रातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण

खनिजे व ऊर्जा साधने – महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे व ऊर्जा साधने, खनिज साठे व त्यांचे उत्खनन, महाराष्ट्रातील खाणकाम व्यवसायाच्या समस्या

वाहतूक- वाहतुकीचे प्रकार, महाराष्ट्रातील वाहतूक प्रकारांचा विकास, आर्थिक

विकास, आर्थिक विकासाची साधने, शाश्वत विकास

पर्यटन- पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा (लेणी, किल्ले व ऐतिहासिक शिल्प)

ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय- इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र, भारतातील सिलिकॉन व्हॅली/माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैव तंत्रज्ञान (CTBT), DRDO) ची भूमिका

भूगोल व आकाश-अवकाशीय/अंतराळ तंत्रज्ञान

आकाश व अवकाश संज्ञा,  GIS, GPS आणि दूरसंवेदन यंत्रणा, संरक्षण, बँकिंग आणि इंटरनेटच्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग, टेलिकम्युनिकेशन व वाहतूक नियोजन, आरोग्य व शिक्षण, मिशन शक्ती, अँटी सॅटेलाइट मिशन, अवकाशीय उपग्रह संपत्ती, isro, drdo  यांची भूमिका, अवकाशीय कचरा व्यवस्थापन, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा आणि प्रतिबंधात्मक उपाय, भारताची भूराजनीतिक स्थिती.

 

रिमोट सेन्सिंग 

रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्त्वे

मूलभूत संकल्पना, प्रक्रिया, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, ऊर्जा परस्पर क्रिया (माती, पाणी, वनस्पती), नकाशा रेझोल्युशन, प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त, निष्क्रिय व सक्रिय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग, मल्टी स्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग, दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचे घटक, डेटा व माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंग फायदे व मर्यादा,

जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग

परिचय, घटक, भूस्थानिक डेटा स्थानिक आणि गुणधर्म डेटा, समन्वय प्रणाली, नकाशा अंदाज आणि प्रकार, रास्टर डेटा आणि मॉडेल, वेक्टर डेटा आणि मॉडेल, ॅकर कार्ये इनपुट कुशलता, व्यवस्थापन, क्वे री विश्लेषण, व्हिज्युअलायझेशन, जमीन वापर विश्लेषण, डिजिटल एलेल्व्हेशन मॉडेल, त्रिकोणाबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडविण्यासाठी जीआयएसचे कार्य. प्रत्यक्ष अभ्यासाच्या पद्धतीबाबत पुढील लेखात सविस्तर चर्चा करू.

एरियल फोटोग्राफ

हवाई छायाचित्रांचे प्रकार आणि वापर, कॅमेराचे प्रकार आणि अनुप्रयोग, त्रुटी निर्धारण आणि स्थानिक रेझोल्युशन, व्याख्या आणि नकाशा स्केल, आच्छादित स्टीरीओ फोटोग्राफी