playstore
Reliable Academy | Study Materials | तलाठी

तलाठी


तलाठी

तलाठी(हिन्दीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे.

जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत.

गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.

सुरुवात

दिल्लीचे बादशहा शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल(हिन्दीत टोडरमल) नावाचे भू-अभिलेख मन्त्री होते. हे पुढे अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक झाले. त्यांनी जमिनीसम्बन्धी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पदाची स्थापना केली होती. भारतातील ब्रिटिश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी(हिन्दीत पटवारी) या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातली 'कुळकर्णी वतने' समाप्त केल्या गेली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली. शाहू महाराजांनी सन १९१८ मध्ये पगारी तलाठी पदाची नियुक्ती केली.

निवड

जिल्हा निवड मंडळ

नेमणूक

जिल्हाधिकारी

शैक्षणिक पात्रता- पदवी

तलाठ्याची कर्तव्ये

  • ग्रामीण भागाच्या नोन्दवह्या अद्ययावत ठेवणे, दैनन्दिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.
  • शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
  • नैसर्गिक आपत्तीची माहिती मण्डळ अधिकारी व तहसीलदारांस देणे.
  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोन्द करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेले सम्पादन याचे नोन्दवहीत विवरण घेणे.
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करावी व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.