playstore
Reliable Academy | Study Materials | पोलिस खाते

पोलिस खाते


पोलिस खाते

ज्या खात्याबद्दल उमेदवारांमध्ये प्रचंड कुतूहल व आकर्षण असते तर ते म्हणजे पोलिस खाते. एक ही गणवेशधारी सेवा आहे, तेही एक आकर्षण आहे. काहीजण तर फौजदार बनायचेच या ध्येयाने झपाटलेले असतात. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ नुसार महाराष्ट्र राज्यासाठी पोलिस दलाचे गठन करण्यात आले आहे. राज्य पोलिस दलात शहरी भागासाठी आयुक्तालये व ग्रामीण भागाकरिता परिक्षेत्रे निर्माण करण्यात आलेली आहेत. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व आयुक्तालये ही पोलिस महासंचालकाच्या अधिपत्याखाली आहेत. ‘सद‍्रक्षणाय, खलनिग्रहणाय' असे ब्रीद घेऊन महाराष्ट्र पोलिस सेवा (म. पो. से.) कार्य करते.

पोलिस खात्याची उतरंड

सर्वात वरती पोलिस महासंचालक येतो. (DGP) त्याखाली अतिरिक्त महासंचालक असतात (१४), त्याखाली विशेष पोलिस महानिरीक्षक (Special IGP) हे महसूल आयुक्ताच्या दर्जाचे पद येते. त्याखाली पोलिस उपमहानिरीक्षक (DIG), त्यानंतर जिल्हा स्तरावर पोलिस अधीक्षक (SP/DCP), मग अतिरिक्त पोलिस अधीक्षक (Add. SP), मग पोलिस उपअधीक्षक (DySP/ACP) हे पद येते जे राज्यसेवेतून प्राप्त होते. त्यानंतर मग वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr.PI), पोलिस निरीक्षक (PI), मग सहाय्यक पोलिस निरीक्षक (API), पोलिस उपनिरीक्षक (PSI), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (APSI), शेवटी पोलिस हवालदार (Police Head Constable), पोलिस नाईक (PN) आणि शेवटी पोलिस शिपाई (PC) अशी ही उतरंड आहे.