playstore
Reliable Academy | Study Materials | भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना

भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना


भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना

 • अधिकोषण (किंवा बँकिंग) घोटाळ्यांना आळा घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँक नव्या वर्षाच्या सुरुवातीला “पॉजिटीव्ह टू पे” योजना सादर करणार आहे.
 • ठळक बाबी.

  • “पॉजिटीव्ह टू पे” ही एक प्रणाली आहे.
  • या प्रणालीच्या अंतर्गत, 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाच्या माहितीची पुष्टी करणे अनिवार्य आहे.
  • धनादेश देणाऱ्याला SMS, इंटरनेट बँकिंग, मोबाईल अॅप किंवा ATM अश्या माध्यमातून लाभार्थ्याचे नाव, तारीख, रक्कम असा धनादेशाचा तपशील सादर करावा लागतो.
  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था या प्रणालीचा कार्यप्रणाली व्यवस्थापित करते.
  • ही आधीपासूनच भारतात वापरात आहे आणि ICICI बँक 2016 सालापासून या प्रक्रियेचे अनुसरण करीत आहे.