playstore
Reliable Academy | Study Materials | वडील टेम्पो ड्रायव्हर - मुलगा बनला तहसीलदार

वडील टेम्पो ड्रायव्हर - मुलगा बनला तहसीलदार


वडील टेम्पो ड्रायव्हर - मुलगा बनला तहसीलदार

 • कष्ट, जिद्द आणि प्रयत्न प्रामाणिक असले तर यशस्वी होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, हा मूलमंत्र आपण जाणतोच.
 • अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतही या त्रिसूत्रीचा जोरावर यश मिळवले जाऊ शकते.
 • अत्यंत हालाखीची किंवा साधारण परिस्थिती असलेले अनेक मुलं-मुली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अधिकारी बनली आहेत.
 • त्यातीलच एक मुलगा म्हणजे राकेश अण्णासाहेब गिड्डे होय.
 • राकेश अण्णासाहेब गिड्डे यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या निकालानुसार तहसीलदारपदी निवड झाली आहे. तत्पूर्वी राकेश यांनी नायब तहसीलदारपदालादेखील गवसणी घातली होती.
 • राकेश हे मूळचे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एरंडोली गावचे आहेत.
 • राकेश यांचे वडील टेम्पो ड्राइव्हर असून त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत साधारण आहे.
 • त्यांची आईदेखील जेमतेम शिकलेली असून गृहिणी आहे.
 • असे असले तरी राकेश यांच्या मातापित्यांनी आपल्या मुलाला शिकवण्यात कसलीही कसर ठेवली नाही.
 • मुलाला चांगला अभ्यास करण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी नेहमीच पाठबळ दिले.
 • कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून राकेश यांनी 2017 साली ‘आयटी मध्ये पदवी प्राप्त केली.
 • पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच ते आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नायब तहसीलदारपदी नियुक्त झाले.
 • आणि आता पुन्हा परीक्षा देऊन ते तहसीलदार झाले आहेत. सध्या ते नांदेड येथे सेवा बजावत आहेत.
 • ‘गरिबीचा बाऊ न करता अविरतपणे संघर्ष करून त्यापासून प्रेरणा घेऊन परिस्थितीशी लढायचे असते.
 • आज मी ज्या स्थानावर पोहोचलो आहे ते स्थान मला फक्त माझे आईवडील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे मिळाले आहे.
 •