playstore
Reliable Academy | Study Materials | पर्यावरण परिस्थितिकी

पर्यावरण परिस्थितिकी


पर्यावरण परिस्थितिकी

पर्यावरण परिस्थितिकी हा आंतरविद्याशाखीय विषय आहे. ज्यामध्ये जीवशास्त्र, परिस्थितिकीशास्त्र आणि भूगोल या विषयांचा समावेश होतो. या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास या विषयांची परस्परव्याप्ती असल्याचे दिसून येते. जागतिक तापमानवाढ, वातावरणातील बदल इ. २१ व्या शतकातील महत्त्वाच्या समस्यांचे आपल्याला ज्ञान असणे क्रमप्राप्त आहे. याचा फायदा परीक्षेकरिताही होतो. त्याचबरोबर भावी प्रशासकीय अधिकारी म्हणून धोरणनिर्मिती करताना हे ज्ञान नक्कीच उपयुक्त ठरेल.

 

या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पुढीलप्रमाणे

वर्ष                प्रश्नसंख्या

२०११                    १५

२०१२                    १७

२०१३                    १७

२०१४                    १८

२०१५                    ११

२०१६                    १८

२०१७                    १५

२०१८                    १३

२०१९                    ११

२०२०                    १०

पर्यावरण परिस्थितिकीच्या आंतरविद्याशाखीय स्वरूपामुळे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यासक्रम पाहून सर्व महत्त्वाचे घटक जाणून घ्यावेत, त्यामुळे अनावश्यक घटकांचा अभ्यास टाळून महत्त्वाच्या घटकावर लक्ष केंद्रित करता येईल. यानंतर या विषयाशी संबंधित योग्य संदर्भ ग्रंथाची निवड करण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे जरूरीचे आहे. या विषयाची तयारी NCERT  च्या इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पुस्तकातील पर्यावरणविषयक प्रकरणापासून करता येईल. यानंतरEcology and Environment – P. D. Sharma या संदर्भग्रंथातून हा विषय सखोलपणे अभ्यासता येईल. मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी ‘पर्यावरण व परिस्थितिकी’ हे इंद्रजित यादव, अतुल कोटलवार लिखित पुस्तक उपयुक्त ठरू शके ल.

या विषयातील काही भाग पारंपरिक व स्थिर(Static) स्वरूपाचा आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण व परिस्थितिकीशी संबंधित मूलभूत संकल्पनांचा समावेश होतो. बहुतांश वेळा या पारंपरिक घटकांवरही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. २०१५ मध्ये परिसंस्था (Ecosystem) काय आहे? २०१३ मध्ये अन्नसाखळीवर Ecological niche   या संकल्पनेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून पारंपरिक तथा स्थिर (Static) घटकांचे महत्त्व अधोरेखित होते. पर्यावरण परिस्थितिकी या विषयावर आधारित चालू घडामोडी अभ्यासणे आवश्यक आहे, कारण विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये समकालीन घडामोडींवर आधारित प्रश्नांचे प्राबल्य दिसून येते. ढोबळमानाने या अभ्यासघटकामध्ये पर्यावरण, परिस्थितिकी, जैवविविधता, वातावरण बदल इ. शी संबंधित मुद्यांचा समावेश असल्याने यूपीएससीने या घटकांच्या तयारीकरिता कोणत्याही प्रकारच्या विशेष ज्ञानाची आवश्यकता नसल्याचे अभ्यासक्रमात नमूद केले आहे. या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमधून पर्यावरण परिस्थितिकीचे मूलभूत आकलन तपासले जाते. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सर्व घटक महत्त्वाचे असले, तरी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटकांना ओळखून त्याची प्राधान्यक्रमाने तयारी केल्यास अभ्यासघटकावर पकड मिळविता येते.

परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे सांगता येतील – परिसंस्था, अन्नसाखळी, Ecological Niche, किस्टोन प्रजाती , ecotone, ecological succession  या परिस्थितिकीशी संबंधित महत्वाच्या संकल्पनांचे सखोल वाचन करावे. याबरोबरच पर्यावरणीय प्रदूषण आणि विनाश याअंतर्गत प्रदूषणाचे प्रकार, ओझोन अवक्षय, हरितगृह वायू, आम्लवर्षा, वाळवंटीकरण, धोकादायक कचरा इ. बाबी पाहता येतील. तसेच प्रदूषण नियंत्रणाला प्रतिबंध, पर्यावरण विषयक कायदे, संस्था इ. बाबींची माहिती द्यावी.

पर्यावरणाच्या अभ्यासक्रमामध्ये जैवविविधता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये जैवविविधतांचे प्रकार, इको सेन्सिटिव्ह झोन, वन्यजीव अभयारण्ये, नॅशनल पार्क, देवराई, जीवावरण राखीव क्षेत्रे, जैवविविधता हॉटस्पॉट, in-situ व  Ex-Situ संवर्धन, व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्प, वन्यजीवांच्या संवर्धनाशी संबंधित प्रकल्प इ. घटक महत्त्वपूर्ण आहेत.

२०२०

प्र. १. खालीलपैकी वाघांकरिता आरक्षित असणाऱ्या क्षेत्रांपैकी Critical Tiger Habitat  च्या अंतर्गत सर्वात अधिक क्षेत्र कोणाकडे आहे?

ङ्म कॉर्बेट

ङ्म रणथंबोर

ङ्म नागार्जुन-श्रीशैल्यम

ङ्म सुंदरबन

पर्यावरण परिस्थितिकीमध्ये हवामान बदल, जागतिक तापमानवाढ आदी घटनांसोबतच हवामान बदलांशी संबंधित संस्था जसे UNFCC क्योटो प्रोटोकॉल,REDD/REDD+, IPCC आदी इनिशिएटिव्ह, कार्बन क्रेडिट, माँन्ट्रीयल प्रोटोकॉल, हवामान बदलाविषयी दरवर्षी होणाऱ्या परिषदांची माहिती करून घ्यावी. आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक परिषदा उदा. रिओ समीट, रामसर कन्व्हेन्शन, (ITES, IUCN), बेसल कन्व्हेन्शनविषयी माहिती असणे आवश्यक आहे. याकरिता ‘बुलेटिन’ व ‘डाऊन टू अर्थ’ ही मासिके उपयुक्त ठरता