playstore
Reliable Academy | Study Materials | कधीकाळी आईसोबत रस्त्यावर विकत होते बांगड्या, आज आहे IAS अधिकारी...

कधीकाळी आईसोबत रस्त्यावर विकत होते बांगड्या, आज आहे IAS अधिकारी...


कधीकाळी आईसोबत रस्त्यावर विकत होते बांगड्या, आज आहे IAS अधिकारी...

महाराष्ट्राचे सुपुत्र रमेश घोलप यांची अशी एक संघर्ष काहणी आहे जी प्रत्येक संघर्ष करणाऱ्या युवकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

एखादी व्यक्ती संपूर्ण मेहनत आणि चिकाटीने वाटचाल करत असेल तर त्याला जगातील कोणतीच ताकद रोखू शकत नाही किंवा त्याचा पराभव करू शकत नाही. आम्ही तुमची अशा एका व्यक्तीशी ओळख करून देणार आहोत, जो सर्व अडचणींवर मात करून कठोर परिश्रमासह जीवनाची वाटचाल केली. आज या व्यक्तीला सर्व जण मानाचा मुजरा करतात कारण आज ही व्यक्ती एक मोठा आयएएस (IAS) अधिकारी आहे. रमेश घोलप हे अनेक युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत, जे भारतीय प्रशासकीय सेवेत (सिव्हिल सर्व्हिसेस) मध्ये दाखल होऊ इच्छितात.

रमेश घोलप शारिरिकदृष्ट्या पोलियोचे शिकार होते. ते इतक्या गरीब कुटुंबातील आहे की त्यांची काहणी ऐकल्यावर आपल्या डोळ्याच्या कडा पाणावतील. रमेश यांची आई रस्त्यावर बांगड्या विकण्याचे काम करायची, यावेळी रमेश हे देखील आपल्या आईला मदत करायचे. पण ते करत असताना आपल्या बुद्धिमत्ता आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात करत आज आयएएस पदापर्यंत मजल मारली आहे.