Reliable Academy | Study Materials | निवडणूक प्रक्रिया, पक्षपद्धत
निवडणूक प्रक्रिया, पक्षपद्धत


निवडणूक प्रक्रिया, पक्षपद्धत

प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-२ मधील निवडणूक प्रक्रिया, जनप्रतिनिधित्व अधिनियम-१९५१, पक्षपद्धती इ. घटकांवर आधारित प्रश्नांविषयी चर्चा करूयात.

 २०१९ On what grounds a people’s representative can be disqualified under the representation of People Act, 1951? Also mention the remedies available to such persons against his disqualification.

उत्तरामध्ये प्रारंभी या प्रश्नाची पाश्र्वभूमी नमूद करावी. यानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ विषयी थोडक्यात माहिती द्यावी. जसे निवडणुकांचे संचालन, निवडणुका, निवडणूक अपराध, निवडणुकीचे अपराध, पोटनिवडणुका, लोकप्रतिनिधींची अपात्रता यांचा अंतर्भाव आहे, याचा उल्लेख करावा. उत्तराच्या मुख्य भागामध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१नुसार लोकप्रतिनिधींचे अपात्रतेविषयीचे निकष लिहावेत. उदा. (१) निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार किंवा काही निवडणूक गुन्ह्य़ांमध्ये दोषी आढळणे. (२) एखाद्या गुन्ह्य़ामध्ये दोन किंवा अधिक वर्षांसाठी अटकेत असणे.

(३) निवडणूक जमाखर्च वेळेत सादर न करणे इ. उत्तरार्धामध्ये लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये समाविष्ट अपात्रतेविरोधातील उपाययोजना लिहाव्यात. यामध्ये अपात्र ठरलेल्या लोकप्रतिनिधीस निवडणूक याचिकेद्वारे उच्च व सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते. संसद सदस्यांबाबत राष्ट्रपती आणि विधानसभा सदस्यांबाबत राज्यपाल हे एखाद्या अपात्र सदस्याविषयी अंतिम निर्णय देऊ शकतात. उत्तराच्या शेवटी या मुद्दय़ांविषयी भविष्यामध्ये आणखी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील याविषयी सांगावे.

२०१८ In the light of recent controversy regarding the use of EVM, what are the challenges before the Election Commission of India to ensure the trustworthiness of elections in India?

प्रस्तावनेमध्ये अलीकडेच EVMच्या वापरासंबंधी असणारे विविध वाद व पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे अशी मागणी याविषयी थोडक्यात लिहावे. उत्तराच्या मुख्य भागामध्ये EVM वापरासंबंधी असणाऱ्या विविध आव्हानांविषयी लिहावे.

उदा. (१) मतदारांना व राजकीय पक्षांना EVM विश्वासार्ह व पारदर्शक असल्याबाबत पटवून देणे.

(२) EVMमध्ये फेरफार होऊ नये याकरिताEVM Randomization ही प्रक्रिया अवलंबली जाते.

ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पाडली जाते; परंतु या प्रक्रियेच्या अस्सलतेविषयी खात्री देणे हे आयोगासमोरचे आव्हान आहे.

(३) निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी EVM सोबत VVPAT यंत्रणा उपयुक्त ठरते. या यंत्रांची उपलब्धता देशभरामध्ये करून देणे तसेचEVM व VVPAT द्वारे झालेल्या मतदानाची पडताळणी करणे.

उपरोक्त बाबींविषयी चर्चा करून निवडणूक आयोगासमोर असणाऱ्यांत आव्हानांना कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुचवणे इष्ट ठरेल. मतपत्रिकेद्वारे घेण्यात येणाऱ्या निवडणुकांची प्रक्रिया वेळखाऊ व क्लिष्ट असल्याने ईव्हीएमच कसे फायदेशीर ठरतील हे नमूद करून उत्तराची सांगता सकारात्मकपणे करावी.

२०१७ To enhance the quality of democracy in India the election reforms in 2016. What are the suggested reforms and how far are they signficant to make democracy successfull ?

लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका काटेकोरपणे आणि कार्यक्षमपणे पार पाडणे आवश्यक असते. याकरिता देशामध्ये वेळोवेळी निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा आणल्या गेल्या. २०१६ मध्येही निवडणूक आयोगाने काही सुधारणा सुचविल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या काही घटना, वाद नमूद करावेत. उत्तराच्या मुख्य भागामध्ये निवडणूक आयोगाने सुचविलेले बदल लिहावेत. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणे इतर निवडणूक आयुक्तांना घटनेच्या कलम ३२४(५) अंतर्गत असणारे संरक्षण देणे, आयोगाचा खर्च भरीव निधीतून करणे, मत स्वीकृत यंत्राचा वापर करणे, इ. सुधारणा नमूद कराव्यात. यानंतर या बदलाचे लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये असणारे महत्त्व सांगावे.

2016 The Indian party system is passing through a phase of transition which looks to be full of contradictions and paradoxes. Discuss.

कोणत्याही देशातील प्रातिनिधिक शासनव्यवस्थेची कामकाज पद्धती तेथील पक्षपद्धतीच्या स्वरूपावर अवलंबून असते. राजकीय पक्ष राजकीय व्यवस्थेचे चलनवलन शक्य व सुलभ करतात. भारतातील पक्षपद्धतीचे अध्ययन करताना एकपक्षीय वर्चस्व ते बहुपक्षीय आघाडी असा विकास झालेला दिसतो. मात्र, २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर एकपक्षीय वर्चस्व आणि आघाडीचे सातत्य असे नवीन स्थित्यंतर पाहावयास मिळते. अशा पद्धतीने प्रस्तावना करून मुख्य भागामध्ये पक्षपद्धतीमध्ये आढळणारी विरोधाभासी व विसंगत स्थित्यंतरे नमूद करावीत.

(१) निवडणूकपूर्व आणि नंतर होणाऱ्या आघाडय़ा.

(२) प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव.

(३) पक्ष सदस्यांमध्ये गुन्हेगारी पार्शभूमी असणाऱ्यांची वाढती संख्या.

(४) विचारप्रणालीविषयक अभिमुखतेचा ऱ्हास.

(५) लोकानुरंजनवादी डावपेचांचा अवलंब इ. बाबी लिहाव्यात.