playstore
Reliable Academy | Study Materials | नायब तहसीलदार

नायब तहसीलदार


नायब तहसीलदार

राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते.

हे गट ‘ब’ मधील पद असले तरी ‘राजपत्रित’ (gazetted) पद आहे.

तहसीलदारांना जे जे अधिकार आहेत व जी काही कर्तव्ये पार पाडावी लागतात, जवळपास त्या सर्वच गोष्टी नायब तहसीलदारांना लागू होतात.

महसूली कामकाजाबाबत अर्धन्यायिक अधिकारी म्हणूनही नायब तहसीलदार काम करतो. जात व उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे कामही तो करतो. अशा प्रकारे सगळ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी करावी लागते.

‘कमी तिथे आम्ही’ या पद्धतीने नायब तहसीलदार विविध विभागांच्या गरजा पूर्ण करतो.