Reliable Academy | Study | भारतात संदीप कटारिया यांच्या नेतृत्वाखाली बाटाचा नफा दुप्पट झाला.
भारतात संदीप कटारिया  यांच्या नेतृत्वाखाली बाटाचा नफा दुप्पट झाला.

02 Dec 2020


भारतात संदीप कटारिया यांच्या नेतृत्वाखाली बाटाचा नफा दुप्पट झाला.

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुख वा परिचालकपदावर भारतीय व्यक्ती नियुक्त होण्याचे नावीन्य अलीकडे फारसे राहिलेले नसले, तरी अशा नियुक्त्यांची दखल त्या त्या वेळी घ्यावीच लागते.

मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गूगलचे सुंदर पिचाई, मास्टरकार्डचे अजय बंगा, आयबीएमचे अरविंद कृष्णा, रेकिट बेन्किसरचे लक्ष्मण नरसिंहन ही नावे आता सुपरिचित झाली आहेत. या यादीमध्ये आणखी एक नाव दाखल झाले आहे, संदीप कटारिया यांचे. जोडे-चपलांचे सर्वपरिचित उत्पादक बाटा या कंपनीच्या ग्लोबल चीफ एग्झिक्युटिव्हपदी त्यांची नियुक्ती अलीकडेच झाली. या पदावर बढती मिळालेले ते पहिलेच भारतीय. १२६ वर्षीय बाटा कंपनीचे मूळ स्वित्र्झलडमधले आणि संस्थापक पूर्वाश्रमीच्या चेकोस्लोव्हाकियातील! पण बाटाच्या चपला किं वा बाटाचे जोडे हे शब्द इतके  परवलीचे बनले आहेत, की जणू ती भारतीय नाममुद्राच वाटावी. अर्थात या कं पनीचा जागतिक पसारा खूप मोठा आहे. जगात सर्वाधिक जोडे ही कं पनी बनवते. जवळपास ७० देशांमध्ये ५३०० दुकाने आणि १८ देशांमध्ये या कं पनीचे उत्पादक कारखाने आहेत. संदीप कटारिया हे २०१७मध्ये बाटाच्या भारतीय शाखेत चीफ एग्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाले.  त्यांनी उच्चशिक्षण उच्च दर्जाच्या अस्सल भारतीय शिक्षण संस्थांमध्ये घेतले. आयआयटी दिल्लीतून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर कटारिया यांनी जमशेदपूर येथील ‘झेवियर लेबर रिसर्च इन्स्टिटय़ूट’मधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले. युनिलिव्हर, यम ब्रँड्स, व्होडाफोन अशा बहुराष्ट्रीय कं पन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर ते बाटा कं पनीमध्ये दाखल झाले.

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात त्यांनी प्रामुख्याने काम के लेले दिसून येते. या क्षेत्राला कोविडचा फटका थेट बसलेला नसला, तरी अशा उत्पादनांच्या बाजारपेठांचा विस्तार करण्यात जोखीम आणि जबाबदारी मोठी असते.

भारतात कटारिया यांच्या नेतृत्वाखाली बाटाचा नफा दुप्पट झाला. याशिवाय बाटा म्हणजे ‘वलय नसलेले उत्पादन’ ही छबी पूर्णपणे पुसून टाकण्यात कटारिया यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.

किफायती आणि परवडण्याजोगी उत्पादने हे बाटाचे आणखी एक वैशिष्टय़. त्यामुळेच या नाममुद्रेच्या वाटचालीत भारताचा वाटा मोठा आहे. या देशात दरवर्षी साधारण पाच कोटी चपला-जोडय़ांची विक्री होते. त्यामुळे हा पसारा वाढवण्याची कटारिया यांच्यावरील जबाबदारी मोठी आहे. 

नवीन पिढीला लक्ष्य करण्याचे बाटाने ठरवले आहे.

सीईओंच्या मांदियाळीत ४९ वर्षीय कटारिया हेही तरुणच. साहजिकच त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.